जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 June 2023

सर्व्हर डाऊनमुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र रखडले

बिलोली: शासन आपल्या दारी ही योजना अर्जदारांचे प्रकरण ताबडतोब निकाली निघाले पाहिजे या उद्देशाने कोट्यावधी रुपये खर्च करून राबवली जात आहे. प्रत्यक्षात बिलोली तहसील कार्यालयातील कर्मचारी हे प्रमाणिकपणे जर काम करत असले तर दाखले लवकरात लवकर मिळतात मात्र तहसील कार्यालयात मात्र पूर्ण पणे भ्रष्टाचर चालू आहे पैसे घेतल्या शिवाय कोणतेचकाम लवकर होत नाही. त्यातच महा ऑनलाईन प्रनालीचा नेटवर्क सरवर डाउन राहात असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण कामासाठी लागणारे प्रमाणपत्र डाऊन सर्वरच्या कचाट्यात सापडले आहे.

पालक आपल्या पाल्यांचा शैक्षणिक नुकसान होत की काय या चिंतेने हतबल होऊन तहसील कार्यालय ते सेतू सुविधा कंद्रावर चकरा मारतांना दिसुन येत आहे. तसेच बहुतांश प्रमाणपत्र एरर मुळे अडकत असल्याने अर्जदारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने एरर मुळे अडकलेली प्रमाणपत्रे हरिअप्रूव करुन त्याच दाखल केलेल्या कागदावरच प्रमाणपत्र देण्यात यावे अशीही मागणी पालकातून केली जात आहे. त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि आर्थिक भुदंड पासून वाचतील असे बोलले जात आहे.दि २५ जुन २०२३ रविवार रोजी राज्याचे मुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री व डजन भर लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी या कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी राजाचे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या सोयी - सुविधेसाठी शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जनकल्याणकारी उपक्रमे राबवली जात असल्याचे सांगितले. ही योजना जरी नागरिकांसाठी उपयुक्त असले तरी ती योजना मात्र कागदावरच आहे की काय ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांमधून उपस्थित केला जात आहे. शासनाची शासन आपल्या दारी ही योजना पूर्णतः अमलात आणण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी या कडे लक्ष देऊन सरवर डाऊन च्या कचाट्यात अडकलेले विद्यार्थ्यांचे विविध प्रमाणपत्र मिळण्यासाठी महा ऑनलाईनचा नेट सरवर सुरळीत करतील काय असा प्रश्न जनसामान्यातुन केला जात आहे.

25 June 2023

दीर्घायु व्हायचे असेल तर शेतात काम करा हवामान तज्ञ - पंजाब डक

भोकर: मानवास दीर्घायु व्हायचे असेल तर शेतात काम करणे गरजेचे आहे असे विचार महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी भोकर येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भोकर व संदीप पाटील गोड मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या शेतकरी मार्गदर्शन व सन्मान डोळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते श्री शिवाजी पाटील किन्हाळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, जि. प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सभापती गोविंद बाबा गौड, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव तथा संपादक उत्तमरावजी बाबळे, ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष माधवराव अमृतवाड, आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेती औजारांचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना त्यांनी सांगितले की यावर्षी नांदेड जिल्ह्यात भरपूर पाऊस होईल तेव्हा शेतकऱ्यांनी न डगमगता जमिनीची ओली नऊ इंच भिजल्यानंतर पेरणी ला सुरुवात करावी. कापसाची लागण करताना शेतकऱ्यांनी लागवडीचे अंतर कमी करून बियाण्यांची संख्या वाढवावी तसेच शेतात उताराच्या बाजूने चर काढावे जेणे करून जास्तीचा झालेला पाऊसनिचरा होऊन उत्पन्न चांगले होईल निसर्गाच्या बदलाप्रमाणे शेतकरी ही बदलला पाहिजे तरच तो टिकाव धरणार आहे. प्रचंड झाडांच्या कतली झाल्यामुळे माळरान ओसाड झाला आहे त्यामुळे हवेतील तापमान प्रचंड वाढले असून यामुळे आपला हक्काचा पाऊस इतरत्र जात आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर व मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करा यासह आदी महत्त्वाच्या बाबी त्यांनी शेतकऱ्यांना सांगून शेतकऱ्यांनी निसर्गाकडे अत्यंत बारकाईने निरीक्षण करावे जेणेकरून निसर्गाचे संकेत आपल्याला ओळखता येतील असा मौल्यवान संदेश त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर माजी जि. प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सभापती गोविंद बाबा गोड, शेतकरी नेते शिवाजी पाटील किनाळकर, आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात तालुक्यातील शेतीनिष्ठआनंदराव रामजी रूमनवाड,
भुमाजी संभाजी टाकळे,
संजय नामदेव आरलवाड,
प्रकाश किशनराव देशमुख,
नंदकिशोर दिगंबर गायकवाड,
प्रतापराव जगदेराव कल्याणकर,
वरील सर्व शेतकऱ्यांचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भोकर व संदीप पाटील गौड मित्र मंडळाच्या वतीने सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला याकर्माचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी केले तर पत्रकार संघाचे सचिव आर. के. कदम यांनी प्रमुख मार्गदर्शक पंजाबराव डक यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन श्रीकांत मुक्कानवार व विपीन पवनकर सर यांनी केले तर आभार संदीप पाटील गौड यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, कमलाकर बरकमकर कोषाध्यक्ष बालाजी कदम, विठ्ठल सुरलेकर, गजानन गाडेकर, शुभम नर्तावार, सुधांशू कांबळे, संदेश कांबळे, संभाजी कदम, विशाल जाधव, अंबादास बोयावार, निळकंठ पडवळे, श्रीकांत बाबळे व संदीप पाटील गोड मित्र मंडळाने मौलाचे योगदान दिले तर या कार्यक्रमास तालुक्याभरातून असंख्य शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील ९ वा आरोपी अटकेत

नांदेड (Nanded)शहरापासून जवळच असलेल्या बोंढार हवेली (Bondar haveli)येथील मागासवर्गीय समाजातील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी या निर्घृण हत्येतला ९ वा आरोपी २४ व्या दिवशी नांदेड पोलिसांनी पकडला आहे. १ जून रोजी बोंढार हवेली गावात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पहिल्यांदा जयंती काढल्याचा राग मनात धरून जयंतीसाठी पुढाकार घेणाऱ्या अक्षय भालेराव या तरुणाचा गावातील एका लग्नाच्या वरातीत जातीय मानसिकतेतून खंजरने भोसकून हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी व प्रत्यक्षदर्शींनी केला होता.

त्यानंतर अक्षयचा भाऊ आकाश भालेराव याच्या तक्रारीवरून ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ८ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले होते. या प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी आज बाबूराव तिडके या ९ व्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी या आरोपीला उद्या न्यायालयात हजर केले जाईल..

22 June 2023

२४ जून रोजी भोकर येथे सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांचा सन्मान व शेतकरी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन

भोकर प्रतिनिधी - राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका. शाखा भोकर व संदिप पाटील गौड मित्र मंडळाच्या वतीने शनिवार,दि.२४ जून २०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता,माऊली मंगल कार्यालय,किनवट रोड भोकर येथे तालुक्यातील काही शेतीनिष्ट शेतकरी व सुप्रसिद्ध हवामान तज्ञ तथा शेती विषयाचे गाढे अभ्यासक पंजाबराव डख पाटील यांचा सन्मान आणी शेतकरी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या सोहळ्यास शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

 "बदलत्या पाऊसमानाचा अंदाज व अनुरूप पिक पद्धतीचा अवलंब" या विषयावर हवामान यज्ञ पंजाबराव डख पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.सदरील सोहळ्यात काही शेतनिष्ठ शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार असून सदरील सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भोकर पंचायत समितीचे माजी सभापती गोंविद बाबागौड पाटील, शेतकरी तथा जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर,भोकर तहसिल चे तहसिलदार राजेश लांडगे, नांदेड जि.प.चे माजी कृषि सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,भोकर बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर,ओबीसी नेते नामदेव आयलवाड, प्रगतशील शेतकरी भगवान दंडवे,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव आमृतवाड, सेवानिवृत्त तालुका कृषि अधिकारी रमेश देशमुख,कापुस पिक अभ्यासक मोहन देशमुख बारडकर, भोकर कृषि असोसिएशन चे अध्यक्ष उत्तम देशमुख बटाळकर, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,रा.पुरोगामी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकुर यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.पाऊस लांबल्याने खरीप पेरण्या खोळबंल्या आहेत.पेरण्या उशिरा होत असल्याने शेतकरी बांधवांनी कोणती पिके घ्यावीत व पुढे पाऊसमान कसा राहील या विषयी हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी या सोहळ्यास शेतकरी बांधवानी बहुसंख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालूका शाखा भोकर चे अध्यक्ष,सर्व पदाधिकारी व संदिप पाटील गौड मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी बांधवांनी केले आहे.


21 June 2023

24 जुन रोजी भोकर येथे सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांचा सन्मान व शेतकरी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन

भोकर - राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ता. शाखा भोकर व संदिप पाटील गौड मित्र मंडळाच्या वतीने शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सायंकाळी 05:00 वाजता, माऊली मंगल कार्यालय किनवट रोड भोकर येथे तालुक्यातील काही शेतीनिष्ट शेतकरी व सुप्रसिद्ध हवामान तज्ञ तथा शेती विषयाचे गाढे अभ्यासक मा. पंजाबराव डख पाटील यांचा सन्मान आणी शेतकरी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
      "बदलत्या पाऊसमानाचा अंदाज व अनुरूप पिक पद्धतीचा अवलंब" या विषयावर मा.पंजाबराव डख पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. सदरील सोहळ्यात काही शेतनिष्ठ शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार असून या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. गोंविद बाबा गौड पाटील, शिवाजी पाटील किन्हाळकर, राजेश लांडगे, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जगदीश पाटील भोसीकर, नामदेव आयलवाड, भगवान दंडवे माधव आमृतवाड, रमेश देशमुख,मोहन देशमुख बारडकर, उत्तम बाबळे, शंकरसिंह ठाकुर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या सोहळ्यास शेतकरी बांधवानी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालूका शाखा भोकर चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि संदिप पाटील गौड मित्र मंडळ यांनी केले आहे.

18 June 2023

गौतमीला पाहून प्रेक्षक आऊट ऑफ कंट्रोल, हुल्लडबाजीमुळे अवघ्या १० मिनिटांत कार्यक्रम संपला, पोलिसांचा लाठीमार

धर्माबाद: सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौतमी पाटीलचा शो पुन्हा चर्चेचा ठरला. प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटीलला अवघ्या दहा मिनिटातच कार्यक्रम बंद करावं लागलं. तर प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सोम्य लाठीमार देखील करावा लागला. या अर्धवट कार्यक्रमामुळे आयोजकांसह प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळाली. जिल्ह्यातील धर्माबाद शहरात शनिवारी रात्री या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं.शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आकाश रेड्डी यांच्या वतीने नांदेडमध्ये पहिल्यांदा गौतमी पाटीलच्या लावणीचे आयोजन करण्यात आलं होतं. गौतमी पाटील येणार म्हणून कार्यक्रम स्थळी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. तर गौतमीला पाहण्यासाठी आलेल्या महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहा वाजताची होती, पण रात्री नऊ वाजता गौतमी पाटीलच स्टेजवर आगमन झालं.
यावेळी स्टेज जवळ येताच तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. गौतमीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लाकडी बॅरिगेट्स तोडून स्टेज जवळ गर्दी केली होती. या प्रचंड गर्दीत ही गौतमी पाटीलने मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. मात्र, तिच्या चाहत्यांनी गोंधळ सुरु केला. एवढंच नाही तर खुर्च्यांची देखील तोडफोड केली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला होता. हा गोंधळ पाहून गौतमी पाटीलला अवघ्या दहा मिनिटातचं कार्यक्रम बंद करावं लागलं. केवळ दीड गाण्यावर नृत्य सादर करुन तिने स्टेज सोडलं .
गौतमी पाटील कडून प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन
गौमती पाटीलच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. आयोजकांकडून प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केलं जातं होतं. तरीही प्रेक्षकांचा गोंधळ सुरूच होता. शेवटी गौतमी पाटील हिने स्वतः हातात माईक घेऊन प्रेक्षकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. आम्ही एवढ्या दुरून आलोत, सुखरूप कार्यक्रम पार पाडा असे आवाहन देखील तिने केले. मात्र, प्रेक्षकांचा गोंधळ काही थांबला नाही. शेवटी गौतमी पाटीलने स्वतःहून शो बंद केला.

पोलिसांची पुन्हा दमछाक
गौतमी पाटील नांदेड जिल्ह्यात पहिल्यांदा येणार असल्याने तरुणाईने मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. एवढचं नाही तर खुर्च्यांची तोडफोड देखील केली. प्रेक्षकांची ही हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक झाली. पोलिसांना सोम्य लाठीमार देखील करावा लागला.

17 June 2023

कायदा,शांतता व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भोकरमध्ये झाले पोलीस पथसंचलन

भोकर प्रतिनिधी (अंबादास बोयावर )
भोकर : बकरी ईद व सण उत्सवाच्या काळात कायदा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या पार्श्वभूमीवर भोकर पोलीसांच्या वतीने जलदगती दंगा नियंत्रण पोलीस पथकासह भोकर पोलीसांनी शहरातील मुख्य रस्त्याने अगदी शिस्तबद्धतेने दि.१७ जून रोजी पथसंचलन केले आहे.आगामी सण उत्सवांच्या दरम्यान कायदा,शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व पोलीस प्रशासन नागरिकांच्या सेवा सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहिल असा विश्वास नागरिकांत दर्शविण्याच्या पार्श्वभूमीवर भोकर पोलीस ठाणे प्रांगण येथून सकाळी १०:०० वाजता निघालेले पथसंचलन डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रशीद टेकडी,हिंदू दहनभूमी,शासकीय ग्रामीण रुग्णालय, टिपू सुलतान चौक,आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे चौक, बस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,तहसील कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अशा प्रकारे शहरातील मुख्य रस्त्याने मार्गस्थ झाले व सकाळी ११:०० वाजता परत पोलीस ठाणे प्रांगणात येऊन त्याची सांगता करण्यात आली.

सदरील पथसंचलनात रंगा रेड्डी अल्फा ९९ बटालियन (रॅपिड ॲक्शन फोर्स ९९ बटालियन) जलदगती दंगा नियंत्रण पथकाचे प्रमुख डेप्युटी कमांडंट टी.पी.बघेल, पोलीस निरीक्षक जटाशंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली ७४ जवान,भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना(आयपीएस),भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस अधिकारी व २० कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला होता.भोकर शहरातील मुख्य रस्त्याने अगदी शिस्तबद्धतेने काढण्यात आलेले हे पथसंचलन शहरवासीयांचे आकर्षण ठरल्याने ते पाहण्यासाठी पथसंचलन मार्गावर नागरिकांची उत्स्फूर्त अशी एकच गर्दी केली होती.

08 June 2023

अन्यथा नांदेड विमानतळ आम्ही पुढील तीन महिन्यात सुरू करु- उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

▪️विमानतळाच्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री सावंत यांनी घेतला आढावा
 
नांदेड :- नांदेड येथील विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत मागील अनेक महिन्यांपासून सर्व स्तरातून तक्रारी येत आहेत. लातूर, हिंगोली, परभणी, बिदर या अशा पाच जिल्ह्यातील अनेक प्रवाशांसाठी येथील विमानतळाची सुविधा ही अत्यंत गरजेची आहे. याच बरोबर नांदेड येथील शिख भाविकांची जगभरातून वर्दळ सुरु असते. एका बाजूला मोठ्या संख्येने विमान प्रवासी असूनही येथील विमानतळाच्या कुशल  व्यवस्थापना अभावी येथील प्रवासी विमान सुविधा बंद पडली. सदर विमानतळ चालविणाऱ्या एजन्सीने यात तात्काळ सुधारणा केल्या नाहीत तर राज्याच्या उद्योग विभागामार्फत इतर विमानतळाच्या धर्तीवर नांदेड विमानतळ उद्योग विभागातर्फे येत्या तीन महिन्यात सुरु करू, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.
 
नांदेड विमानतळाच्या सुविधांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक विमानतळ येथे संपन्न झाली. या बैठकीस खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, रिलायन्स एअरपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारीख बट्ट, प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
एमआयडीसीमार्फत राज्यातील अनेक ठिकाणी सक्षमपणे विमानतळाचे व्यवस्थापन केले आहे. नांदेड विमानतळाबाबत अनेकांच्या तक्रारी लक्षात घेता यात तात्काळ सुधारणा गरजेचे आहे. येथील कामे तात्काळ सुरु न झाल्यास या विमानतळाचे व्यवस्थापन आमच्याकडे घेवून आम्ही अधिक सक्षमतेने हे विमानतळ चालवून प्रवाशांना सुविधा देवू असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
 नांदेड येथील उद्योजकांच्या बैठकीतही अनेक उद्योजकांनी विमानतळ सुविधेबाबत प्रश्न उपस्थित करुन उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. उद्योजक शैलेश कऱ्हाळे, आनंद बिडवई, बंगाली, महेश देशपांडे यांनी विमानतळाचा मुद्दा उपस्थित करुन नांदेड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील उद्योग जगताला चालना देण्यासाठी, एक्सपोर्टसाठी येथील सुविधा व विमानसेवा तात्काळ सुरु करण्याची आग्रही मागणी केली.  
 

07 June 2023

सावित्राबाई शानमवाड यांचे निधन

भोकर प्रतिनिधी:- तालुक्यातील मौजे नागापुर येथील प्रतिष्ठित जेष्ठ महिला सावित्राबाई गंगाधर पाटील शानमवाड वय ७५ वर्षे यांचे दि. ७ जुन २०२३ रोज बुधवारी दुपारी १ वाजता त्यांच्या रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर दि.८ जुन २०२३ रोज गुरुवारी दुपारी १ वाजता राहत्या गावी मौजे नागापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती,चार मुले,एक मुलगी,सुना,नातु,पनंतु असा मोठा परिवार असून त्या भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बालाजी पाटील शानमवाड व मोजे हाळदा येथील सरपंच सौ.सुमनबाई माधवराव नागमोड यांच्या मातोश्री होत.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन

 नांदेड  :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या वितरण नियोजनासाठी राज्यात गाव पातळीवर व सर्वत्र मोहीम राबवून ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करण्याचे निर्देश आहेत. ई-केवायसी प्रमाणीकरण अभावी कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यकांचे मदतीने प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार संलग्न काम करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  

केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामायिक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्याची ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान ॲप अँड्रॉइड मोबाईलवर फेस ऑथेंटीकेशनद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाही केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच इतर 50 लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचाऱ्यामार्फत गाव पातळीवरील सर्व प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण व आधार संलग्न करुन घ्यावे. कमी वेळ शिल्लक असल्याने शनिवार रविवार यादिवशी काम सुरू ठेवण्यात येणार आहे. ॲपच्या माध्यमातून तात्काळ प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

माझी वसुंधरा अभियानात विभाग स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुंडलवाडी नगरपरिषदेला विभाग स्तरावर 1 कोटी रुपयांचे बक्षिस

माझी वसुंधरा अभियानात विभाग स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यात नांदेडला बहुमान    

· कुंडलवाडी नगरपरिषदेला विभाग स्तरावर 1 कोटी रुपयांचे बक्षिस  
 
नांदेड :- पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची गुणाक्रमानुसार निवड महाराष्ट्र शासनाने जाहीर केली आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यावतीने या निवडीबाबत शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. या अभियानात कुंडलवाडी नगरपरिषदेला 15 हजार पेक्षा लोकसंख्येच्या गटातील विभागीय स्तरावरचे 1 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. याचबरोबर नांदेड जिल्हाधिकारी यांना विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याचा बहुमान मिळाला आहे. 

माझी वसुंधरा अभियान 3.0 हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात आले. यात राज्यातील 411 नागरी स्थानिक संस्था व 16 हजार 413 ग्रामपंचायती अशा एकुण 16 हजार 824 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला. या निवडीसाठी तीन गट ठेवण्यात आले होते. यात अमृतगट, नागरी स्थानिक संस्था, ग्रामपंचायत असे गट करण्यात आले. त्या-त्या संस्थांनी केलेल्या कार्याच्या मूल्यमापनासाठी त्रयस्त यंत्रणेवर जबाबदारी देण्यात आली होती. या त्रयस्त यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रावरील कामाचे मूल्यमापन व डेस्कटॉप कामाचे मूल्यमापन करण्यात आले. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आनंद व्यक्त केला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे डेहराडून येथे भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी काही दिवसांसाठी गेले आहेत.  

हळदा ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

आज हळदा ग्रामपंचायत मध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण माजी उपसरपंच बी आर एस सी नेते सचिन पाटील शिंदे यांच्या हस्ते यावेळी उपस्थित सरपंच हनुमंतराव हाळदेकर ग्रामसेवक शिंदे साहेब राजमुद्राचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे बाबू मामा शिवाजी पाटील वसुरे गोविंद तीगुलवाड शरीफ शेख महमूद शेख जगजेराव पाटील ढोणे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळा का साजरा केला जातो?

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाला शिवप्रेमी गडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात. शिवराज्याभिषेक दिन हा ६ जूनला सुरु होतो. शिवराज्याभिषेक सोहळा हा सहा दिवस चालला होता १२ जूनला तो पूर्ण झाला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा करण्यात येतो.

04 June 2023

हाळदा येथे महिलांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान

भोकर :- तालुक्यातील मोजे हाळदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या बालविकास व अंगणवाडी विभागातील महिलांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आलेले प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पाचशे रुपये देऊन ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुमनबाई माधवराव नागमोड यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.
   महिला व बाल विकासासाठी झटणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या कार्य कौशल्याचा गौरव व्हावा व त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या बालविकास विभागाकडून प्रत्येक गावातील अंगणवाडी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पाचशे रुपये देऊन गौरव करण्यात आला. यात हाळदा येथील श्रीमत कल्पना गोविंदराव भोसले व सौ.सविता बालाजी आमेटवाड या दोन महिलांच्या विशेष योगदानाबद्दल सरपंच सौ.सुमनबाई माधवराव नागमोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी अंगणवाडीच्या सुपरवायझर राव मॅडम, ग्रामसेवक राजकुमार विजापुरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मारोती पेरेवार, चेअरमन दत्तराव अक्कलवाड, भुजंगराव भोसले, दत्ता यदलेवाड, अंगणवाडी सेविका सौ.किसवे, सौ.आरलेवाड,अंगणवाडी मदतनीस आदी सह ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.