जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

31 May 2020

जिल्ह्यात दोन रुग्ण वाढले ; एकास डिस्चार्ज

मुखेड:- मुंबईहून परतलेल्या तालुक्यातील भेंडेगाव येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. , त्यांच्यावर मुखेड शहरातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. मुखेड शहरातील दोन संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नांदेड शहरातील एका रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.मुखेड तालुक्यात आजवर पाच रुग्ण कोरोना संक्रमित झाले असून, यातील तिघांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आज आलेल्या तपासणी अहवालात मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील मुंबईत परतलेल्या दोघांना कोरोनाचा संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील भेंडेगाव येथील एक कुटुंब खाजगी बसने मुंबईहून आले होते. त्याच खाजगी बसमधील लातूर येथे एक रुग्ण कोराना संक्रमित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्या खाजगी बस मध्ये आलेल्या प्रवाशांना मुखेड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचे अहवाल रविारी प्राप्त झाले.
भेंडेगाव येथील 32 वर्षीय व 27 वर्षाच्या दोन नागरिक कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यातील एका कोरोना बाधित रुग्णांची पत्नी व त्याची मुलगी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मुखेड शहरातील कोविड सेंटरमध्ये काम करणारे एक डॉक्टर व नर्स यांचे अहवाल कोरोशा संक्रमित आले होते. त्याच्या संपर्कात आलेले 24 जणांचे अहलवा निगेटिव्ह आले असून या डॉक्टर व नर्सची प्रकृती चांगली असल्याने त्यांना लवकरच सुट्टी मिळणार असल्याचेही आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
——
चौकट
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 146 झाली. तर 104 रुणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात चार जणांची प्रकृती गंभीर असून यामध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.

0 comments:

Post a Comment