भोकर - राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ता. शाखा भोकर व संदिप पाटील गौड मित्र मंडळाच्या वतीने शनिवार दि. 24 जून 2023 रोजी सायंकाळी 05:00 वाजता, माऊली मंगल कार्यालय किनवट रोड भोकर येथे तालुक्यातील काही शेतीनिष्ट शेतकरी व सुप्रसिद्ध हवामान तज्ञ तथा शेती विषयाचे गाढे अभ्यासक मा. पंजाबराव डख पाटील यांचा सन्मान आणी शेतकरी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
"बदलत्या पाऊसमानाचा अंदाज व अनुरूप पिक पद्धतीचा अवलंब" या विषयावर मा.पंजाबराव डख पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. सदरील सोहळ्यात काही शेतनिष्ठ शेतकऱ्यांचाही सन्मान करण्यात येणार असून या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. गोंविद बाबा गौड पाटील, शिवाजी पाटील किन्हाळकर, राजेश लांडगे, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जगदीश पाटील भोसीकर, नामदेव आयलवाड, भगवान दंडवे माधव आमृतवाड, रमेश देशमुख,मोहन देशमुख बारडकर, उत्तम बाबळे, शंकरसिंह ठाकुर यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या सोहळ्यास शेतकरी बांधवानी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालूका शाखा भोकर चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि संदिप पाटील गौड मित्र मंडळ यांनी केले आहे.







0 comments:
Post a Comment