जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

02 May 2020

नांदेड जिल्ह्याची रेड झोनच्या दिशेने वाटचाल नांदेडमध्ये आणखी २० पॉझिटिव्ह रुग्ण

नांदेड:जिल्ह्यातील आज दिनांक 02 / 05 / 2020 रोजी कोरोना विषाणु संदर्भात 09 . 00 वाजे पर्यंत जिल्हा नांदेड येथे 1235 संशयितांची नोंद झालेली आहे , त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे . एकूण घेण्यात आलेते स्वब 1120 व त्यापैकी 1009 निगेटिव्ह असुन 65 स्वब चा अहवाल प्रलंबित आहेत . आजतागायत एकूण 05 स्वब तपासणीचा . आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे . तसेच 14 निष्कर्ष निघालेला नाही . एकूण घेण्यात आलेले खंब 1120 व त्यापैकी आज पर्यंत 6 आणि नव्याने आलेले 20 रुग्णाचा स्वब असे एकूण 26 पॉझीटिव्ह आहेत . पैकी पिरबुरहान नगर ता . नांदेड आणि सेलू ता . परभणी येथील महिला रुग्णाचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे सदर दोन्ही रुग्णाचा मृत्यू झाला आहे . उर्वरित रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
१ . श्री गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील येथील कार्यरत 97 व्यक्तींचे दिनांक 30 / 04 / 2020 व 01 / 05 / 2020 रोजी स्वब घेण्यात येवून तपासणी करण्यात येत आहेत . पैकी 20 रुग्ण हे कोरोना विषाणूमुळे बाधित आढळून आहेत आणि 25 व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह तसेच 11 स्वब हे अनिर्णित आहेत उर्वरित अहवालांची प्रतीक्षा आहे . सदर व्यक्तींना एन . आर . आय . भवन कोविड केयर सेंटर येथे दाखल करण्यात आलेले आहे . मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे . अबचलनगर ता . नांदेड येथील रुग्णाचा पॉझीटिव्ह अहवाल हा दि . 26 / 04 / 2020 रोजी प्राप्त झाला होता . सदर रुग्णाची प्रकृती स्थीर आहे . तसेच त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील 18 व्यक्तींचे स्वब घेण्यात येवून तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते , त्यापैकी 18 व्यक्तींच्या स्वब तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत . तसेच श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड येथील भाविकांना पंजाब राज्यापर्यंत वाहन सेवा पुरवणारे 2 वाहनचालक आणि त्यांचा 1 मदतनीस यांचाही स्वब अहवाल पॉझीटिव्ह प्राप्त झाला आहे . सदर वाहन चालक आणि मदनीस हे दि . 23 / 04 / 2020 रोजी पंजाब येथे जाऊन दि . 28 / 04 / 2020 रोजी परत आले असता त्यांना नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्याच्या सिमेवरच त्यांना अडवून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नदिड येथे दाखल करण्यात आले होते . सदर ३ व्यक्तींचे दि . 29 / 04 / 2020 रोजी स्वब तपासणीसाठी घेण्यात आले होते . सद्यस्थितीत सदर रुग्णांवर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचार सुरु आहे . त्यांची प्रकृती स्थिर आहे . यामधील सांगावी येथील रुग्णांचे 4 निकटवर्तीय व्यक्तींना यात्रीनिवास येथील कोविड केयर सेंटर येथे तर किवळा ता . लोहा येधील रुग्णाचे एकूण ९ निकटवर्तीय व्यक्तींना कोविड केयर सेंटर तालुका लोहा आणि कंधार येथे अलगीकरण करण्यात आले आहे . त्यांची स्वैव घेण्याची प्रक्रिया सुरु आहे . त्यामुळे जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे ( डॉ . निळकंठ भोसीकर ) जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय , नांदेड

0 comments:

Post a Comment