धर्माबाद:– टाळेबंदीमुळे उपासमार होणार्या सहा लाख गोरगरिबांना 32 दिवसांच्या काळात येथील सामाजिक कार्येकर्ते सुबोध काकाणी यांनी अन्नदान करण्याचे महत्वाचे कार्य पार पाडले आहे.या तालुक्यात बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा मोलमजुरीवर चालतो. या लॉकडाऊनमुळे सर्वच काम धंदे बंद पडली आहेत. त्यामुळे हाथावर पोट असणार्या लोकांचे हाल होऊ लागले होते. त्यातून सामाजिक कार्यकर्ते सुबोध काकाणी यांनी आपल्या गावकर्यांचे किचन हा उपक्रम सुरू केला.सुरुवातीला काकाणी यांनी शहरातील गोरगरिबांना जेवण देण्यास सुरुवात केली. मात्र ग्रामीण भागात लोकांचे हाल सुरू झाले होते. हे पाहून काकाणी यांनी शहरातील सर्व लोकांना आवाहन करून मदतीची विनंती केली. अनेकांनी आपल्या मदतीचे हाथ पुढे केले. लोकसहभागातून सुरू झालेल्या या अन्नछत्राने तब्बल 32 दिवस गरजूंना जेवण दिले आहे.या उपक्रमासाठी अनेकांनी मिळून पन्नास लाखाच्या आसपास देणगी मिळाली. त्यातून सलगपणे 32 दिवस सहा लाख लोकांना जेवणाची तयार पॉकिटे पुरवण्यात आली. हा उपक्रम राबवत असताना तालुक्यातील प्रत्येकांनी आपला खारीचा का होईना वाटा उचलला. त्यामुळेच अन्नछत्र 32 दिवस चालू शकले. लोकांच्या हाताला काम मिळण्यास सुरुवात झाल्याने हे अन्नछत्र मंगळवार दि. 19 मे रोजीचे जेवण देऊन बंद करण्यात आल आहे. 32 दिवसांच्या काळात धर्माबादकरांनी दाखवलेली एकजूट माणुसकी व्यक्त करणारी ठरली.
19 May 2020
Home »
» काकाणी यांच्या पुढाकाराने 32 दिवसांमध्ये 6 लाख लोकांना अन्नदान;







0 comments:
Post a Comment