जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

06 December 2021

ग्राम शाखा अर्जापूर च्या अध्यक्षपदी शुभम पतंगे तर सरचिटणीस पदी स्वप्निल वाघमारे यांची निवड

 बिलोली (ता.प्र) समाज मंदिर अर्जापुर तालुका बिलोली येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा स्थापन करून कार्यकारणी जाहीर करण्यात आली. प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बालाजी वारघडे सर, केंद्रीय शिक्षक गवलवाड सर, सरचिटणीस नागोराव वाघमारे, तालुका संघटक शिलानंद गायकवाड, धनराज एडके, उत्तम लंके यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर त्रिसरण पंचशील घेण्यात आले. नंतर नागोराव वाघमारे, धनराज एडके, केंद्रीय शिक्षक गवलवाड सर यांनी भारतीय बौद्ध महासभेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी वारघडे सरांनी त्यांच्या मनोगतात गाव तेथे शाखा स्थापन करण्याचे आवाहन केले व कार्यकारणीची निवड करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिलानंद गायकवाड यांनी केले.

29 October 2021

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानाचा हक्क बजवता यावा यासाठी 30 ऑक्टोंबरला मतदारांना मतदानासाठी सुट्टी

नांदेड दि . 29 : - देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावता यावे यासाठी शनिवार 30 ऑक्टोंबर रोजी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश शासनाने परिपत्रकाद्वारे निर्गमीत केले आहे . निवडणुकांमध्ये 100 टक्के मतदान हे अपेक्षित आहे . ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 ( भाग 2 ) मधील 135 ( ब ) नुसार मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा कामाच्या तासात न्यायोचित सवलत देण्याचे प्रावधान आहे . मात्र अलिकडच्या काळात काही संस्था , आस्थापना या भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्यामुळे याचा विपरीत परिणाम मतदानावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे . मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागणे हे लोकशाहीसाठी घातक लक्षण समजले जाते . यादृष्टिने शासनाच्या उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाने गांभीर्याने विचार करुन निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात असलेल्या कामगार , अधिकारी , कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी दिली पाहिजे . याचबरोबर मतदार जर निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असतील तर त्यांनाही सवलत दिली पाहिजे . सदर सुट्टी खासगी कंपन्यामधील आस्थापना , सर्व दुकाने व इतर आस्थापना , निवासी हॉटेल , खाद्यगृह , नाट्यगृहे , व्यापार , औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या , शॉपिंग सेंटर , मॉल्स , रिटेलर्स आदी उद्योग , ऊर्जा कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना , कारखान्यांना लागू राहिल . 5 LTE अपवादात्मक परिस्थितीत जर एखादा अधिकारी , कामगार , कर्मचारी आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी किमत कमी दोन तासाची सवलत देता येईल . मात्र त्याबाबत संबंधित आस्थापनांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे . मतदारांकडून मतदानाकरीता सुट्टी अथवा योग्य ती सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य झाले नाही आशा प्रकारची तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कार्यवाही केली जाईल , असेही उद्योग , ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे .

04 October 2021

साबणेंच्या भाजपा पक्ष प्रवेशाकडे खतगावकरांनी फिरविली पाठ

देगलुर:माजी आ . सुभाष साबणे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला परंतू देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघावर ज्यांची छाप आणि पकड आहे असे माजी खासदार तथा भाजपाचे जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याकडे पाठफिरविल्याने ऐन निवडणूकीच्या धामधुमीत खतगावकरांचे कार्यकर्ते सैरभैर झाले असल्याचे सांगण्यात येते . शिवसेनेचे माजी आ . सुभाष साबणे यांनी कालच देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपाने उमेदवारी जाहीर केली होती . त्याच अनुषंगाने आज दुपारी देगलूर येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश असा दुहेरी कार्यक्रम आयोजित केला होता . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी साबणे पिता - पुत्रास भाजपात प्रवेश देवून त्यांची उमेदवारी घोषीत केली . दरम्यान पक्षप्रवेश सोहळा आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास माजी खासदार तथा भाजपाचे जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर उपस्थित राहतील असा कयास भाजपाचे स्थानिक नेते लावून बसले होते . परंतू या कार्यक्रमाकडे भास्करराव पाटील खतगावकर व त्यांच्या स्नुषा जि . प . सदस्या डॉ . मिनल खतगावकर यांनी देखील पाठ फिरविली . त्यामुळे या मतदार संघातील खतगावकर समर्थक कार्यकर्ते सैरभैर झाले असल्याचे चित्र दिसून आले . दरम्यान या पक्ष प्रवेश सोहळ्यास खा . प्रतापराव पाटील चिखलीकर , माजी मंत्री सदाभाऊ खोत , जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर , आ . राम पाटील रातोळीकर , आ . राजेश पवार , आ . तुषार राठोड , डॉ . अजित गोपछडे , प्रवीण साले , देविदास राठोड आदींची उपस्थिती होती . 


25 September 2021

बिलोली तालुक्यातील नागणी येथील सुमित धोत्रे युपीएससीमध्ये उत्तुंग यश

नांदेड- जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत उतुंग यश मिळवित नांदेडच्या गुणत्तेत भर टाकली आहे . शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानंतर नांदेडच्या रजत नागोराव कुंडगीर याने ६०० , बाभुळगाव येथील शिवहार चक्रधर मोरे याने ६४ ९ तर नांदेडच्या सुमीतकुमार दत्ताहरी धोत्रे याने ६६० रँक मिळवित यश संपादन केले . नांदेड येथील पोलीस उपनिरीक्षक नागोराव कुंडगीर यांचे सुपूत्र रजत कुंडगीर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण नांदेड येथे झाल्यानंतर त्याने पुण्यात बारावी व पदवीपर्यंतचे शिक्षण कला शाखेत पूर्ण केले . हे करीत असताना युपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला . अभ्यासातील सातत्य व ध्येय बाळगून रजतने दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले आहे . नांदेडच्या नवाममोंढा भागात राहणाऱ्या रजतची आई व भाऊ शुभम कुंडगीर हे लघु उद्योजक आहेत . नांदेड तालुक्यातील बाभूळगाव या ठिकाणी राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील शिवहार चक्रधर मोरे याने ६४ ९ रँक घेवून आपले स्वप्न पूर्ण केले . वडीलचक्रधर मोरे हे शेतकरी असून घरी पाच एकर जमीन आहे . तर शिवहार यास दोन भाऊ एक बहिण असून बहिण राखी मोरे हिने एमबीबीएस पूर्ण केले आहे . तर एक भाऊ इंजिनिअर आहे . शिवहार याचे दहावी पर्यंतचे शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल तर बारावीपर्यंतचे शिक्षण यशवंत महाविद्यालयात पार पडले . त्यानंतर पुणे येथे इंजिनिअरींग पूर्ण करुन तो दिल्ली येथे युपीएससीच्या तयारीसाठी गेला . या ठिकाणी त्याने दिवसरात्र अभ्यास करुन आपल्या आई - वडिलांचे स्वप्न पूर्ण केले . नांदेड येथील पत्रकार दत्ता हरी धोत्रे यांचे सुपुत्र इंजिनिअर सुमित् धोत्रे याने युपीएससी ६६० रँक घेवून यश मिळविले . सुमीत यांचे वडील मागील अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करतात . तर आई प्राथमिक शिक्षिका आहे . सुमित धोत्रे यांचे शिक्षण आयआयटी खडकपूर येथून पूर्ण झाले . त्यानंतर युपीएससीची तयारी करण्यासाठी त्याने आंबेडकरवादी मिशन दिल्ली येथे दिपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू केला . मानववंश शास्त्र हा विषय घेवून सुमितने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले .

20 September 2021

तुप्प शेळगाव येथील अपघातात वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीस मंगेश कदम यांच्याकडुन शिलाई मशीन भेट

देगलूर: तालुक्यातील तुप्प शेळगाव येथील एकनाथ सोनकांबळे यांचा 15 सप्टेंबर रोजी आपघाती मृत्यू झाला होता.त्यांच्या कुटुंबात पत्नी धोंडूबाई एकनाथ सोनकांबळे ,मुली  मुक्ताबाई, सावित्री ,मुलगा - नागेश असा अत्यंत गरीब परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचे कळताच देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांनी या परिवारास शिलाई मशीन भेट देऊन उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले व कदम यांनी सोनकांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

देगलूर तालुक्यातील तुप्पशेळगाव येथील अपघात मृत्यू पावलेल्या सोनकांबळे कुटुंबियांना देगलूर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष 
श्याम वद्देवार यांच्या पुढाकारातून मंगेश कदम यांनी मदतीचा हात म्हणून शिलाई मशीन भेट  दिली.या प्रसंगी पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड ,अमोल स्वामी लोणीकर,तंटामुक्तीअध्यक्ष  बालाजी पाटील, शिवाजी भोईवर मारोती वाघमारे,  उपसरपंच दिगंबर वासणीकर यांच्यासह सोनकांबळे परिवारातील सदस्य रोहिदास, चांदोबा,रामा,अजय,अमर, विजय,अनिल,देविदास सुरेश आदीजन  उपस्थित होते. या वेळी भविष्यातही मदत करण्याची ग्वाही मंगेश कदम यांनी दिली आहे.

08 September 2021

मुखेडचे माजी आमदार पुत्र व नातवाचा मृतदेह सापडला

मुखेड:माजी आमदार किशनराव राठोड तथा भाजपचे मुखेडचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांचे चुलत बंधू व पुतणे व सालगडी यांची चार चाकी कार काल पुराच्या पाण्यामुळे पुलावरून वाहून गेली होती.यात सालगडी बचावला होता मात्र कार सायंकाळी उशिरा आढळली.मात्र त्या पिता - पुत्राचा शोध लागला नव्हता . या दोघांचे प्रेत आज बुधवार दि . 8 रोजी सकाळी आढळून आले आहे . भगवान किशन राठोड , वय . 68 व मुलगा संदीप भगवान राठोड , वय . 38 व त्यांचा सालगडी देवकते हे तिघे नांदेडवरून मुखेडकडे जात असताना मोती नाल्यावरील पुलावरून कार वाहून पुराच्या पाण्यात वाहून गेली.यात सालगडी देवकते हे झाडावर चढल्याने सुदैवाने त्यात बालबाल बचावले . तर भगवान राठोड व त्यांचा पुत्र संदीप राठोड हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.काल सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती.मात्र त्यांचा थांगपत्ता लागू लागला नव्हता.पुराचे पाणी ओसरल्याने सकाळी भगवान राठोड यांचा मृतदेह नदीपात्रापासून जवळ असलेल्या एका शेतात तर संदीप राठोड यांचा मृतदेह नदीच्या पात्रातच आढळून आला . दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले असून त्यानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते .

06 August 2021

धनगर समाज मेंढपाळ बांधवाचा बिलोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

 बिलोली: येथे धनगर समाज मेंढपाळ बांधवांच्या हक्काच्या लढाई साठी बिलोली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आले.यावेळी मेंढपाळ बांधवांच्या समस्या मांडण्यात आल्या मेंढपाळांच्या मागण्या गायराण जमीनीवर काही जणांनी कब्जा करुन मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारवण्यास नकार करत असुन मारहाण व शिविगाळ होत असुन या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला मेंढपाळांच्या मागण्या आत्मरक्षणासाठी बंदुकीची परवानगी देण्यात यावी व अतिक्रमण जागा हटवण्यात यावा मेंढपाळांचा विमा मिळालाच पाहिजे असे मागण्या या वेळेस मागण्यात आले या मोर्चात सहभागी जय मल्हार सेना सरसेनापती लहुजी शेवाळे,जय मल्हार सेना जिल्हा प्रमुख एकनाथ धमने,जय मल्हार सेना जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव खोंडे तरोडेकर, समाजाचे नेते नागोराव बापु शेंडगे, जय मल्हार सेना विधानसभा प्रमुख देगलुर बिलोली शिवकांत मैलारे ,जय मल्हार सेना ता अध्यक्ष गंगाधर साखरे, जय मल्हार सेना उपाध्यक्ष रामकिशन भत्ते,जय मल्हार सेना सरचिटणीस साईनाथ बोडके, जय मल्हार सेना ता संघटक संदीप काळे ,जय मल्हार सेना ता सचीव हनुमंतराव मुदनकर ,गनेश यलबुगडे, साईनाथ छपेवार, गजानन शेळके ,शंकर राव भंडारे, सायराम देवाले, मोहन मेढेकर, लालू मैलारे, विश्वनाथ अब्दागीरे, ज्ञानेशवर करडे,मेंढपाळ व समाज बांधव उपस्थित होते. 

नवग्राम निर्माण पॅनेलच्या वतीने कुडंलवाडी माचनुर गंजगाव बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी

बिलोली:- कुडंलवाडी माचनुर गंजगाव बस सेवा सुरू करन्यासाठी आज विद्यार्थी काँग्रेस तालुका ऊपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पुढाकाराने बिलोली आगार प्रमुख आर वाय  प्रमुखांची भेट घेतली.दौलापुर कोटग्याळ माचनुर गंजगावच्या विद्यार्थ्यांची बस सेवा सुरू नसल्याने गैरसोय होत आसुन मानव विकास योजनेची बस तात्काळ सुरू करून मध्यंतरी एक फेरी वाढवावी अशी विनंती करन्यात आली.यावेळी विशेष ऊपस्थीत राहुन विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी साखरे यांनी व माचनुर ग्रामपंचायत सदस्य प्र तथा मनसे ता ऊपाध्यक्ष देवीदास शिरगिरे यांनी सुचना केल्या. यावेळी समवेत काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अविनाश पाटील पत्के मा मुख्याध्यापक मल्हाराव परसुरे सर विशेष ऊपस्थीत माजी सदस्य लालु परसुरे व काँग्रेस सोशल मिडीयाचे प्रमुख शुभम निदाने देखील ऊपस्थीत होते यावेळी कुडंलवाडी आगार प्रमुख माहेवार ऊपस्थीत होते बस सेवा सोमवार पासुन सुरू करू आसे आश्वासन दिले यावेळी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी साखरे यांनी व अविनाश पाटील यांनी सगरोळी सर्कल मधील बस सेवा संदर्भात सविस्तर चर्चा केली.

15 July 2021

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी: जितेश अंतापूरकर

बिलोली ( प्रतिनिधी ) -तालुक्यात एका पाठोपाठ एक अशा मुसळधार पावसाने पिछा सोडावयास तयार नसल्याचे दिसून येत आहे . दि .११ रोजी जोरदार पावसाने हजेरी लावली यात काही प्रमाणात शेतऱ्यांचे मोठे नुकसान झाले आता पुन्हा दि .१४ रोजीच्या पहाटे पासून मुसळधार पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने विशेषतः नदी काठावरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या आस्मानी संकटामुळे आता मात्र बळी राज्याची पूर्णपणे झोप उडाली असून मतदार संघ आमदारा शिवाय पोरका झालेल्या या तालुक्यात जितेश अंतापुरकर यांनी शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडे पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे . तालुक्यात या वर्षी सोयाबीन पिकाचा मोठा पेरा आहे . याच सोबतकापूस , मुग उडीद इ.पिके घेतल्या गेली . शेतीतील कोवळी रोपेडुलू लागली होती . अशात या पावसाने शेतीत पाणी शिरून पिके पिवळे पडू लागली आहेत . दुसऱ्या बाजूला नदी नाला काठावरील शेतीतील पिकाचे प्रचंड नुकसान झाले . यात जमीनी खरडून कोवळी रोपे नेस्तनाबुत झाल्याची परिस्थिती आहे . तालुक्यात मांजरा नदी काठावर गावे आहेत तर गोदावरी नदी काठावर ही काही गावाचा समावेश आहे . तसेच बामणी कासराळी आरळी असा मोठा नाला असून नाला शेजारी शेकडो एकर जमीन आहे . या नदी व नाला काठावरील शेतकर्याना सदर पावसाचा मोठा तडाखा बसला आहे . काही गावातील घराचेही नुकसान झाले आहे .दि:14-07-2021 रोजी नांदेङ येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेङचे पालकमंत्री मा.ना.श्री अशोकरावजी चव्हाण साहेब व महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री मा.ना.श्री विश्वजीत कदम साहेब यांना देगलुर बिलोली तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटी मुळे सोयाबीन उङीद मुग उङीद व इतर पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावरून शेतंकरयांना त्वरित मदत जाहीर करावी. अशी मागणी देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाचे युवानेते श्री जितेशभाऊ रावसाहेब अंतापूरकर यांनी निवेदना द्वारे विनंती केली आहे. यावेळी आमदार श्री अमरनाथ राजूरकर साहेब व जि.प.सभापती श्री संजय बेळगे साहेब उपस्थित होते.

15 June 2021

मुखेड - नांदेड महामार्गावर वहाडीटेम्पोचा भिषण अपघात ; १ ठार , ३१ गंभीर ; ४ अतिगंभीर

मुखेड | मुखेड - नांदेड महामार्गावर असलेल्या सलगरा ( बु ) परिसरातील इंद - भारत कंपनी ( विज निर्मिती प्रकल्प ) जवळ दि .१५ जुन २०२१ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वहाडाचा आयचर एम.एच .०४ ई.बि .३५२५ या क्रंमाकाचे टेम्पो पलटी होवून प्रशांत जनार्दन सुर्यवंशी , वय २२ वर्ष हा जागीच ठार झाला असून , ४ अतिगंभीर तर इतर ३१ जन गंभीर अवस्थेत आहेत .घटनेचे सविस्तर वृत असे की , उदगीर तालुक्यातील हाळी येथील वर मंडळीचे व - हाड बिलोली तालुक्यातील कार्ला येथे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने सदर टेम्पो रस्त्यावर पलटी होवून हा अपघात झाला . या अपघातात टेम्पो २० मिटर घसरत गेला . या घटनेची माहीती कळताच मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत पाटील , डॉ उमाकांत गायकवाड , डॉ.देवकत्ते मॅडम , यांच्यासह दवाखान्यातील डॉक्टर , सिस्टर , ब्रदर , वार्ड बॉय , सर्वांनी तात्काळ मानवतेच्या दृष्टिकोनातून आपघातातील जखमींना आधार दिला . प्रथमोपचार करुन २५ अति गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .

17 April 2021

पुण्यातील बोगस डॉक्टर मुळचा नांदेडचा रहिवाशी, दोन वर्षांपासून चालवत होता 22 बेडचं हॉस्पिटल

   नांदेड : जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने पुणे येथे स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 22 बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. कपांऊडरने बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल सुरु केलं होतं. कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही तयार केला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे रुग्णालय चालवलं जात होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचं बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समोर आलं. त्याच्याकडे एमबीबीएस डिग्री असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर डॉ. महेश पाटील याचं मूळ नाव मेहबूब शेख असून, तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.     मेहबूब शेख ते डॉ. महेश पाटील बोगस डॉक्टरचा प्रवास       शिरूरमध्ये डॉक्टर असल्याचं दाखवून 22 बेडचं स्वतः रुग्णालय चालवणाऱ्या कंपाऊडरची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने संपूर्ण माहिती दिली. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, "पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु केलं. त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदललं. त्याने बनावट डिग्री आणि आधार कुठून मिळवलं याचा तपास आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे." असं घनवट यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, बोगस डॉक्टरने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केलेत तर काहींवर अजूनही सुरु आहेत. मात्र त्याने उपचार करताना केलेली लुटालूट रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणणारी आहे. यातल्या काही नातेवाईकांनी आपला अनुभव सांगितला. सध्या हा मुन्नाभाई पोलिसांच्या ताब्यात आहे. या बारावी नापास मेहबूबला डॉ. महेश पाटील बनण्यासाठी कुणी मदत केली याचाच शोध पोलीस घेत आहेत. 

11 April 2021

तिरंगा व आमदारच्या पार्थिवाचे प्रशासनाकडून अवहेलना

देगलूर: देगलूर विधानसभा मतदार संघातून अनुसूचित जाती जमाती या राखीव प्रवर्गातून दोन वेळा निवडून येऊन सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले आणि त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले त्यावेळी प्रशासनाकडून त्यांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करत असताना, व पोलीस दलाकडून मानवंदना देत असताना त्यांचे तिरंगा लपेटलेले पारथिव हे आदरपूर्वक एखाद्या उंच टेबलावर ठेऊन विधी  करणे अपेक्षित असताना ते जमिनीवर खाली  मॅट देखील नसताना पूर्ण करण्यात आली तर दुसरीकडे पोलीस दलाकडून मानवंदना देणारे पोलीस कर्मचारी हे मॅटवर उभे राहून मानवंदना देऊन शासकीय इतमाम पूर्ण केल्याने आमदार अंतापूरकर यांच्या तिरंगा लपेटलेल्या पारथिवाची प्रशासनाकडून अवहेलना झाली का असा प्रश्न बिलोली देगलूर मतदार संघातील तमाम चाहत्यांना पडला असून त्याची चौकशी करून जिमेदारी निश्चित करून तातडीने दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चा होताना दिसून येत आहे.देगलूर विधानसभा मतदारसंघ या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील राखीव असल्याने 2009 मध्ये आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन आमदार झालेल्या रावसाहेब अंतापूरकर यांचा 2014 च्या निवडणुकीत अल्पशा मतानी पराभव झाला मात्र त्यांनी पराभव स्वीकारून सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू  मानून मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आणि त्यांना येथील जनतेने 2019 च्या निवडणुकीत पुन्हा दुसऱ्यांदा निवडून दिले सर्व सामनाचा आमदार म्हणून  त्यांची ख्याती होती ते मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपून आल्यानंतर आजारी पडले त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेड येथील दवाखान्यात दाखल केले त्यानंतर त्यांना मुंबई येथे नेण्यात आले तेथे त्यांच्यावर कोरण्याचे उपचार करण्यात आले ते कोरोणा निगेटिव्ह झाले मात्र त्यातून त्यांना उद्भवलेल्या इतर आजारामुळे त्यांचे निधन झाले त्यांची कोरोना चाचणी निगेटिव आल्याने त्यांचे पार्थिव त्यांचे मूळ गाव देगलूर तालुक्यातील अंतापूर येथे अंतेविधीसाठी आणण्यात आले व शोशल  डिस्टन्ससिंग चे नियम पाळून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी प्रशासनाकडून त्यांना पहिल्यांदा पुष्पचक्र अर्पण करून जिल्हाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पित केली व त्यानंतर खासदार आमदारांसह प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींनी पुष्पचक्र अर्पण करुन पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली व बंदुकीतून गोळ्यांच्या फैरी झाडून मानवंदनाही देण्यात आली हा विधी संपन्न होत असताना मात्र त्यांचे तिरंगा लपेटलेले पार्थिव उंच टेबलावर ठेवून आदरपूर्वक होण्याऐवजी तो जमिनीवर खाली साधी म्याटिंग देखील टाकण्यात आली नव्हती मात्र शासकीय इंतमामा पूर्ण करणारे पोलीस हे मॅटवर उभे टाकून श्रद्धांजली अर्पण करत होते तिरंगा लपेटलेले पार्थिव जमिनीवर व श्रद्धांजली देणारे पोलिस मात्र मॅटींगवर हा हलगर्जीपणा कोणाकडून झाला याची चौकशी करून जिम्मेदारी निश्चित करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी मतदार संघातील तमाम जनतेतून दबक्या आवाजातून होताना दिसून येत आहे.

10 April 2021

आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन

      अंतापुर येथे होणार अंत्यसंस्कार
 नांदेड: - नांदेड जिल्ह्यातील देगलूर - बिलोली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले , मृत्यूसमयी ते 60 वर्षांचे होते.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.अशी माहिती विधान परिषद आमदार अमरनाथ टाजूरकर यांनी अधिकृतरित्या कळविली . आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना 22 दिवसांपूर्वी कोटोना झाला होता.त्यानंतर त्यांना मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकली नाही.निमोनिया झाल्याने दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.मागच्या काही दिवसांपासून उपचारात ही फारसा प्रतिसाद मिळत नव्हता .अंतापूरकर यांचा शुक्रवारी सकाळपासून ऑक्सिजन शून्यावर आला होता.केवळ हृदय ठोके सुरु होते.त्यामुळे प्रकृती अधिक चिंताजनक बनली होती . शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त धडकले होते.मात्र निधनाची घटना ही अफवा असल्याचे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले.दुसरीकडे राज्यातील विविध पक्षाच्या तमाम नेत्यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट केले होते.मात्र शुक्रवारच्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अतापूरकर यांचे निधन झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.अंतापूरकर हे दुसऱ्यांदा आमदार बनले होते.यापूर्वी ते 2009 ते 2014 साली आमदार होते .2014 साली त्यांचा पराभव झाला होता.मात्र 2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून विजयी झाले होते .

05 March 2021

तलाठी सज्जा कोंडलापुर येथील खाजगी इसमास काढुन टाकणे बाबत दगडापुर येथील गावकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन.

बिलोली: तालुक्यातील मौजे दगडापुर येथील तक्रारदार दिगांबर महाजन जाधव येथील तलाठी सज्जा कोडलापुर आहे.सज्जा कोंडलापुर येथे नामदेव सोपान मोताळे हा तलाठी कार्यरत आहे . सदर तलाठ्याकडे दिगांबर महाजन जाधव यांनी 7 / 12 , आठ अ ची फाईल दाखविली तेव्हा सदर तलाठी महाशयाने त्याचा तलाठी नरेन्द्र देवे यांना सदर प्रमाणपत्र दयायचे का नाही असे विचारना केली असता नरेंद्र देवे यांनी मोताळे यांना सांगितले की , दिगांबर यांच्या पत्नीच्या नावे जमीन आहे असे सांगितल्या नतंर मोताळे दिगांबार जाधव यांना अल्प भुधारक प्रमाणपत्र दिले नाही . 
तसचे दिगांबर महाजन जाधव यांनी त्याच्या नावावरील आपल्या कुंटुबात मौजे दगडापुर शिवारातील जमीन मुलगा विवेक दिगाबर जाधव अ.पा.क आई गौरीबाई दिगाबर याना दुयम्म निबंधम बिलोली येथे दिनांक 22-12-2020 रोजी बक्षीसपत्र क्र . 2147 ने गट क्र 36 मधील 0.81 आर जमीन करुन दिली . त्याची फेरफारची नोटीस 23/01/2021 रोजी तलाठी महाशयाने काढली  परंतु त्यांचा फेरफार मंजुर झाला नाही . विचारणा केली असता संदीप पाटील जाधव यांना त्यांच्या हातावर 4000 रु मागीतले तो पर्यंत मजुर होत नाही असे साहेबानी सेडेतोड उत्तर दिले. तरी सदरील समक्ष चौकशी करुन त्याच्यावर कार्यवाही करावी जर त्याच्या वर काहीच कार्यवाही नाही केल्यास हे निवेदन दिल्यापासुन चौथे दिवशी आम्ही मा . जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कड़क दाद मागण्यासाठी जाणार असे निवेदक दिगांबार जाधव व गावकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे
 या निवेदनात दिगांबार महाजन जाधव, रामचंद्र व्यंकटराव जाधव, सुभाष शंकरराव जाधव, प्रल्हाद भगवानराव जाधव,बालाजी सदाशिव जुणे,उत्तम भगवान जाधव,हानमंत व्यंकटराव जाधव,श्रीराम सिताराम जाधव, गोपीनाथ देवराव जाधव, रमेश बाबुराव व्यायगावे,विजय मारोती जुणे,जेजेराव भगवानराव जाधव, कोंडीबा महाजन जाधव, सुनील लक्ष्मण सुर्यवंशी, गणेश मारोती जुणे,श्रीनिवास शिंदे,संदीप गोविंदराव जाधव, यांच्या स्वाक्षरी आहेत

20 February 2021

अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई - जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर

नांदेड दि . 20 : - कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती खबरदारी घेत आहे . आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत : अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे . नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क , सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे . याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे . नागरिकांनी जर संयमी जब बदारी पार डली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही , असे जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे . जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत . तथापि जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या , संदेश हे पुर्णत : चुकीचे असून ज्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर अथवा ट्विटर , इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल , असे जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे .

03 February 2021

अनुपंम कांगठे यांची NSUI तालुका सरचिटणीस पदी निवड

 बिलोली(ता.प्र):- येथील युवक कार्यकर्ता अनुपंम कांगठे यांची NSUI तालुका सरचिटणीस पदी  निवड करण्यात आली.देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कॉग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,जिल्हा प्रवक्ते दिलिप पाटिल पांढरे,जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास पाटील शिंदे,रामपुरे सर,nsui तालुका अध्यक्ष बालाजी साखरे,संदीप कटारे,तालुका उपाध्यक्ष धिरजसिंग चव्हाण,सुजित डोंगरे,सोशल मीडियाचे केशव रानवळकर,अजय कुडके,यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले . निवाडिसाठी NSUI तालुकाध्यक्ष बालाजी साखरे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

21 January 2021

सालगड्याने मालकाच्या ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा केला खून

भोकर : तालुक्यातील दिवशी बु.येथील एका शेतमालकाच्या ५ वर्षीय निरागस मुलीस त्यांच्या शेतात काम करणा - या सालगड्याने पळऊन नेऊन पाशवी बलात्कार केला व तिचा निर्गुण खून करुन मृतदेह नदीपात्रात टाकल्याची मन हेलाऊन टाकणारी दुर्दैवी तथा निषेधार्य अमानुष घटना दि .२० जानेवारी रोजी दुपारी २:०० ते ६:०० वाजताच्या दरम्यान घडली असून ' त्या ' आरोपीस भोकर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .सविस्तर असे की , दिवशी बु.ता.भोकर येथील एका शेतक - याची ५ वर्षीय मुलगी दि .२० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२:०० वाजतापासून घरी नसल्याने तिचा शोध घेणे सुरु केले.परंतू ती मिळाली नसल्याने कुटुंबीयांनी याबाबतची माहिती भोकर पोलीसात दिली.तसेच शोध सुरु ठेवला असता त्यांच्या शेतात काम करणारा सालगडी बाबू खंडू सांगेराव ( ३५ ) हा देखील घरी किंवा शेतात नसल्याचे निदर्शनास आले . यावरुन त्यानेच त्या मुलीला पळऊन नेले असावे असा संश व्यक्त होत असल्याने शोधमोहिम सुरुच ठेवली . याच दरम्यान सायंकाळी त्या चिमुकलीचा निर्वस्त्र व गंभीर जखमी अवस्थेतला मृतदेह दिवशी बु.पासून काही अंतरावर तेलंगणा राज्य सिमे जवळील सुधा नदी पात्रात गावक - यांना मिळून आला .याबाबदची माहिती भोकर पोलीसांना दिली असता सहायक पोलीस निरीक्षक शंकर देडवाल व पोलीस कर्मचा - यांचा ताफा घटनास्थळी तात्काळ पोहचला आणि त्या पीडित मयत चिमुकलीचा मृतदेहाची पाहणी करुन अरोपीचा शोध घेणे सुरु केले असता तो सुधा नदी पात्र पाण्यातील खड्ड्यात लपून बसल्याचे दिसले.यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.परंतू संतप्त गावक यांच्या जमावाने त्यास आमच्या हवाली करावे अशी मागणी करत एकच गोधळ घातला व त्यासमारण्याचा प्रयत्न केला.यावेळी सहा.पो.नि.शंकर डेडवाल आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचा - यांनी समयसुचकता ठेऊन आरोपीचा बचाव केला.तसेच ही माहिती पोलीस ठाण्यात कळविली .संतप्त जमावाने त्यास मारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर , पो.नि.विकास पाटील , पो.उप.नि.अनिल कांबळे , पो.उप.नि.सूर्यकांत कांबळे यांसह आदी पोलीस कर्मचारी दिवशी बु.येथील त्या घटनास्थळी पोहचले व संतप्त जमावाला परिस्थितीचे गांभिर्य समजाऊन सांगून तणावपुर्ण परिस्थिवर नियंत्रण मिळवले.याच बरोबर आरोपी बाबू खंडू सांगेराव यास ताब्या घेतले व भोकर ठाण्यात आण आणि पीडित मयत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोकर शासकीय रुग्णालयात आणला . सदरील मयत पीडित चिमुकलीवर उपरोक्त नराधमाने पाशवी बलात्कार करून तिचा निघृण केला असावा असा अंदाज प्रथम दर्शनी व्यक्त होत असून पीडित मयत मुलीची उत्तरीय तपापसणी महिला वैधकीय अधिकारी यांच्या करवी ‘ इन कॅमेरा ' करण्यात येणार आहे.उत्तरीय तपासणी नंतर मिळालेल्या प्राथमिक वैधकीय अहवालानुसार व पीडित मयत मुलीच्या वडिलांना दिलेल्या फिर्यादीवरुन उपरोक्त आरोपी विरुद्ध त्या ५ वर्षीय मुलीस पळऊन नेऊन पाशवी बलात्कार करून तिचा निघृण खून केल्याचा व बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा ( पोस्को ) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यत सुरु होती.तर मन हेलाऊन टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी अमानवी कृत्याच्या गंभीर गुन्ह्याची ही घटना असल्याने सर्वत्र हळहळ , संता व निषेध व्यक्त होत असून सदरील आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी , अशी मागणी अनेकांतून होत आहे . 


18 January 2021

अरूणकुमार सुर्यवंशी यांचा आजाद समाज पार्टीत प्रवेश!

नांदेड:आजाद समाज पार्टी महाराष्ट्र चे  प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजासेना संघटना प्रमूख अरूणकुमार सुर्यवंशी कोळगावकर यांनी आझाद समाज पार्टीत जाहीर प्रवेश करून संसदीय राजकीय वाटचालीस सुरूवात केली आहे.अरूणकुमार सुर्यवंशी हे राहुल प्रधान यांचे जुने सहकारी मित्र आहेत.राहुल प्रधान अध्यक्ष असलेल्या युवा पँथर संघटनेत ते मागच्या चार वर्षा पासून एकत्र आंबेडकरी चळवळीत काम करीत होते. राहुल प्रधान यांनी 2020 मध्ये राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षात प्रवेश करित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन आंबेडकरी तरूणांच राजकारण उभ करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.याच भुमिकेच समर्थन करीत राहुल प्रधान यांचे अत्यंत विश्वासु व कट्टर समर्थक समजल्या जाणारे अरूणकुमार सुर्यवंशी यांनी स्वतः संस्थापक अध्यक्ष असलेल्या प्रजासेना संघटनेच्या महत्वाच्या सहका-यांसह राहुल प्रधान यांच्या नेतृत्वात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पक्षप्रवेश केला.या प्रवेशाच्या निमीत्ताने नांदेड जिल्हयात नवीन यशस्वी आंबेडकरी राजकारण उभ टाकेल अशा चर्चा जिल्हाभरात घडुन येताना दिसत आहेत.

17 January 2021

बिलोली येथे मूकबधिर युवतीवर अत्याचार करून खून करणारा तिसरा गुन्हेगार पकडला

बिलोली; येथील मतिमंद युवतीवर सामुहिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या तिसऱ्या गुन्हेगाराला आज दि .17 जानेवारी रोजी तेलंगनातील आरमोर येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . अगोदरचा एक न्यायालयीन कोठडीत तुरूंगात आहे . तर दुसरे दोन पोलीस कोठडीत आहेत .9 डिसेंबर रोजी पहाट झाल्यावर बिलोली शहरात एका मतिमंद आणि अनुसुचित जातीच्या युवतीचा मृतदेह सापडला आणि खळबळ माजली होती . या प्रकरणी सुरूवातीला 376 , 302 , 34 नुसार गुन्हा दाखल झाला.या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्याकडे होता . अत्यंत जलदगतीने पोलीसांनी याप्रकरणी साईनाथ निमोड नावाच्या युवकाला अटक केली . सध्या तो तुरूंगात आहे . युवतीवर झालेला अत्याचार आणि तिचा खून ही बाब समाजाने गांभीर्याने घेतली आणि त्याबद्दल निदर्शने झाली.दरम्यान ग्राम पंचायत निवडणूक जाहीर झाली आणि पोलीसांचे काम वाढले . झालेली घटना गंभीरच आहे .त्यामुळे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे , विजय कबाडे , बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक सिध्देश्वर धुमाळ , स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचायांनी अनेक परिसर पिंजून काढत तेलंगणा राज्यातील पोलीसांशी या घटनेच्या संदर्भाने मदत घेवून 11 जानेवारी रोजी शेख नसीर शेख इब्राहीम नावाच्या युवकाला पकडले आणि त्यानंतर या गुन्ह्यात ऍट्रोसिटी कायद्याची कलमे वाढली आणि गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक सिध्देश्वर धुमाळ यांच्याकडे वर्ग झाला . त्यानंतर 13 जानेवारी रोजी प्रणित राजाराम गौड उर्फ बन्नी या युवकाला पकडले.प्रणित गौर आणि शेख नसीर सध्या पोलीस कोठडीत आहेत . दि .13 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेवून या कामात सहाय्यक पोलीस निरिक्षक परगेवार ,मुत्तेपमोड, पोलीस उपनिरिक्षक सय्यद झाकीकौरे , पोलीस कर्मचारी कौत्तापल्ले ,नरावाड , आचेवाड , शिवणकर , झेलवाड , सोनकांबळे आदींनी मेहनत घेतल्याचे सांगितले होते . प्रकरणात तिसरा आरोपी पोलीसांच्या हाती आला नव्हता त्याचा शोध पोलीस घेत होते . नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी आरमोर येथील पोलीस अधिक्षक अरविंद यांच्याशी संपर्क साधून तिसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी संयुक्त मोहिम राबवली . आरमोरचे पोलीस उपअधिक्षक रघू , पोलीस निरिक्षक एम.सिध्देश्वर , गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक गौंड , पोलीस कर्मचारी प्रसाद आणि गफार यांनी परिश्रम घेवून आज दि .17 जानेवारी रोजी शेख नजीर शेख उस्मान या युवकाला ताब्यात घेतले आणि त्याची माहिती नांदेड पोलीसांना दिली . बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक सिध्देश्वर धुमाळ आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी आज सायंकाळी 7 वाजता आरमोरे पोलीसांनी पकडलेला शेख नजीर शेख उस्मान आपल्या ताब्यात घेतला आहे . त्यामुळे बिलोली येथे घडलेल्या या भयंकर घटनेचा झडा लावणाऱ्या नांदेड पोलीसांचे आणि त्यांना करणाऱ्या तेलंगणा पोलीसांचे कौतुक केले पाहिजे.

13 January 2021

मुकबधीर युवतीवर अत्याचार करून तिचाखून करणारे दोन युवक गजाआड-

नांदेड | बिलोली शहरात एका मुकबधीर मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना 8 डिसेंबरच्या रात्री कधी तरी घडली होती . या प्रकरणात पोलीसांनी काल एका आरोपीला पकडले आहे . पकडलेल्या आरोपीला बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे . दुसरा एक आरोपी पोलीसांनी आज ताब्यात घेतला आहे . त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे . आज दि .13 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बिलोली येथील गुन्ह्याची माहिती सांगितली . याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे , पोलीसचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर धुमाळ , स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती . दि .9 डिसेंबर रोजी त्या युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 201/2020 दाखल झाला होता . त्यावेळी त्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 302,376 ( एल ) ( एम ) 354,254 ( डी ) आणि 201 या कलमांचा समावेश होता . याप्रकरणी बिलोलीचे पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांनी साईनाथ निमोड नावाच्या एका आरोपीला पकडले होते . तो तुरूंगात आहे . याप्रकरणात आणखी आहेत काय याचा शोध घेणे होते .त्यासाठी पोलीसांनी जवळपास 200 ते 300 लोकांचे जाब - जबाब नोंदवले . त्यात एकूण 4 जणांनी हा अत्याचारा प्रकार घडविल्याची बाब पोलीसांच्या समक्ष आली . त्यासाठी नांदेडचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे , अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे , विजय कबाडे यांच्या नेतृत्वात 6 पथकांची स्थापना केली . या पथकांनी परभणी जिल्ह्यातील पुर्णा , नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद , उमरी , मुदखेड , हिमायतनगर आणि तेलंगणा राज्यातील कामारेड्डी , निर्मल आणि निजामाबाद या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला . त्यातील एका आरोपीला पोलीसांनी 11 जानेवारी रोजी अटक केली.आणि त्याला न्यायालयासमक्ष हजर केले.बिलोलीचे जिल्हा न्यायालयाधीश विक्रमादित्य मांडे यांनी त्या आरोपीला 16 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले यानंतर आज दि .13 जानेवारी रोजी पसरा आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतला आहे .या प्रकरणात आणखी एक आरोपी पोलीसांना शोधायचा आहे . आज ताब्यात घेतलेल्या आरोपीला पोलीस उद्या न्यायालयात हजर करतील .11 जानेवारी रोजी पकडलेल्या आरोपी नंतर या गुन्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलमे 3 ( 1 ) ( डब्लू ) 3 ( 2 ) वाढविण्यात आली आहेत . त्यामुळे या पाचा तपास पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर धुमाळ यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे . पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यवाहीत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक मुत्तेपौड , केंद्रे , करीम खान पठाण , परगेवार , भारती , पोलीस उपनिरिक्षक सय्यद , झाकीकोरे , पोलीस कर्मचारी कोत्तापल्ले , नरावाड , आचेवाड , शिवणकर , झेलेवाड , सोनकांबळे यांनी गुन्ह्याची माहिती , त्याचे पुरावे जमवून आरोपींना गजाआड करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी कौतुक केले आहे . 

09 January 2021

जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया - 907 ग्रामपंचायतीसाठी होणार मतदान

नांदेड दि . 9 : - जिल्ह्यात 16 तालुक्यातील एकूण 1 हजार 309 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार होते . यापैकी मुखेड तालुक्यातील जांब आणि कंधार तालुक्यातील आलेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रद्द झाली . जिल्ह्यात प्रत्यक्ष 1 हजार 13 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली . यातील 907 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे . 1013 ग्रामपंचायतींपैकी पूर्णतः बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या 85 आहे . ग्रामपंचायतीच्या एकुण जागांपैकी काही जागेसाठी वैध नामनिर्देशनपत्र अप्राप्त असल्याने व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान होणार नाही अशा ग्रामपंचायतींची संख्या 21 तर प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या 907 एवढी आहे . एकुण जागांची संख्या 8 हजार 617 एवढी असून एकही वैध नामनिर्देशनपत्र प्राप्त न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांची संख्या 102 तर माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी फक्त एकच वैध नामनिर्देशपत्र उरल्याने बिनविरोध निवडणूक झालेल्या जागांची संख्या 1 हजार 653 तर प्रत्यक्ष जिल्ह्यात मतदान होणाऱ्या जागांची संख्या एकुण 6 हजार 862 आहे , अशी माहिती उपजिल्हाधिकारी शरद मंडलिक यांनी दिली आहे .

05 January 2021

बिलोली तालुक्यातील 60 ग्रां.पं.साठी 1108 उमेदवार रिंगणात चार ग्रामपंचायत बिनविरोध

बिलोली: तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या  निवडणूकीत दिनांक २४ डिसेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत पात्र ठरलेल्या नामनिर्देशित पत्रातील उमेदवारा पैकी दिनांक 4 जानेवार रोजी 522 उमेदवारांनी माघार घेतली.आता 1108 उमेदवार निवडणुकीत कायम आहेत.या मध्ये शिंपाळा,पाचपिंपळी, तळणी,बेळकोणी बुजरूग या चार ग्रामपंचायत बिनविरोध निघालेले आहेत.तर एकुण 51 उमेदवार बिनविरोध निघाले असल्याने आता 60 ग्रामपंचायती साठी निवडणूक होणार असल्याचे बिलोली चे तहसीलदार  निवडणूक निर्णय अधिकारी कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले आहे.चार टप्यात होणार असलेल्या निवडणूकीत आता तिसरा टप्पा पार केला असून पहिल्या टप्प्यात दिनांक २३ डिसेंबर पासुन नामनिर्देशिन पत्र दाखल करण्याची मुदत दिनांक ३० डिसेंबर रोजी संपली.दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३१ डिसेंबर रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली.ज्यात तालुक्यातील 64 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 204 प्रभागातून 556 सदस्य निवडुन द्यावयाच्या जागेसाठी 1732 नामनिर्देशिन पत्र दाखल झाले यामध्ये 10 नामनिर्देशिन पत्र अवैध ठरले असल्याने 1722 नामनिर्देशिन पत्र वैद्य ठरले होते.तर निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी माघार घेण्याच्या प्रक्रियेत चार जानेवारी रोजी तब्बल पाचशे बाविस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.आता चौसष्ट ग्रामपंचायत मधुन चार ग्रामपंचायत बिनविरोध निघाले असल्याने आता साठ  ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून अकराशे आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत.

बिलोली तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या  निवडणूकीत दिनांक २४ डिसेंबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत पात्र ठरलेल्या नामनिर्देशित पत्रातील उमेदवारा पैकी दिनांक 4 जानेवार रोजी 522 उमेदवारांनी माघार घेतली.आता 1108 उमेदवार निवडणुकीत कायम आहेत.या मध्ये शिपांळा,पाचपिंपळी, तळणी,बेळकोणी बुजरूग या चार ग्रामपंचायत बिनविरोध निघालेले आहेत.तर एकुण 51 उमेदवार बिनविरोध निघाले असल्याने आता 60 ग्रामपंचायती साठी निवडणूक होणार असल्याचे बिलोली चे तहसीलदार  निवडणूक निर्णय अधिकारी कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले आहे.चार टप्यात होणार असलेल्या निवडणूकीत आता तिसरा टप्पा पार केला असून पहिल्या टप्प्यात दिनांक २३ डिसेंबर पासुन नामनिर्देशिन पत्र दाखल करण्याची मुदत दिनांक ३० डिसेंबर रोजी संपली दुसऱ्या टप्प्यात दिनांक ३१ डिसेंबर रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली.ज्यात तालुक्यातील 64 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 204 प्रभागातून 556 सदस्य निवडुन द्यावयाच्या जागेसाठी 1732 नामनिर्देशिन पत्र दाखल झाले यामध्ये 10 नामनिर्देशिन पत्र अवैध ठरले असल्याने 1722 नामनिर्देशिन पत्र वैद्य ठरले होते.तर निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी माघार घेण्याच्या प्रक्रियेत चार जानेवारी रोजी तब्बल 522 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले.आता 64 ग्रामपंचायत मधुन चार ग्रामपंचायत बिनविरोध निघाले असल्याने आता साठ  ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून अकराशे आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत.

01 January 2021

ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणीसाठी संबंधित गावात भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

नांदेड दि . 1 : - जिल्ह्यातील सुमारे 1 हजार 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे . शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाच्या दिवशी निवडणूक हद्दीत व सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणींच्या दिवशी मतमोजणी असलेल्या गावी , ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी दिले आहेत . पणन संचालक पुणे यांनी ग्रामपंचायतीच्याण निवडणुकीच्याट दिवशी मतदारांना मतदानाचा हक्के बजावता यावा तसेच मतदान व मतमोजणी शांततेत पार पडावे यादृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाच्या दिवशी निवडणूक हद्दीत व सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी असलेल्या गावी , ठिकाणी आठवडी बाजार बंद ठेवण्यावस व ते अन्ये दिवशी भरवण्याीस मान्यवता दिली आहे . त्याणनुसार जिल्हा धिकारी तथा जिल्हायदंडाधिकारी डॉ . विपीन इटनकर यांनी मार्केट ॲड फेअर अॅक्टत 1862 चे कलम 5 अन्वंये प्रदान अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाच्या दिवशी निवडणूक हद्दीत व मतमोजणीच्या दिवशी सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी असलेल्या गावी , ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत . तसेच अशा गाव / ठिकाणचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 16 जानेवारी 2021 रोजी व मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी असलेल्या गाव / ठिकाणचे आठवडी बाजार मंगळवार 19 जानेवारी 2021 रोजी भरविण्यात यावेत असे आदेशात नमूद केले आहे .