जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

04 May 2020

पन्नास तास झाले,तरी पोलिस शोधावरच

नांदेड,:– मागचे पन्नास तास होऊन गेले, तरी पोलिसांना त्या चार कोरोनाग्रस्तांचा शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव अजूनही भांडण्यात आहे. तपास लागत नसल्यामुळे पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गुरुव्दारा परिसरात काम करणार्‍या 97 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील 20 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले होते.वीसच्या वीसही कोरोनाग्रस्त रुग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या नजरकैदेत नव्हते. अहवाल आल्यानंतर शोध मोहीम राबवून रुग्णालयात आणण्यात आले. यातील चार जणांचा पत्ता पोलिसांना लागू शकला नाही. विशेष म्हणते स्वॅब घेत असताना महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पत्ता व मोबाईल नंबर नोंदवून घेणे आवश्यक होते. परंतु तशी ही खबरदारी घेतली नाही.

त्या चार कोरोनाग्रस्तांची माहिती पोलिसांना मिळत नसण्यामागे त्यांचे मोबाईल नंबर नसण्याचे ही एक कारण आहे. परंतु मोबाईल नंबर नसणे म्हणजे तपास न लागणे असे म्हणणे ही गैर ठरू शकते. मागच्या दोन दिवसांपासून त्या कोरोनाग्रस्तांचा तपास लागत नसल्याबद्दल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे. त्या चार जणांमुळे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ही यातील मोठी धोकादायक बाब असल्यामुळे अनेकांना चिंता सतावत आहे.

अधिकार्‍यांचे दुर्लक्ष अन पोलिस हतबल
मुळात आरोग्य अधिकार्‍यांनी स्वॅब घेताना सर्व माहिती जाणून घेतली असती, तर पोलिसांना त्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा तपास लावतना इतका त्रास झाला नसता. पोलिसांनी आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. हे सगळे खरे असले, तरी त्या चार जणांचा शोध लावण्यात पोलिसांना सुद्धा अपयश येत असल्याची चर्चा सामान्यांमधून व्यक्त होत आहे.
——
पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरुच आहे. यासाठी डी.बी.चे पथक नेमण्यात आले आहे.
संदीप शिवले ः पोलिस निरीक्षक वजिराबाद

0 comments:

Post a Comment