नांदेड:- मुंबई व पुणे भागातील पायपीट करत नांदेडकडे येणार्या 57 मजूरांना अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर परिवहन महामंडळाने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 57 मजूरांची जिल्हावापसी होऊ शकली आहे. या प्रवाशांची तपासणी करून त्या-त्या गावी पाठविले जाणार आहे.तेलंगणा येथून मध्यप्रदेशाकडे जाणार मध्यप्रदेशातील 22 मजूरांना मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत सोडण्याचे काम महाराष्ट्र परिवहन महामंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपूल इटनकर यांच्या आदेशान्वये सोडण्याचे कामे केे. तसाच सामाजिक दृष्टीकोन पारनेर परिवहन महामंडळाने दाखविला. त्यामुळे सोमवारच्या मध्यरात्री 57 प्रवाशी नांदेड बसस्थानकात आले आहेत.या सर्व मजूरांची तपासणी आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. या मजूरांच्या जेवनाची व्यवस्था स्वामी समर्थ मंदिराकडून करण्यात आली आहे. या मजूरांना आपल-आपल्या गावी सोडण्यासंबंधी महसूल प्रशासनाकडून नियोजन आल्यानंतर गावी सोडण्याची तयारी केली जाणार असल्याचे परिवहन महामंडळाचे वाहतुक नियंत्रक राजकुमार टिपराळे यांनी सांगितले.







0 comments:
Post a Comment