जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

24 May 2020

मठापतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या

नांदेड, 24 मे: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतिनाथ महाराजांचा खून झाला. मठाच्या बाथरूममध्ये आणखी एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे महाराजांचा निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह मारेकऱ्यांनी आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
 
नागठाणा मठात आणखी एक मृतदेह..

नागठाणा मठातील शौचालयात आखणी एक मृतदेह आढळला आहे. चिंचाळा गावातील भगवान शिंदे यांचा हा मृतदेह आहे. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मिळालेली माहिती अशी की, गावातीलच एका माथेफिरू तरुणाने चोरीच्या उद्देशाने हे कृत्य केले. महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटल्याचं बोललं जात आहे. महाराजांचा गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली आहे. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना मठाशेजारी राहणारे नागरिकांना जाग आली असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. महाराजांचा मृतदेह उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

0 comments:

Post a Comment