नांदेड,:– जिल्हाधिकारी म्हणून बदलीने नांदेड येथे आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. विपुल इटनकर यांच्या मागे नियंत्रणाची मोठी जबाबदारी पडली आहे. सुरुवातीच्या काळात ग्रीन झोनमध्ये आलेला नांदेड जिल्हा आता रेडझोनच्या उंबरठयावर येऊन पोहचला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची 51 इतकी झाली, असून 5 जण या संसर्गाने दगावले आहेत. या सगळया पार्श्वभूमिवर जिल्हाधिकार्यांनी डिजीटल माध्यमाव्दारे पत्रकारांशी तीन वाजता संवाद साधणार आहे. या प्रेसच्या माध्यमातून जिल्हयाला काय संदेश देणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.नांदेड शहरात सर्वाधिक रुग्णांची संख्या अबचल नगर व नगिना घाट परिसरात वाढली आहे. या भागातील परिस्थिती नियंत्रणाचे मोठे आव्हान प्रशासनावर यक्ष प्रश्न रुपाने उभे टाकले आहे. दुसरीकडे शहरातील जागोजागी उभारण्यात आलेली टाळेबंदीचे लाकडी फाटके काढण्यात आली आहेत. तर शेजारच्या हिंगोली जिल्ह्यात एक दिवस आड करून काही अटी-शर्तीवर दुकाने उडण्यास परवानगी दिली आहे. तशी परवानगी नांदेड जिल्ह्यात मिळणार काय? याकडे लक्ष असणार आहे.या सगळया पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर हे जिल्ह्याला उद्देशून काय संदेश देणार याकडे विशेष लक्ष असणार आहे. शहरातील मोजके भाग वगळता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी इतरत्र उद्रेक उडू नये, याची सुद्धा प्रशासनाकडून दखल घेतली जात आहे. त्यामुळे डॉ. इटनकर हे काय सांगतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







0 comments:
Post a Comment