जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

15 May 2020

दिलासा : 33 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारामुळे प्रकृती स्थिर

एक लाख 73 हजार 392 नागरिकांकडून " आरोग्यसेतृ " अॅप डाऊनलोड ; कोरोना विरुद्धच्या लढ्यात अॅपचा उपयोग 
नांदेड , दि . 15 : - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत . त्याअनुषंगाने शासनाने आवाहन केल्यानुसार नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 73 हजार 392 नागरिकांनी " आरोग्य सेतृ अॅप ” डाऊनलोड करुन त्याचा वापर सुरु केला आहे . नागरिकांनी मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करुन घ्यावा त्यामुळे सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास या अॅपद्वारे आपणास सतर्क राहण्यास मदत मिळेल असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . शुक्रवार 15 मे रोजी 304 प्रलंबित अहवालापैकी एकही अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला नाही . सध्या 33 पॉझिटिव्ह रुग्णांवर वैद्यकीय पथकांकडून उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . या उपचारामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नांदेड जिल्ह्याला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलासा मिळत आहे . नांदेड जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून आलेले एकुण प्रवासी , प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 1 लाख 8 हजार 928 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून यातील 2 हजार 408 रुग्णांचे नमुने स्वब घेण्यात आले होते . त्यापैकी 2 हजार स्वब तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून 304 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहेत .आतापर्यंत घेतलेल्या स्वबपैकी एकुण 66 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . पैकी आजपर्यंत 26 रुग्णांना कोरोना या आजारातून मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे . सद्यस्थितीत 33 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी -8 रुग्णांवर डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विषणुपुरी नांदेड , तसेच ग्रामीण रुग्णालय बारड धर्मशाळा कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत . तसेच पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे असलेल्या 24 रुग्णांवर उपाचार सुरु आहे . त्यांची प्रकृती स्थिर आहे . औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब , मधुमेह या आजाराने बाधित होते . या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी . जनतेनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची मनात भिती बाळगू नये व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये “ आरोग्य सेतृ अॅप डाऊनलोड करुन घ्यावा जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या अॅपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल , असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी केले आहे . 

0 comments:

Post a Comment