नांदेड:- नांदेडकरांसाठी सलग दुसरा दिवस आंनदाची बातमी देणारा असून मंगळवार दि. 5 मे रोजी पाठविण्यात आलेले 57 पैकी 53 कोरोनाची अहवाल निगेटीव्ही आले आहेत.
गत आठ ते दहा दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णंसंख्या वाढत असल्याने प्रशासनासह नांदेडकर चिंतेत होते. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 34 इतकी झाली. यात तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार कोरोनाग्रस्त फ रार असून त्यांचा अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्षात उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 27 इतकीच आहे.मंगळवारी रहमत नगर येथे राहणार्या एक 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, त्या रुग्णालयातील चाळीस जणांचे अहवाल पाठविण्यात आला होता. त्यातील 19 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते.तसेच राजस्थान राज्यातील कोटा येथून आलेल्या 24 विद्यार्थ्यांचे स्वॅबही निगेटीव्ह आलेख असे 64 अहवाल निगेटीव्ह आले होते.
जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या एकूण अहवालांपैकी 57 अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी 53 जणांचे अहवालचा आज निगेटीव्ह आले, असून 4 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.







0 comments:
Post a Comment