जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

10 May 2020

६ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णसंख्या ५१

नांदेड:– नांदेड शहरातील एन.आर.आय. यात्री निवास कोविड केअर सेंटर येथील सहा जणाचां अहवाल रविवारी दि. 10 मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 51 झाली आहे. यात आतापर्यंत पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.रविवार दि. 10 मे रोजी 89 जणांचा स्वॅब प्राप्त झाला आहे. त्यानुसार 82 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला, तर 6 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या सर्वांना कोविड केअर सेंटर एन.आर.आय. यात्री निवास येथे उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.जिल्ह्यातील 51 रुग्णांपैेकी 11 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 31 रुग्ण हे यात्री निवास कोविड केअर सेंटर तर एक रुग्णावर माहूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

0 comments:

Post a Comment