जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

19 December 2022

भोकर तालुक्यात सर्वाधिक 89.34 टक्के मतदान

नांदेड:दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भोकर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 89.34 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदेड तालुक्यात 71.19 टक्के, अर्धापूर तालुक्यात 88.01 टक्के, हदगाव तालुक्यात 84.12 टक्के, हिमायतनगर तालुक्यात 88.06 टक्के, किनवट तालुक्यात 82.25 टक्के, माहूर तालुक्यात 81.96 टक्के, धर्माबाद तालुक्यात 83.63 टक्के, उमरी तालुक्यात 88.84 टक्के, , बिलोली तालुक्यात 85.84 टक्के, नायगाव तालुक्यात 86.82 टक्के, देगलूर तालुक्यात 86.68 टक्के, मुखेड तालुक्यात 73.39 टक्के, कंधार तालुक्यात 81.69 टक्के, लोहा तालुक्यात 86.57 टक्के एवढे मतदान झाले आहे.सार्वत्रिक निवडणूक 160 ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आली. यामध्ये नांदेड तालुक्यात 6 ग्रामपंचायती, अर्धापूरमध्ये 2, भोकर 3, हदगाव 4, हिमायतनगर 1, किनवट 50, माहूर 26, धर्माबाद 2, उमरी 1, बिलोली 8, नायगाव 8, देगलूर 1, मुखेड 14, कंधार 12, लोहा 22 अशा एकुण 160 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम राबविला गेला. यातील 160 ग्रामपंचायतीसाठी एकुण 489 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान झाले. यात एकुण 77 हजार 467 स्त्री मतदार तर 84 हजार 563 पुरूष मतदार व इतर दोन मतदार अशी एकुण 1 लाख 62 हजार 32 मतदार संख्या होती. यापैकी 62 हजार 999 स्त्री मतदार, 70 हजार 179 पुरूष मतदार असे एकुण 1 लाख 33 हजार 178 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याची सरासरी टक्केवारी 82.19 एवढी होते.

उद्या सकाळी 9 पासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी

नांदेड  :- जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून पुढे सुरू केली जाईल. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. नांदेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह, प्रशासकिय इमारत येथे सकाळी 9 वा. मतमोजणी सुरू होईल. अर्धापूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा., भोकर येथे तहसिल कार्यालय तळमजला येथे सकाळी 10 वा. हदगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वा., किनवट येथे तहसिल कार्यालय येथे सकाळी 10 वा., माहूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., धर्माबाद येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू होईल. उमरी येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा. , बिलोली येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., नायगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., मुखेड येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., कंधार येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., लोहा येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. तर देगलूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल.

16 December 2022

जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम

नांदेड :- जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ऑटोरिक्षांची विशेष तपासणी मोहिम सोमवार 19 डिसेंबर ते रविवार 31 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ऑटोरिक्षा संबंधित सर्व बाबींची काटेकार तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद ऑटोरिक्षा वाहन चालक / मालक यांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना ऑटोरिक्षा, योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आलेली ऑटोरिक्षा चालत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारच्या वाहनांची प्रभावीपणे तपासणी व दोषी वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागासोबत विशेष ऑटोरिक्षा वाहन तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान ऑटोरिक्षा चालक/मालकांनी ऑटोरिक्षाचे सर्व विधीग्राह्य कागदपत्रे सोबत बाळगावीत. ऑटो रिक्षा चालकांनी युनिफॉर्म / बॅज घालावे. वाहनांवर मीटर / नो एन्ट्री बार लावून वाहन चालवावे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करु नये. विना परवाना प्रवासी वाहतूक करु नये. धोकादायक पध्दतीने वाहन चालवू नये. वाहनचालकाच्या बाजूला अनधिकृत सीट बसवू नये. नो पार्किंग / नो एन्ट्रीमध्ये वाहन चालवू नये असे प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी

नांदेड, :- नांदेड जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2022 रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी.

राज्य निवडणूक आयोगाने निर्गमीत केलेल्या आदेशाप्रमाणे निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिले. उदा. खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी.

अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ऐवजी कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल.मात्र त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासन परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी निर्गमीत केले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश

नांदेड, :- जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएलबीआर-2, टि.डी - 1 अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहे.जिल्ह्यात मतदानाचा पूर्वीचा दिवस शनिवार दिनांक 17 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 संपूर्ण दिवस निवडणूक होणाऱ्या संबंधित ग्राम पंचायतचे कार्यक्षेत्रामध्ये अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येणार आहे.नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र देशी दारू नियम, 1973 चे नियम 26 (1) (सी) (2) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या ) नियमावली, 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (2) मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

09 December 2022

श्री खंडोबा माळेगाव यात्रेनिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड : - माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रम शांततेत पार पडावे . त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 20 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्रीपासून ते 28 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा . पोलीस निरीक्षक माणिक डोके यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत . श्री खंडोबा यात्रेत महाराष्ट्र , तेलंगणा , आंध्रप्रदेश , कर्नाटक , इतर राज्यातून भाविकांची दर्शनासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते . त्या अनुषंगाने रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे हे फर्मविण्यासाठी . अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करण्याबद्दल . सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा - अर्चेच्या प्रार्थना स्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा - अर्चेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबद्दल . सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यांमध्ये , घाटांत किंवा घाटांवर , सर्व धक्क्यांवर व धक्क्यांमध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या , कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागांमध्ये , जत्रा , देवालये आणि सार्वजनिक स्थळी किंवा लोकांच्या जाण्या येण्याच्या जागेमध्ये सुव्यवस्था राखण्याबद्दल . तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी व सूचना देण्यासंबंधी . महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 , 35 ते 40 , 42 , 43 , 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे सुव्यवस्था राखणे कामी योग्य आदेश देण्याबाबत . कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा . पोलीस निरीक्षक माणिक डोके यांचेकडून रहदारीचे नियम व मार्गाबाबत सुचना कार्यक्रमाची तारीख , वेळ , जाहीर सभा , मोर्चे , मिरवणूक , निदर्शने , पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे . परवानगी दिलेल्या जाहिर सभा / मिरवणूका / पदयात्रा यात समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये . हा आदेश लग्नाच्या ठिकाणी , प्रेत यात्रेस लागू नाही . या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल , असे आदेशही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत .