नांदेड 21 मे : - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने देशासह राज्यात धुमाकूळ घातला असून नांदेडकरांच्याही चिंतेतही दिवसोंदिवस भर पडत आहे जिह्यात आज आणखीन ६ नव्या रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ११६ वर पोहचला आहे . आज वाढलेल्या रुग्णांमधील २ रुग्ण गाडीपुरा भागातील असुन त्यांना डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते , तर त्यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे , ०१ रुग्ण यात्री निवास , नांदेड येथे दाखल आहे , तर ०२ रावण कुळा , तालुका मुखेड , येथील रहिवासी असून उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दाखल आहेत व ०१ केरुर तालुका बिलोली येथील रहिवासी असून त्याला बिलोली येथील ccc मध्ये दाखल करण्यात आले आहे.तर जिल्ह्यात दिवसोंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने या संकट समयी नागरिकांनी सुरक्षित राहावे अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून नांदेडकरांना करण्यात आले आहे .
21 May 2020
Home »
» धक्कादायक | नांदेडात गुरुवारी आणखी 6 पॉझिटिव्ह वाढले ; एकाचा मृत्यू तर नांदेडच्या बिलोलीतही कोरोनाचा शिरकाव







0 comments:
Post a Comment