तीस अहवाल सुद्धा निगेटीव्ह
नांदेड:- बुधवारी सकाळी 57 अहवालांपैकी 53 अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यांनतर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 30 अहवाल निगेटीव्ह आले आहे.मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण न सापडल्याने प्रशासनाच्या जीवात जीव आला आहे. तसेच नांदेडकरांसाठी ही सुखद बाब ठरत आहे.नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 382 स्वॅब घेण्यात आले. त्यात एक हजार 291 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. 34 जणांना कोरोनाची लागण झाली, तर तिघांचा कोरेानाच्या आजारामुळे मृत्यू झाला. चार कोरोनाग्रस्त पळून गेलेले अससल्याने 27 जणांवर उपचार सुरु आहेत. खासगी रुग्णालयातील सर्वच्या सर्व चाळीस जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यातील सकाळी 19 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. सायंकाळी 21 जणांचे ही अहवाल निगेटीव्ह निघाले आहेत.तसेच भोकर येथील 9 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. येथील नागरिकांचे ही स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी दिली.







0 comments:
Post a Comment