मुखेड:माजी आमदार किशनराव राठोड तथा भाजपचे मुखेडचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांचे चुलत बंधू व पुतणे व सालगडी यांची चार चाकी कार काल पुराच्या पाण्यामुळे पुलावरून वाहून गेली होती.यात सालगडी बचावला होता मात्र कार सायंकाळी उशिरा आढळली.मात्र त्या पिता - पुत्राचा शोध लागला नव्हता . या दोघांचे प्रेत आज बुधवार दि . 8 रोजी सकाळी आढळून आले आहे . भगवान किशन राठोड , वय . 68 व मुलगा संदीप भगवान राठोड , वय . 38 व त्यांचा सालगडी देवकते हे तिघे नांदेडवरून मुखेडकडे जात असताना मोती नाल्यावरील पुलावरून कार वाहून पुराच्या पाण्यात वाहून गेली.यात सालगडी देवकते हे झाडावर चढल्याने सुदैवाने त्यात बालबाल बचावले . तर भगवान राठोड व त्यांचा पुत्र संदीप राठोड हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.काल सायंकाळी उशिरापर्यंत शोध मोहीम प्रशासनाने हाती घेतली होती.मात्र त्यांचा थांगपत्ता लागू लागला नव्हता.पुराचे पाणी ओसरल्याने सकाळी भगवान राठोड यांचा मृतदेह नदीपात्रापासून जवळ असलेल्या एका शेतात तर संदीप राठोड यांचा मृतदेह नदीच्या पात्रातच आढळून आला . दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले असून त्यानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते .
08 September 2021
Home »
» मुखेडचे माजी आमदार पुत्र व नातवाचा मृतदेह सापडला







0 comments:
Post a Comment