नांदेड: शहरातील रुग्णसंख्येचा विचार करता, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण नांदेडमध्ये वाढले, असून आतापर्यंत कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर 35 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.आरोग्य यंत्रणेकडून बुधवार दि. 6 मे रोजी 32 अहवाल प्रलंबित होते. त्यातील 23 अहवाल प्राप्त झाले, असून 22 अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. तर एक जणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. सदरचा सदरची व्यक्ती 56 वर्षांची असून अबचल नगर येथील रहिवासी आहे. या रुग्णास दि. 3 मे रोजी एन.आर.आय. कक्षात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.दि.श 3 मे रोजी या इसमाचा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला होता.परंतु अहवाल निष्कर्षात निघाला नाही.या इसमाची तबियत ढासाळल्यामुळे रात्री साडे आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करून डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाकडे उपचार घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 35 झाली, तर चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.







0 comments:
Post a Comment