नांदेड:– नांदेड जिल्हयात उपचार घेणार्या कोरोनाच्या रुग्णांचे बरे होऊन घरी परतणार्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवार दि. 22 मे रोजी तब्बल अकरा रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यासंबंधीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळंकट भोसीकर यांनी दिली.
शहरातील उपचारामध्ये दाखल केलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये एनआरआय कोविड केअर सेंटर यात्री निवास येथील 10 रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारा एक रुग्ण असे बारा जणांना वैद्यकीय अधिकार्यांच्या सल्याने सुट्टी देण्यात आली. या रुग्णांवर मागच्या दहा दिवस उपचार करण्यात आले. या दहा दिवसांच्या काळात कोरोनाची लक्षणे न आढळून आल्याने सुट्टी देण्यात आल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 52 झाली, असून उपचार घेणारे रुग्ण संख्या 56 इतकी आहे.
नांदेड जिल्ह्यात 22 मे पर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 29 हजार 474 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकुण 2 हजार 961 रुग्णांचे स्वब घेण्यात आले आहेत . त्यापैकी 2 हजार 541 स्वब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून गुरुवार 22 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 134 रुग्णांचे अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होतील व 43 रुग्णांचे स्वब तपासणी चालू आहे . सदर घेतलेल्या एकुण स्वबपैकी 116 रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत . 4 गुरुवार 21 मे रोजी प्राप्त झालेले एकुण 87 अहवालांपैकी 6 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे . त्यामध्ये पुरुष ज्यांचे अनुक्रमे वय वर्षे 14 , 18 , 33 , 74 आहे तर दोन स्त्री रुग्णांचे वय अनुक्रमे 34 व 65 आहे . त्यामधील एका पुरुषाचे वय वर्षे 74 यांचा मृत्यू झाला आहे . या रुग्णांपैकी 2 रुग्ण मुखेड तालुक्यातील , एक बिलोली तालुक्यातील तर एक रुग्ण प्रवासी एनआरआय भवन येथे व उर्वरीत दोन रुग्ण हे नांदेड शहरातील लोहारगल्ली भागातील आहेत . एकुण 116 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 52 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . कोरोनाचे 56 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ . शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 42 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये 1 रुग्ण , मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 3 रुग्ण , भोकर ग्रामीण रुग्णालय येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण आहेत . या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य : स्थिर आहे . जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतृ अॅप ” डाऊनलोड करुन घ्यावा , जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील अॅप सतर्क करण्यास मदत करते , असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर यांनी केले आहे .







0 comments:
Post a Comment