नांदेड :शहरापुरता मर्यादीत राहिलेले कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागात पाय पसरू लागले आहेत. यापूर्वी बारड व माहूर येथे रुग्ण सापडले. आता भोकर व नायगाव तालुक्यात ही प्रत्येकी एक रुग्ण सापडला, असून भोकर येथील रुग्ण डाक विभागात कर्मचारी आहे. ते नांदेड येथील रहिवासी असून त्यांचे नियमितपणे नांदेड-भोकर येणे जाणे असत.भोकर येथील डाक विभागात नौकरीत असलेल्या एक जणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. या कोरोनाबाधित रुग्णावर भोकर येथेच उपचार सुरु आहेत. सदरील कोरोनाबाधित रुग्णा नांदेडवरून ये-जा करत असत. त्यांच्या संपर्कातील लोकांना प्रशासनाने अलगीकरण कक्षात ठेवले आहे.भोकर येथे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून विविध विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलविली आहे. ही बैठक उशिरापर्यंत सुरु होती. जनता संचारबंदी लावण्याबाबत निर्णय झाला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.अप-डाऊनमुळे धोका वाढला
भोकर येथे सेवेत असणारे विविध विभागाचे कर्मचारी हे भोकर येथे न राहता नांदेड येथून येणे-जाणे करतात. त्यामुळे भोकर शहर व ग्रामीण भागाला अशा अप-डाऊन कर्मचार्यांकडून धोका होण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत.







0 comments:
Post a Comment