जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

11 May 2020

नांदेडात आज दिवसभरात एका रुग्णाची भर एकूण रुग्ण संख्या 52 वर 5 रुग्णांचा मृत्यू .

आज दिनांक 11 / 05 / 2020 रोजी सायंकाळी 5 . 00 वाजता कोरोना विषाणु संदर्भात खालीलप्रमाणे प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येत आहे . आजतागायत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे 98690 व्यक्तींची तपासणी करण्यात आलेली असून एकूण 1828 रुग्णांचे स्वब घेण्यात आले आहेत त्यापैकी 1702 स्वब तपासणीचा चा अहवाल निगेटिव्ह आलेला असून 38 चा अहवाल प्रलंबित आहे सदर घेतलेल्या एकूण स्वब पैकी 52 तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आलेले आहेत . आता प्राप्त एकूण 115 अहवालानुसार , एन आर आय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील 1 रुग्ण ( पुरुष वय वर्ष 60 ) रा दिल्ली हा पॉझीटिव्ह आढळून आलेले आहेत , तसेच 113 अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत . त्यांची प्रकृती सद्यस्थितीत स्थिर आहे . असे एकूण 52 पॉझीटिव्ह रूग्णापैकी 11 रुग्ण हे डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड व पंजाब भवन कोविड केअर सेंटर आणि यात्रीनिवास कोविड केअर सेंटर येथे 33 रुग्णांवर आणि माहर कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . तसेच पॉझीटिव्ह रुग्णांपैकी 5 रुग्ण हे मृत झाले आहेत . औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण 5 रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यू पावलेले रुग्ण हे रक्तदाब , मधुमेह या आजाराने बाधित होते त्यामुळे सदर आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची आवाहन करण्यात येत आहे . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईल वर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील अॅप सतर्क करण्यास मदत करते .

0 comments:

Post a Comment