जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

26 May 2020

चार रुग्णसंख्या वाढले; 16 रुग्णांना डिस्चार्ज

नांदेड:– बालतपस्वी महाराजासह एक जणाच्या हत्येमुळे उमरी हे गाव देशभर चर्चेला आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे, मंगळवारी एकटया उमरी तालुक्यात चार कोरोनाची रुग्ण सापडल्याने तालुक्याला मोठा हदरा बसला आहे. तर सोळा रुग्णांना मंगळवार दि. 26 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधील प्रयोग शाळेकडून मंगळवार दि. 26 मे रोजी 122 नमूने तपासणीचा अहवालांपैकी 111 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर चार अहवाल हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्वच्या सर्व अहवाल हे उमरी तालुक्यातील आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 133 वरून आता 137 झाली आहे.

नव्याने सापडलेल्या चार रुग्णांमध्ये सात वर्षाच्या मुलगा, 9 व 14 वर्षांची मुलगी व 48 वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे. या सर्वांवार उमरी येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरु असून सर्वांची प्रकृतीस्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

—–
आज तब्बल 16 रुग्ण बरे
आरोग्य यंत्रणेकडून मंगळवार दि. 26 मे रोजी एनआरआय यात्री निवास येथील उपचार घेणार्‍या 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 79 झाली आहे. तर 51 जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच 52 व 55 वय वर्षे असलेल्या दोन महिलांची प्रकृती नाजूक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी सांगितले.

0 comments:

Post a Comment