जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

09 May 2020

जम्मू कश्मिरच्या दोन यात्रेकरूंना नांदेडमध्ये कोरोनाची लागण

नांदेड:-  रुग्ण हे जम्मू कश्मिर येथील आहेत.दोन महिन्यांपूर्वी ते नांदेड येथे श्री. गुरुव्दारा दर्शनासाठी आले होते.आतपर्यंत नांदेड व पंजाब या दोन राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. परंतु जम्मू कश्मिर येथून दोन यात्रेकरू हे काही महिन्यांपूर्वी नांदेड येथे दर्शनाला आले होते. परंतु ते दोन रुग्ण हे गावी परतू शकले नाहीत. ते कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यातही कोरोनाचे लक्षणे आढळून आली आहेत.त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या चाळीसवर गेली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला, असून उर्वरीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत.प्रयोग शाळेकडून 54 जणांचे थ्रोट स्ॅवब घेण्यात आले होते. यामध्ये 49 अहवाल निगेटीव्ह आले. 3 अहवाल अनिर्णीत आले तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोन्ही जण कश्मिरी पुरुष असून प्रत्येकी 55 व 57 असे त्यांचे वय वर्षे आहे. या दोन्ही रुग्णांवर रुग्णांवर महसूल कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहे. त्यामुळे कुणीही अफांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंट भोसीकर यांनी केले आहे.

0 comments:

Post a Comment