जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

12 May 2020

बिलोलीत जागतिक परिचारीकादिनामित्त काँग्रेस कमिटीकडुन परिचारीकांंचे स्वागत

बिलोली :जागतीक परिचारीकादिनामित्त बिलोली नगरपरिषद व काँग्रेस कमिटीच्यावतीने ग्रामीण रुग्णालयातील परिचारीका व वैद्यकीय अधिका-यांचे स्वागत करण्यात आले आहे.संपुर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले असुन याविरोधात संपुर्ण आरोग्य यंञणा कोरोनाविरोधात लढत असताना या लढाईत डॉक्टरांच्या खंद्याला खंदा लावत या लढाईत परिचारीकांदेखील कोरोनाविरोधात संघर्ष सुरु आहे.रुग्णांच्या सर्वाधिक संपर्कात असणाऱ्या परिचारीका आपला जीव धोक्यात घालुन आरोग्य सेवेचे व्रत सांभाळत बिलोली ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्र,उपकेंद्रात ह्या परिचारीका आपल्या कुटुंबीयांपासुन दुर राहत कोरोनाविरोधातील लढाईत सहभागी झाल्या आहेत.सध्या सर्वञ कोरोना महामारी पसरली असल्याने लॉकडाऊन करण्यात आले असले तरी परिचारीका भगिणी कोरोनाशी लढा देत रुग्णसेवा करीत आहेत.आपल्या कुटुंबांपासुन दुर राहत लढणा-या परिचारीकांंच्या हिमतीच्या अनेक कथा त्यांच्या रुग्णसेवेची साक्ष देत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य पथकात मुख्यालयी राहुन शासकीय आदेशाचे पालन करीत कामकाज करणा-या व नगरपरिषदेत सुरु असलेल्या कोरोना केअर सेंटर कक्षात काम करणा-या परिचारिकांचा लढा आरोग्य यंञणेत तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.कोरोनाच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेकडुन फारसे गांभीर्य दाखविले जात नसताना दुसरीकडे कोरोनासारख्या महाभयंकर विषाणुंशी बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात ७० तर ग्रामीण रुग्णालयात १४ परिचारीका रोजच लढा देत असुन समाजाचा रोष ओढावुन घेत या परिचारीका आपल्या कर्तव्यात कुठेही कमी नाहीत.कोरोनाच्या काळात तर रुग्ण,त्यांचे नातेवाईक आणि राहण्याच्या ठिकाणी अनेकदा अवहेलना वाट्याला या जिगरबाज परिचारीका हिमतीने कोरोनाशी लढा देत आहेत.त्यांचे प्रोत्साहन वाढविण्याच्या उद्देशाने जागतीक परिचारीका दिनानिमित्त नगराध्यक्षा सौ.मैथिली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका महानंदा देशमुख,गटनेते नागनाथ तुम्मोड,अमजद चाऊस,काँग्रेसचे वलिओद्दिन फारुखी,साई संगमवार,नितीन देशमुख,गिरीधर कुलकर्णी,युवानेते संदीप कठारे,साईनाथ खंडेराय यांनी पुष्पहाराने स्वागत केले आहे.

0 comments:

Post a Comment