नांदेड:– सेलू येथून नांदेड येथे उपचारासाठी दि. 28 एप्रिल रोजी दाखल झालेल्या महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना दि. 30 एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले होते. त्या मयत महिलेचे दोन्ही मुलांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या मयत महिलेवर कुटुंबियांची परवागनी घेऊन शुक्रवार दि. 1 मे रोजी नांदेडच येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पहिल्या कोरोना बाधित इसम निगेटीव्ह झाल्यानंतर गुरुवारी दुपारी निधन झाले, तर सेलू येथील महिलेचे त्याच रात्री निधन झाले. त्या मयत महिलेसोबत असलेल्या दोन्ही मुलांना प्रशासनाने क्वॉरंटाईन केले आहे. त्यामुळे सेलू येथू घेऊन जाणे ही शक्य नव्हते. त्यामुळे मयत महिलेच्या नातेवाईकांनी नांदेड येथेच अंत्यसंस्कार करण्यात अनुमती दिली. त्यानुसार नांदेड-वाघाळा महापालिकेच्या पाच कर्मचार्यांनी इदगाह कब्रस्थानमध्ये शुक्रवार दि. 1 मे रोजी त्या मयत महिलेवर अंत्यसंस्कार केले.अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
01 May 2020
Home »
» त्या मयत कोरोनाबाधित महिलेवर नांदेड येथेच अंत्यसंस्कार







0 comments:
Post a Comment