अवेध वाळू वाहतुकीला आशीर्वाद कुणाचे
धर्माबाद - सध्या संपूर्ण जगभरात कोरोना वायरस ने थैमान घातले असून लॉक डाऊनचा पूर्णपणे फायदा मात्र व माफियांना होत आहे ..धर्माबाद तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातून हुनगुंदा वांजरा , नदीपत्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून मनूर , सिरसखोड , मार्ग धर्माबाद शहरात हैदोस घालत आहेत.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनश्याक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत . संचारबंदी असूनही वाळू माफियांच्या धंदा मात्र जोरात चालू आहे . वाळू चोरट्यांनी धुमाकुळ घातल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.लॉकडाउन असूनसुद्धा वाळू जोमाने चोरी करीत आहेत.बिलोली तालुक्यातील हुनगुंदा , माचनूर , गंजगाव येथील नदी पात्राचा व धर्माबाद तालुक्यातील संगम मनूर नेरली बामणी , विळेगाव , ( थंडी ) मोकली , चोंडी , आटाळा , या परिसरातील गोदावरी नदीपत्राचा लिलाव झाला नसताना अवैध वाळू भरली जाते , यात कुणाचे आशीर्वाद हेच कळत नाही , कुणाच्या आशीर्वादा शिवाय शक्य आहे का ?? . चोरट्यांवर कारवाही होणे अपेक्षित आहे . बऱ्याच वेळा ताथुर माथूर कारवाही करून काही रुपये दंड घेऊन टॅक्टर व टिपर सोडले जातात , आणि पुन्हा वैध वाळू भरण्यासाठी ट्रॅक्टर टिपर सज्ज होतात .या ठिकाणचे वाळू लिलाव झालेले नाहीत . तेथील पात्रातील वाळू रात्रीच्या वेळी उपसा करून त्यांची अवैध मार्गाने विक्री करून अव्वाच्या सव्वा पैसे कमावले जात आहेत . अवैध पैशांच्या माध्यमातून वाळू माफिया गब्बर झाले आहेत . काळ्या पैशाच्या जोरावर ते कायदा हातात घेत आहेत . तहसील प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पोलिस यंत्रणेलाही ते घाबरत नाहीत . ते इतके वाढले आहेत की ते पोलीस व तहसील प्रशासनाला आपल्या खिशात ठेवले आहे असे बिनधास्तपाने भरदिवसा पिवळ्या रंगाचे टिप्पर व निळ्यारंगाचे टिप्पर , ट्रॅक्टर ने वाळू बाळापूर ते नटर चौक या मार्गाने धर्माबाद शहरात येत आहे याकडे प्रशासन मात्र जाणून बुजून दूलेक्ष करीत आहे .. या वाहतुकीला आशीर्वाद कुणाचे ? हा खरा प्रश्न उपस्तीथ होत आहे . सध्या धर्माबाद तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि अवैध वाळू वाहतूक हा एक फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे . दोन दिवसांपूर्वी एल सी बी द्वारा यांचा विभागाने वाळूचा टिप्पर वर कार्यवाही केली होती मात्र धर्माबाद प्रशासनाला काही दिसतच नाही अशी कथा झाली.असून वाळू माफिया हे भरदिवसा ची टोळी वेगळी व रात्रीची टोळी वेगळी असे दोन शिफ्ट मध्ये अवैध वाळूची वाहतूक करत आहेत . गेल्या दोन महिन्यांपासून वाळू चोरी करत आहेत.चोरटे मार्ग भरपूर असून या चोरट्या मार्गाने वाळू आणणे सोपे झाले आहे . दिवसात वाळूचे दलाल हे वाळू आणून कुठे टाकायचे आहे .जागा बघून व पूर्ण सर्वे करून आपल्या गुरूला म्हणजे व माफियाला फोन सांगतात आणि ते ऐन रात्रीच्या वेळा वाळूने भरलेले टिप्पर बिनधास्तपणे आणून नेमलेले जागेवर टाकण्याचे काम वाळू माफिया अनेक दिवसांपासून करीत आहेत . तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणे हे अनेक वाळू माफियाचे धंदे बनले आहेत .अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी यांच्यात ही होड लागली आहे.सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांवर उपसामारीची वेळी आली असून मात्र वाळू माफिया हे टिप्पर व ट्रकटर ची बोलणी करून जास्तीजास्त भावाने विकण्याचे काम वाळू माफिया करत आहेत.अवैध वाहतूक करून प्रशासनाला मात्र खुला चॅलेंज देत आहे .या कडे तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनास विशेष लक्ष देऊन होणारी अवैध वाळूची वाहतूकीस अंकुश लावण्याची मागणी जनतेतून होत आहे .







0 comments:
Post a Comment