जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

01 May 2020

पंजाबमधून परतलेले तीन ट्रॅव्हल्स चालक कोरोनाग्रस्त !

- नांदेडमधील बाधीतांची संख्या ६ , दोघांचा मृत्यू 
नांदेड , दि . १ : पंजाबला यात्रेकरूंना सोडून परतलेल्या ट्रॅव्हल्सच्या तीन चालकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे . गुरुवारी पाठवलेल्या संशयितांच्या स्वबपैकी 3 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . नीळकंठ भोसीकर यांनी दिली . नवीन तिन्ही रुग्ण पंजाब येथे यात्रेकरूंना सोडून परतलेले नांदेडमधील बसचालक असल्याचे मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले . गुरुवारी त्याच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते . शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल आला . नांदेडमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंच्या एका तुकडीला पाच दिवसांपूर्वी पंजाबला नेऊन सोडण्यात आले . दहा खाजगी ट्रॅव्हल्सने हे प्रवाशी गेले होते . यासाठी शासनाने परवानगीही दिली होती . राजकीय लोकांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये या यात्रेकरूंना निरोप देण्यात आला . पंजाब येथून परतल्यानंतर त्या ट्रॅव्हल्स हद्दीबाहेर थांबवून त्यात जंतुनाशक फवारणी करण्यात आली . तसेच बसचालकांना तेथूनच थेट संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले . तेथे गुरुवारी त्यांचा स्वब घेण्यात आला . शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .नांदेडमधील कोरोना बाधितांची संख्या आता सहावर गेली असून त्यातील नांदेडच्या पीर बु - हाननगर येथील ६४ वर्षीय वृद्ध तसेच सेलू येथील ५५ वर्षीय महिला अशा दोघांचा मृत्यू झाला आहे . बाधित चारही जण आता पंजाब येथून परतलेले चालक आहेत . अबचलनगर येथील एका चालकाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्यावर पाच दिवसापासून डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . उर्वरित तिघांवरही डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

0 comments:

Post a Comment