देगलूर: तालुक्यातील तुप्प शेळगाव येथील एकनाथ सोनकांबळे यांचा 15 सप्टेंबर रोजी आपघाती मृत्यू झाला होता.त्यांच्या कुटुंबात पत्नी धोंडूबाई एकनाथ सोनकांबळे ,मुली मुक्ताबाई, सावित्री ,मुलगा - नागेश असा अत्यंत गरीब परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याचे कळताच देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम यांनी या परिवारास शिलाई मशीन भेट देऊन उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले व कदम यांनी सोनकांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
देगलूर तालुक्यातील तुप्पशेळगाव येथील अपघात मृत्यू पावलेल्या सोनकांबळे कुटुंबियांना देगलूर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष
श्याम वद्देवार यांच्या पुढाकारातून मंगेश कदम यांनी मदतीचा हात म्हणून शिलाई मशीन भेट दिली.या प्रसंगी पत्रकार संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड ,अमोल स्वामी लोणीकर,तंटामुक्तीअध्यक्ष बालाजी पाटील, शिवाजी भोईवर मारोती वाघमारे, उपसरपंच दिगंबर वासणीकर यांच्यासह सोनकांबळे परिवारातील सदस्य रोहिदास, चांदोबा,रामा,अजय,अमर, विजय,अनिल,देविदास सुरेश आदीजन उपस्थित होते. या वेळी भविष्यातही मदत करण्याची ग्वाही मंगेश कदम यांनी दिली आहे.







0 comments:
Post a Comment