नांदेड:- गुरुवारी सायंकाळी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यामध्ये पोलिस कॉलनी स्नेह नगर येथील एका इसमाचा समावेश आहे. तो इसम पोलिस नसून कर्मचारी महिलेचा पती आहे. त्या इमास सराफ ा येथे राहणार्या जावयामुळे कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 110 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 36 जण कोरोनामुक्त झाले आहे. पाच जणांचा बळी गेला. 69 जणांवर उपचार सुरु आहेत. मागच्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी आठ तर बुधवारी चार कोरोनाचे रुग्ण आढळून आले. रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणारे रुग्णांची संख्या वाढत, असून मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे दगावल्याची नोंद नोंदविली गेली नाही.
बुधवारी डाक विभागात काम करणारा एक कर्मचारी जो मुंबई येथून आला होता. त्या रुग्णाचे स्वॅब पॉझिटीव्ह आले. नायगाव तालुक्यातील टेंभूणी येथील एक जण मुंबई येथून आले होते. सदरचा अहवाल सुद्धा पॉझिटीव्ह आला. सांगवीमध्ये राहणारा कोरेाना पॉझिटीव्ह रुग्ण कर्नाटकातून आला होता. तर स्नेह नगर येथे राहणारा एक इसम 54 वर्षे आहे. सराफ ा भागात राहणार्या जावयाच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. या रुग्णाच्या संपर्कातील बाधितांची संख्या 7 इतकी झाली आहे.जावयाला भेटायला गेला आणि सासरा कोरानाबाधित झाला, अशी चर्चा सुरु आहे.
तो पोलिस नसून कर्मचारी महिलेचा पती
स्नेहनगर येथील कोरोनबाधित पुरुषाची पत्नी पोलिस खात्यात नौकरीस आहे. या भागातील रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. कुणी पोलिस कर्मचारी असल्याची अफ वा उठली होती. मात्र तो पोलिस नसून पोलिस कर्मचारी महिलेचा पती असल्याचे समोर आले.







0 comments:
Post a Comment