जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

27 May 2020

जिल्ह्यात रात्रीतून दोन खुनाच्या घटनांची नोंद

नांदेड/बिलोली:-लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याच्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी वाढण्याच्या घटनांमध्ये वेगाने नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. मंगळवारच्या रात्री जिल्ह्यात दोन जणांचा खून झाल्याची नोंद आहे. एक घटना बिलोली तालुक्यातील अटकाळी व तर नांदेड तालुक्यातील लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

रविवारी उमरी तालुक्यातील नागठाणा येथे एका बाल साधू व एक शिश अशी दुहेरी खुनाची घटनासमोर आली होती. त्यानंतर मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे. नांदेड तालुक्यातील हसापुर-नसरतपुर शिव रस्त्यावर पत्याचा डाव युवकांचा बसला होता. त्यासाठी वादा-वादी झाली. यात मोहदम वाजिद मोहमद गौस (वय.29) याच्यावर चाकुने हल्ला करून जखमी केले. यात मोहमद वाजिद मोहमद गौस याचा मृत्यू झाला.शासकीय रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास घोटके हे करत आहेत.

ही घटना लिंबगाव पोलिस ठाण्यात हद्दीत घडली, असून पोलिसांना हसापुर-नसरतपुर परिसरातील घटनास्थळ शोधण्यास बरीच कसरत करावी लागली. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला, असून तिन्ही आरोपी फ रार आहेत. या प्रकरणाचा तपास फ ौजदार जी.ए. घोटके हे करत आहेत. सदरची खुनाची घटना पूर्ववैमनश्यातून घडल्याचे घोटके यांनी सांगितले.

दुसरी खुनाची घटना बिलोली तालुक्यातील अटकाळी येथे लेकानेच बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मारेकर्‍याचे वडिल हे सतत दारू पिऊन कुटुंबियांना त्रास देत होते. याचा राग भुजाजी रघुपती (वय.20) वर्षे याने धारदार शस्त्राने पिता मारोती रघुपती(वय.40) यांच्या पोटात चाकु मारला असता रक्तभोंबाळ झालेल्या पिताचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीची आई पारूबाई मारोती रघुपती यांच्या फि र्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

0 comments:

Post a Comment