नांदेड:- नांदेड शहरात एकाच दिवशी वीस कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण निघाल्याने खळबळ उडाल्यानंतर (रविवार दि. 3 मे) रोजी पुन्हा नव्याने तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली, असून रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे. यात दोघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
पंजाब येथे यात्रेकरूंना परतवून आल्यानंतर रुग्णांच्या नांदेडमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली, असून यापूर्वी तीन चालक व एक मदतनिस यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. तर शुक्रवारी श्री. गुरुव्दारा लंगरसाहिब परिसरातील वीस जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले.
पंजाब येथे परतवून आलेल्या नांदेड येथील खासगी टॅ्रव्हल्सच्या 17 चालकांना ताब्यात घेऊन शासकीय आर्युर्वेदीक महाविद्यालयात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यातील तिघांना कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यातील काहींचे दि. 1 मे रोजी नमूने तपासणीला घेतले असता, यात 2 जण कोरोना पॉझिटीव्ह तर इतर एक रुग्ण ही पॉझिटीव्ह आढळून आला, असून त्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.खासगी रुग्णलयात उपचार घेणार्या रुग्णाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतची अधिक माहिती दहा वाजेपर्यंत कळविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.







0 comments:
Post a Comment