जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

17 May 2020

कटनमेंट झोन वगळता जिल्ह्यातील काही दुकानांना ठरवून दिलेल्या दिवशी , वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी

नांदेड  दि . 17 : - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अटी व शर्तीच्या अधीन राहून कंटनमेंट झोन वगळता नांदेड जिल्ह्यातील काही दुकाने / आस्थापनांना ठरवून दिलेल्या दिवशी , वेळेत तसेच पुढील आदेशापर्यंत सामाजिक अंतराचे व सुचनांचे पालन करुन सुरु ठेवण्याची परवानगी जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे दिली आहे . या आदेशानुसार महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील शहरी भागातील सर्व मॉल्स , व्यापरी संकूल , आणि बाजारपेठ या बंद राहतील . परंतू अशा व्यापारी संकूलातील व बाजारपेठेमधील अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने चालू राहतील . तसेच सर्व एकल दुकाने , वस्तीतील दुकाने , निवासी संकूलातील दुकाने कंटेनमेंट झोन वगळता , शहरी भागात चालू ठेवण्यास व ग्रामीण भागातील सर्व दुकाने ( मॉल मधील वगळून ) चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे . नमूद सर्व दुकाने चालू ठेवतांना सामाजीक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल असे निर्देशीत केले आहे . नांदेड शहरात कोरोना विषाणुच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील नमूद निर्देशाची जशाच तशी अंमलबजावणी करणे शक्य नाही . त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा नांदेड जिल्ह्यात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग तसेच नांदेड जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून यापूर्वी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशात अंशत : बदल करुन पुढील तपशीलाप्रमाणे आस्थापनांना ठरवून दिलेल्या दिवशी व वेळेत चालू ठेवण्यास पुढील आदेशापर्यंत कंटनमेंट झोन वगळता सामाजिक अंतराचे व नमूद सुचनांचे पालन करण्याचे अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे . सोमवार ते शुक्रवार ( शनिवार व रविवार वगळून ) दुकानाचा प्रकार- अॅटोमोबाईल्स , कॉम्पुटर इलेक्ट्रॉनिक्स , इलेक्ट्रीकल्स , टायर्स , बॅटरी , मोबाईल शॉपी रस्सी , वॉच स्टोअर्स , स्टेशनरी / बुक स्टोअर्स ( पुस्तकालय ) , सायकल स्टोअर्स स्टील ट्रेडर्स बिल्डींग मटेरीयल या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत राहील . रविवार वगळून दररोज किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील . रविवारसह दररोज शेतीविषयक - बी बियाणे औषधे इत्यादींची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत तर हॉस्पीटल मेडीकल स्टोअर्स सुरु ठेवण्याची वेळ 24 तास दररोज देण्यात आली आहे . या दुकाने / आस्थापनाच्या ठिकाणी पुढील उपाययोजना करणे बंधनकारक राहील.यामध्ये कामाच्या ठिकाणी / दुकानात प्रवेशापूर्वी हॅन्डवॉश , सॅनिटायझरचा वापर करणे , एकावेळेस दुकानात 5 पेक्षा जास्त ग्राहकास प्रवेश राहणार नाही . दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्या चेहऱ्यावर मास्क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे , मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्तू / ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत निर्जंतुकीकरण करणे , ग्राहकांकडून खरेदीनंतर पैशाची देवाण - घेवाण आरबीआयच्या सुचनेनुसार ई वॉलेटस व स्वाईप मशीनद्वारे करण्यास भर द्यावा . नेमून दिलेल्या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्यास तसेच उपाययोजनेचा भंग केल्यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदाराकडून आकारण्यात येईल . दुपारी 2 वाजेनंतर नमूद आदेशाप्रमाणे संचारबंदी / जमावबंदी आदेश कायम राहतील . या आदेशाची अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी पथके गठीत करुन पर्यवेक्षणाची जबाबादारी निश्चित करण्यात आली आहे . महानगरपालिका हद्दीत- महानगरपालिका , पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत . नगरपालिका हद्दीत नगरपालिका , पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी संयुक्त पथके गठीत करावीत . तर गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे . वरीलप्रमाणे संबंधीत यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा ( Incident Commander ) यांच्याकडे सादर करावीत . संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमबलजबावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असले .या व्यतीरिक्त नमूद नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालयाचे समक्रमांकीत आदेश , शुद्धीपत्रकानुसार निर्गमीत आदेशातील अटी व शर्ती पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल . संबंधीत यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी तसेच आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही , असे आदेश 16 मे 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत .

0 comments:

Post a Comment