बिलोली: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बिलोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.मैथीलीताई संतोष कुलकर्णी,मुख्यअधीकारी प्रशांत होटकर यांच्या आदेशानुसार बिलोली शहरातील नागरीकांना थर्मल स्क्रिनिंग गनद्वारे तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे.ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ नागेश लखमावार साहेब यांच्या हस्ते थर्मल गन मशीनद्वारे प्रभाग क्रमांक एक पासुन तपासणीला सुरवात करण्यात आली आहे.व त्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी खोकला, सर्दी, श्वसनाचा त्रासाबाबत प्राथमिक तपासणी करून माहिती घेण्यात आली.यावेळी नगरसेवक जावेद कुरेशी.नगरसेविका प्रतिनिधी नितीन देशमुख नगरसेविका प्रतिनिधी अमजद चाऊस.न.प.कर्मचारी गणेश फालके,लईख सिददीखी,रुग्णालयाचे कर्मचारी तोटावार कुंङलवाङीकर, शेख खमर आदी उपस्थित होते.
05 May 2020
Home »
» बिलोली नगरपरिषदेच्या वतीने थर्मल गन मशीनद्वारे नागरीकांची तपासणीला सुरूवात







0 comments:
Post a Comment