नांदेड:- नांदेड जिल्ह्यात नवीन आठ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सकाळपासून नऊ रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 106 झाली आहे. तर आतापर्यंत 30 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 69 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
रात्री उशिरा 137 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये 124 रिपोर्टस हे निगेटीव्ह आले, तर 8 रिपोर्टस हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये सहा पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. पुरुषांचे वय हे 55, 41, 25, 34, 54 व एका चार वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. तर महिलांमध्ये 28 व 50 वर्षांच्या दोन महिला आहेत.सहा जण हे कुंभारटेकडी, अबचल नगर -1, करबला-1 अशा आठ जणांचा समावेश आहे. तर सकाळी सापडलेला रुग्णा हा करबला नगर येथील होता. सकाळपासून नऊ रुग्णांची भर पडली आहे.







0 comments:
Post a Comment