जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

04 May 2020

बिलोली तालुक्यातील हिंगणीमध्ये जुगार अड्यावर धाड

बिलोली :तालुक्यातील हिंगणी येथे जुगार सुरु असल्याच्या माहितीवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . सिद्धेश्वर धुमाळ यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत हिंगणी येथील महिला सरपंचाच्या दिरासह अन्य एकाला अटक करण्यात आली . तर अन्य ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जुगार अड्यावरुन १३ हजार रुपये रोख , दोन मोबाईल असा २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . _ _ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे . त्यासाठी पोलिस आणि अन्य यंत्रणा व्यस्त आहेत . याचा फायदा घेत काही ठिकाणी जुगार अड्डे सुरु आहेत . बिलोली तालुक्यातील हिंगणी येथील सरपंचाचा दीर तथा शिक्षक अनिल गंगाधर नरवाडे यांनी गावाशेजारी असलेल्या शिवारात जुगार पत्त्याचा डाव मांडला होता . याची माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . सिद्धेश्वर धुमाळ यांच्या पथकाने धाड टाकुन विनापरवाना जुगार खेळणाऱ्या राजेश्वर मोतीराम बोबीलवार व अनिल नरवाडे यांना पोलिस भगवान कोत्तापल्ले यांनी फिल्मिस्टाईने धाव घेऊन पकडले . घटनास्थळावरुन दोन मोबाईल , १३ हजार ३०० रुपये रोख रक्कम , जुगाराचे साहित्य जप्त केले . पोलिस येत असल्याची कुणकुण लागताच एस . टी . वाहक पंजाब एकनाथराव इज्जपवार , सय्यद महेबुब मुन्नीमीया , हानमल्लू |रामलू ऐन्लावार , मारोती तोलबा मुखें , मष्णाजी चांदू गायकवाड , गंगाधर सायन्ना उडतलवार ( रेड्डी ) , साहेबराव लिंगुराम बोबीलवार , दीपक माधव रामटक्के यांनी पळ काढला . सहायक पोलिस निरीक्षक पिराजी तायवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बिलोली पोलिसांत संचारबंदी आदेश उल्लंघन कलम १८८ , २६९ , २७० , २७२ भादंवि कलमान्वये या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राम केंद्रे करीत आहेत . उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ . धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पिराजी तायवाडे , पो . ना . भगवान कोत्तापल्ले , पोकॉ चंद्रमनी सोनकांबळे , अनिल सिद्धापूरे आदींनी ही कारवाई केली .

0 comments:

Post a Comment