जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 May 2020

नांदेडमध्ये उपचार घेत असलेल्या त्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

नांदेड:- सेलू येथून उपचारासाठी नांदेड येथे दाखल केलेल्या त्या कोरानाबाधित महिलेचा (वय.60 वर्षे) गुरुवारी दि. 30 एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. नांदेड येथे पहिला कोराना पॉझिटीव्ह होऊन निगेटीव्ह झालेल्या 64 वर्षीस इसमाचा सुद्धा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. नांदेडमध्ये तीन रुग्णांपैकी दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.नांदेड जिल्ह्यात एक महिन्याच्या काळात एकही रुग्ण न आढळून आल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये गेला होता. परंतु त्यानंतरच्या दोन दिवसानंतर म्हणजे, दि. 22 एप्रिल रोजी पीरबुर्‍हाण नगर येथे राहणार्‍या एका 64 वर्षीय इसमास कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णास वेगवेगळ आजार ही होती. मात्र तीन दिवसांपूर्वी या रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यानंतर गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.या इसमाच्या मृत्यूच्या काही तासांनंतरच रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका साठ वर्षी महिलेचा सुद्धा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. मृत झालेली महिला नांदेड येथे उपचारास येण्यापूर्वी तिच्यावर औरंगाबाद येथे ही उपचार झाल्याचे सांगण्यात येते. मात्र सेलू येथील डॉक्टरांनी त्या महिलेस नांदेड येथे रेफर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्या महिलेस तिचे दोन नातेवाईक रुग्णवाहिका घेऊन 28 रोजी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते.त्यानुसार त्या महिलेस भरती करून घेत उपचार सुरु करण्यात आले होते.त्या महिलेचे नमूने तपासणीला पाठविण्यात आले होते. दि. 29 रोजी रात्री कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला होता. या महिलेच्या तबियतीसंबंधी प्रशासनाच्या वतीने यापूर्वीच काळजी व्यक्त करण्यात आली होती. गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले.

0 comments:

Post a Comment