जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 January 2020

सावधान! वाहनांवर डॉक्टर, आमदार किंवा प्रेस असे स्टीकर लावल्यास होणार दंड

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहनांवर महापौर, आमदार, प्रेस, डॉक्टर यांसारखे स्टिकर लावल्यास दंड होणार आहे. यासंदर्भात पंजाब आणि हरयाणात पहिल्यांदा हा कायदा लागू होणार आहे. गेल्या आठवड्यात या दोन शहरांमध्ये या नव्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यासाठी ७२ तासांची मुदतही देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने आता याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने देशभरात हा नियम लागू होऊ शकतो.


न्या. राजीव शर्मा आणि न्या. अमोल रतन सिंह यांच्या खंडपीठाने एका सूमोटो याचिकेवर सुनावणी करताना याबाबत आदेश दिला होता. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार, खासगी वाहनांवर हायकोर्ट, आर्मी, पोलीस, प्रेस, पत्रकार, अध्यक्ष, उपाध्यक्ष असे शब्द लिहिण्यावर बंदी आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टाने सरकारला ७२ तासांचा अवधी दिला होता.दरम्यान, कोर्टाने जसे आदेश दिले होते त्यानंतर तत्काळ शहरातील लोकांनी असे स्टिकर आपल्या वाहनांवरुन काढण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे न्यायाधीश राजीव शर्मा यांनी देखील आपल्या वाहनावरील स्टिकर तत्काळ काढून टाकले आहे.


खरंतरं कोर्ट हा नियम लागू करुन देशातील व्हीआयपी संस्कृती संपवू पाहत आहे. कारण, अशीही काही प्रकरणं समोर आली आहेत. ज्यामध्ये लोक आपल्या पदांच्या नावांच्या स्टिकरचा दुरुपयोग करताना आढळून आले आहेत. सध्यातही हा नियम केवळ चंदीगडमध्ये लागू झाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर सोमवारपासून शहरात वाहतूक पोलिसांनी या नियमाची अंमलबजावणी सुरु केली आहे.

29 January 2020

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाने प्रलंबित असलेले शाॅपिग काॅम्प्लेक्स लवकरच सुरू

बिलोली:(ता.प्र) शहरातील हनुमान मंदिर येथील न.प.कॉम्प्लेक्स बाबत आज दिनांक:29 जानेवारी बुधवार रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरच बिलोली शहरातील व्यापाऱ्यांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स लिलावा साठीखुले होणार आहे.सदरील प्रकरण 2008 पासून प्रलंबित होते . मा.नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व उपाध्यक्ष श्री मारुती पटाईत यांच्या प्रयत्नाने शॉपिंग कॉम्प्लेक्स  खुले होणार आहे .पुढील बैठक दि.4 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.आज झालेल्या बैठकीत मा.जिल्हाधिकारी श्रीअरुण डोंगरे ,जिल्हा प्रशासन अधिकारी,श्रीराजेंद्र चव्हाण सहाय्यक संचालक नगर रचना श्रीआलुरकर मा.गौस साहेब,माहुरे साहेब मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे ,नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी उपाध्यक्ष मारुती पटाईत  माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

28 January 2020

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या 462 कोटीच्या आराखड्यास मंजूरी

 नांदेड , दि . 27 : - जिल्हाय वार्षिक योजना ( सर्वसाधारण , अनुसूचित जाती उपयोजना , आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजना ) सन 2020 - 2021 च्या प्रारुप 462 कोटीच्या आराखड्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली . डॉ . शंकरराव चव्हाण नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे संपन्न झाली . जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) अंतर्गत 255 कोटी नियतव्य , अनुसूचित जाती उपयोजना 163 कोटी आदिवासी उपयोजना 237 कोटी आदिवासी क्षेत्रबाट उपयोजना 944 कोटी , माडा 1086 कोटी अशा प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली . या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर , आमदार राजेश पवार , आमदार भिमराव केराम आमदार माधवराव जवळगावकर आमदार श्यामसुंदर शिंदे , आमदार रावसाहेब अंतापूरकर , आमदार मोहन हंबर्डे , आमदार बालाजी कल्याणकर , आमदार तुषार राठोड , आमदार अमर राजूरकर , आमदार राम पाटील रातोळीकर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे , सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर , अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती . या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना , आदिवासी उपयोजना ) सन 2020 - 2021 च्या खर्चास मान्यता देण्यात आली . जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या विकास योजना जसे ( कृषी , पशुसंवर्धन वने , सहकार , ग्रामविकास , शिक्षण , क्रिडा , व्यवसाय शिक्षण आरोग्य पाणीपूरठा व स्वच्छता , नगर विकास मागासवर्गीयाचे कल्याण लघुपाटबंधारे विद्युत विकास , ग्रामीण लघुउद्योग , रस्ते विकास , पर्यटन , तिर्थक्षेत्र इत्यादी विकास क्षेतातील योजना ) राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सर्वसाधारण योजना , अनुसुचित जाती उपयोजना आदिवासी उपयोजना अशा तीन प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतो . या बैठकीस 2020 - 2021 या तीन योजनेसाठी एकूण 462 कोटीच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली . ( रुपये लाखात ) अ . क्र . योजना कार्यान्व्यीन यंत्रणांची मागणी कार्यकारी समितीने शिफारस केलेला नियतव्यकय अतिरिक्ते मागणी 1 . सर्वसाधारण योजना 47442 . 2925532 . 00 21910 . 29 2 . अनुसुचित जाती उपयोजना 17428 . 82 16351 . 00 1077 . 82 
आदिवासी उपयोजना 4188 . 00 2376 . 82 1811 . 18 4 आदिवासी क्षेत्रबाह्य उपयोजना 1515 . 26944 . 64 570 . 62 5 . माडा 1990 . 201086 . 51903 . 69 एकूण जिवायो 72564 . 5746290 . 9726273 . 60 जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण , अनुसूचित जाती उपयोजना , आदिवासी उपयोजना ) सन 2020 - 2021 मध्ये खर्च करावयाच्या खर्चाचे नियोजन याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली . जिल्ह्यात वाळूची तीव्र टंचाई असून यासंदर्भात जिल्हासधिकारी यांनी तात्कामळ उपाय योजना कराव्यायत . जिल्हायातील तीर्थक्षेत्र विकासासाठी 6 कोटी मंजूर तर अतिरिक्तठ 3 कोटीची मागणी करण्यात आली आहे . पाळज येथील श्री गणपती मंदीराच्या विकासासाठी श्री क्षेत्र पाळज याचा अ दर्जा तीर्थक्षेत्रात समावेश करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल . यानिमित्त पालकमंत्री श्री चव्हाण यांनी प्रत्येक आमदारांनी आपआपल्याली विधानसभा मतदारसंघात अ दर्जा देण्याकसाठी तीर्थक्षेत्राचे नाव सुचवावे , असे सांगितले . पालकमंत्री श्री . चव्हाण पुढे म्हणाले , डॉ . शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्याय दुरुस्ती साठी 2 कोटी मंजूर उर्वरित निधी पुढील वर्षी देणार आहे . जिल्हाष परिषदेच्याअ परिसरातील मोडकळीस आलेल्याग / जीर्ण झालेल्यास ईमारती पाडून या नंतर या परिसरात सुसज्ज इमारत उभारणे . वजिराबादच्या मल्टीलपर्पज हायस्कुदल मैदानावर मुंबई पुणेच्याा धर्तीवर अडरग्राऊंड पार्कीगची व्यजवस्थाज । निर्माण करणे यासंदर्भात जिल्हाद परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्कासळ बैठका घेऊन तात्काळ प्रस्तारव सादर करावेत . ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड टाळण्यारसाठी प्राथमिक आरोग्यळ केंद्रास 21 रुग्णावाहीका देण्यात येणार असून भविष्यात रुग्णवाहिकेच्या ताफ्यात आणखी वाढ होईल शहरातील वाहतुक व्य वस्थाट सुधारण्यासाठी सिग्नल सिस्टीणम झेब्रा क्रॉसिंग डाव्या बाजूस वळण्यातच्यां पट्टया व पोलीस कर्मचारी वाढविणे . वाहतुकीची समस्याट दूर करण्याणसाठी डीएसपी ऑफिस ते कलामंदीर पर्यंतची शासकीय मालमत्ताथ संपादीत करुन 10 फुटाचा रस्तार रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित केले आहे . भोकर तालुक्यातील दिवशी येथे कोल्हापूरी बंधा - यावर नाविन्य पुर्ण योजनेतून स्वंययचलीत दरवाजे बसविण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या . सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणा - या विद्युत समस्याी कमी करण्या साठी नांदेड येथे हिंगोली , नांदेड , परभणीसाठी स्वणतंत्र कार्यालय स्थापन करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याबाबतही यावेळी पालकमंत्री म्हणाले . जिल्ह्यातील सर्व आमदारांनी त्यांच्या तालुक्यात पाणी टंचाई आराखड्याच्या बैठका घेऊन त्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे 10 फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत .गोदावरी नदी शुध्दीकरणासाठी 77 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे . त्यारपैकी 17 . 79 कोटीच्याव प्रस्तानव प्रशासकीय मान्यिता मिळालेली आहे . याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्याहत येणार आहे . जिल्ह्या तील विद्युत वितरण व्य वस्थेपसाठी ट्रान्सतफॉर्मर ऑईल उपलब्धवता , किटकॅट उपलब्धता व उच्चस दाब , सिंगल फेज , पोल इत्यादी दुरुस्ती , विद्युत चोरी इत्याईदी संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्यावत यावी . 950 कोटी निधी प्रस्तावित असून राज्यास्तरीय बैठकीत वाढीव तरतूदीसाठी प्रयत्न करण्यात येणार , असे श्री . चव्हाण म्हणाले . नांदेड शहरात संवेदनशिल भागामध्ये CCTV बसविण्यातसंदर्भात भरीव निधी उपलब्धब करुन देण्यारसाठी प्रयत्नक करण्यात येणार यासाठी जिल्हाधिकारी , आयुक्तय , मनपा , पोलीस अधिक्षक यांना निर्देश देण्याठत आले आहेत . उर्दू घराचे उद्घाटनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याठत येईल . यासाठी उर्दु अॅकॅडमी मुंबई यांचकडून आवश्यलक ती माहिती उपलब्धा करुन देण्यात यावी , असेही पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा बैठकीत सांगितले . या बैठकीस सर्व समिती सदस्य , तसेच विविध विभागचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते . यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी एस . बी . कालगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत केले . # नांदेड जिल्हा माहिती कार्यालय

काळ्या बाजारात जाणारा गव्हाचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला . . ! मुखेड तालुक्यातील आंदेगाववाडी येथील घटना

मुखेड :स्वस्त धान्य दुकान मार्फत गोर - गरीबांना मिळणारा गव्हू हा ट्रक भरून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून मुखेड तालुक्यातील आंदेगाव वाडी येथे शनिवार दि २५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पकडण्यात आले असून या गुन्ह्याती ट्रक हा मुक्रमाबाद पोलिस यांच्या ताब्यात दिला आहे . तर पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया चालू असून कारवाईही स्थानिक गुन्हे शाखेकडूनच होणार असल्याचे मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गड़ीमे यांनी सांगितले . शासना कडून मिळणाऱ्या गव्हू , तांदळाची सर्रास काळ्या बाजारात विक्री होत असल्यामुळेच आज गरीबांना राशनचा माल मिळत नाही . याला प्रशासनाचीही मुखसंमती असल्यामुळेच सर्रास धान्याचा काळा बाजार चालू आहे . मुक्रमाबाद पासून काही अंतरावर असलेल्या आंदेगाववाडी येथे सायंकाळी साडेपाच वाजता एम एच बी . ई . ४८७८ या आयशर ट्रक मध्ये स्वस्त धान्य दुकानातील प्रत्येकी ५० किलो वजनाचे १४० पोते असे एकूण सात टन गहू हा , विक्रीसाठी काळ्या बाजारात जात असल्याची कुण - कुणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली होती . त्या नुसार सापळा रचण्यात आला पण आपल्या मागावर पोलिस असल्याचे पाहून ट्रक ड्रायव्हर संजय रामोड यांनी पोलिसांना चकवा देत वा - याच्या वेगात ट्रक पळवून आंदेगाव वाडी येथील मंदिराच्या पाठीमागे लपवून लावला पोलिस पाठलाग करत गावात पोहचले . गाव छोटे असल्यामुळे मंदिराच्या पाठीमागे लावलेला मोठा ट्रक सहजच पोलिसांना दिसून आल्यानंतर लगेचच ट्रक मध्ये असलेला गव्हू ताब्यात घेऊन ट्रक चालकाला हा , माल कोठून आणला ? व पुढे कुठे जात आहे . ? अशी विचारणा करत वाहतूक परवाना व इतर कागद पत्राची विचारणा केली असता ट्रक चालक संजय रामोड व ट्रक मालकाचा भाऊ सदाशिव जाधव , यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे आढळली नसल्यामुळे या दोघांना ताब्यात घेऊन मुक्रमाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले . स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे काळा बाजार करणाऱ्यांचे व आपृली आर्थिक तडजोड घडऊन आणून याला मुखसंमत्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणानले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे . तर काळ्या बाजारात जाणारा गहू पकडून ठेवल्यामुळे या गुन्हायात आपण अडकून पडू नये यासाठी हा माल वैध कसा होईल यासाठी सगळेजण प्रयत्न करीत असून यासाठी प्रशासनातील अधिकारीही आता पुढे सरसावलेले दिसून येत असून यावर आता प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे . तर या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रमाकांत पांचाळ , येळगे , वडजे , जांबळीकर शिंदे हे , पोलिस कर्मचारी होती . नायब तहसिलदार यांना या संबधातील असलेली सर्वच कागदपत्रे घेऊन मुक्रमाबाद येथे बोलावले असून कागदपत्रे व पकडलेला माल हे , जळऊन आले तर ठीक अन्यथा यातील आरोपीवर लगेचच गुन्हा दाखल करण्यात येईल . - द्वारकादास चिखलीकर , वरिष्ठ पोलिस निरीक्षक , स्थानिक गन्हे शाखा नांदेड

27 January 2020

रामतिर्थ अत्याचार प्रकरणी प्राचार्य व मुख्याध्यापक पोलीस कोठडीत

बिलोली | रामतिर्थ येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील प्राचार्य आणि मुख्याध्यापकाला बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी 1 फेबुवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे .दि . 17 जानेवारी रोजी पोस्को कायद्याअंतर्गत रामतिर्थ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एक प्राचार्य , एक मुख्याध्यापक , दोन शिक्षक आणि महिला पोषण आहार | बनवणारी महिला अशा पाच जणांची नावे आरोपी म्हणून होतील . सुरुवातीला पोलीसांकडे सय्यद रसुल सय्यद महेबुबसाब ( 46 ) या शिक्षकाला अटक झाली . बिलोली न्यायालयाने त्याला 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे . त्यानंतर काल प्रजासत्ताक दिनी प्राचार्य धनंजय शिवराज शेळके ( 52 ) आणि मुख्याध्यापक प्रदीप धोंडीबा जाधव पाटील ( 46 ) हे दोघे बिलोली पोलीस ठाण्यात हजर झाले . त्यांना काल अटक झाली . या गुन्ह्याचा तपास अहमदपुरच्या पोलीस उपअधिक्षक डॉ . अश्विनी पाटील यांच्याकडे आहे . आज 27 जानेवारी रोजी अश्विनी पाटील , बिलोलीचे । पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी धनंजय शेळके आणि प्रदीप पाटील न्यायालयात हजर केले . न्यायालयात सरकारी वकील ऍड . संदीप कुंडलवाडीकर यांनी या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी देणे कसे आवश्यक आहे याचे सविस्तर सादरीकरण केले . युक्तीवाद ऐकून न्या . विक्रमादित्य मांडे यांनी शेळके आणि पाटीलला 1 फेबुरवारी 2020 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे .

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयत सायकल वाटप

 देगलूर :शहरातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाणारी शाळा म्हणजे सावित्रीबाई फुले शाळा या शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या औचुत्य साधून मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींना सायकल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला . यामध्ये इयत्ता आठवीच्या 39 मलींना सायकल वाटप करण्यात आले तालुक्यात विद्यार्थ्यासाठी सर्वाधीक सवलती मिळवून देणारी शाळा म्हणून सुद्धा या शाळेला ओळखले जाते असे गटशिक्षणाधिकारी जाधवर हे म्हणले . यावेळी श्री जाधवर राजकमार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देगलूर मनोहर माली पाटील केंद्रप्रमुख , देगलूर , इंजिनीयर बलवंत गजभारे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री यशवंत गजभारे व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पाटील के सी तसेच विद्यालयातील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

26 January 2020

रामतीर्थ येथील अत्याचाराच्या आरोपातील 2 शिक्षक बिलोली पोलीस ठाण्यात अवतरले

बिलोली: शंकरनगर अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणात आरोप असलेले दोन शिक्षक आज भारतीय प्रजासत्ताक दिनी बिलोली पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत . याप्रकरणातील एक शिक्षक 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहे .दिनांक 17 जानेवारी रोजी रामतीर्थ पोलीस ठाण्यात एका आईच्या तक्रारीवरुन तिच्या सहावीत शिकणाऱ्या बालिकेवर अत्याचार केल्याची तक्रार आहे . या तक्रारीवरुन रामतीर्थ पोलिसांनी शाळेचे शिक्षक सय्यद रसूल सय्यद महेबूब साब याच्यासह डी एस पाटील , राजुळे आणि शेळके सोबत पोषण आहार बनविणारी महिला अशा पाच जणांविरुध्द बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ( पोस्को ) नुसार गुन्हा दाखल केला . या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस उपअधीक्षक डॉ . सिध्देश्वर धुमाळ यांच्याकडे देण्यात आला . पण गुन्हा अहमदपूरच्या पोलीस उप अधीक्षक डॉ अश्विनी पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला . पोलिसानी दिनांक बावीस जानेवारी रोजी रामतीर्थ येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक सय्यद रसूल सय्यद महेबूब साब चौरेचाळीस यांना ताब्यात घेतले . बिलोली न्यायालयाने त्यांना 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले होते . फरार असलेल्या शिक्षकांना शोधून काढण्यासाठी पोलिसानी जंग जंग पछाडले . शिक्षकांवर दबाव वाढतच राहिला . आज सर्वत्र एकाहतरवा वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा होत असतांना संपूर्ण भारतभर आनंदाचे वातावरण होते . अचानकच दुपारी एक वाजेच्या सुमारास बिलोली पोलीस ठाण्यात दोन माणसे अवतरली . त्यांनी आपली नावे धंनजय शिवराज शेळके ( 52 ) राहणार. वंजारवाडा ता . जळकोट जिल्हा लातूर आणि प्रदीप धोंडिबा शेळके ( 46 ) राहणार . कामरजपल्ली तालुका बिलोली सांगितली . आम्ही दोघेही रामतीर्थ येथील शाळा साईबाबा विध्यालयत मुख्याध्यापक आहोत असे सांगितले . बिलोलीच्या ठाणे अंमलदाराने या दोन माणसांची माहिती आपले पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांना सांगितली . या गुन्ह्याचा तपास .डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या कडे असल्याने शिवाजी डोईफोडेने हि माहिती त्यांना दिली .डॉक्टर.अश्विनी पाटील यांच्या सूचनेनुसार आता त्या दोन्ही शिक्षकांना अटक होईल आणि उद्या .डॉक्टर.अश्विनी पाटील स्वतः त्यांना बिलोली न्यायालयात हजर करतील आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु होणार आहे . रामतीर्थ येथे बालिकेवर अत्याचार करण्याचा आरोप असलेल्या तीन जणांना आता अटक झाली आहे .

24 January 2020

नांदेड देगलूर मार्गावर भिषण अपघात एक जखमी एक जागीच ठार

देगलूर : मालवाहू ट्रक – बोलेरो जीप –  पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बोलेरो वाहनाच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला तर मालवाहू वाहनाचा चालक यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. 
 ही घटना खानापूर फाट्याजवळील जीरो फाट्याजवळ गुरुवारी ता. २३ रोजी सकाळी १०-०० वाजता घडली अपघातावेळी रस्त्यावर एक पाण्याची वाहतूक करणारा आटो थांबून होता त्यामुळे या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली .देगलूर नांदेड रोड खानापूर फाट्यानजीक असलेल्या झिरो फाट्यावर मालवाहू ट्रक क्रमांक एम. एच.४ जेके ७१२४ हे वाहन हैदराबाद वरून नांदेड कडे जात होते तर बोलेरो पिकप क्रमांक एम. एच. २६ बि. ई. ३४४७ हे वाहन नांदेड वरून देगलूर कडे येत होती तर याच रस्त्यावर ऑटो क्रमांक ८८५४ थांबून होते त्यामुळे या दोन वाहनाची समोरा-समोर जोराची धडक झाली या अपघातात बोलेरो वाहनाचे इंजिन वीस फूट लांब जाऊन पडले या झालेल्या अपघातात बोलेरो चालक माधव धोंडीबा हनमंते राहणार माळकौठा नांदेड हा जागीच ठार झाला तर मालवाहू ट्रक क्रमांक चालक गजानन गंगाधर डोईफोडे हा गंभीर जखमी झाला.

          त्याच्यावर देगलूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली ही घटना गुरुवारी सकाळी १०-०० वाजता घडल्याने काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. काही वेळानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली रस्त्यात थांबलेल्या आटोचालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात आले याप्रकरणी देगलूर पोलिसात अपघाताची नोंद करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

23 January 2020

शंकरनगर येथे बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बिलोली बंद व रास्ता रोको आंदोलन

बिलोली ( प्रतिनिधी ) तालुक्यातील शंकरनगरच्या साईबाबा प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सातव्या | वर्गात शिकत असलेल्या आल्पवयीन विद्यार्थीनीवर केलेल्या लैंगिक आत्याचाराचे बिलोली तालुक्यात तिव्र पडसाद उमटले . दि . २२ जानेवारी रोजी तालुक्यातील तमाम समाज बांधवासह काही राजकीय पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते एकत्र येऊन लोक स्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष प्रा . राम चंद्र भरांडे , तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रा . शिवाजी पाटील पाचपिंपळीकर , जि . प . सदस्य संजयअप्पा बेळगे , पंचायत समिती उपसभापती शंकर यंकम , नगर पालीका उपाध्यक्ष मारोती पटाईत , न . पा . म जी अध्यक्ष भिमराव जेठे , अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख सुलेमान यांच्या उपस्थितीत रितसर व शांततामय मार्गाने रास्ता रोको करून शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले . यामध्ये शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तपणे आपआपली दुकाने बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध केला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम जेठे यांनी पिडीत कुटुंबास आर्थिक मदत देऊ केली . या घटनेचे शासन व प्रशासन तातडीने गांभीर्य ओळखून मोकाट आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे , हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा , खटला प्रसिध्द कायदे तज्ञा मार्फत चालविण्यात यावा , पिडित मुलीच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे , कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नौकरीत सामावून घेण्यात यावे , साईबाबा शिक्षण सस्थेची माण्यता रद्द करण्यात | यावी ७ ) पिडीत मुलीच्या कुटुंबास संरक्षण देण्यात यावे या मागण्यासह अन्य काही मागण्याचे निवेदन महसल प्रशासनास शिष्टमंडळाने देऊन भावना शासनापर्यंत पोहचविण्याची विनंती केली . या निवेदनावर प्रामुख्याने उत्तम जेठे , मारोती वाघमारे , पं . स सदस्य सभांजी शेळके , भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे राजु पाटील शिंदे , वल्लीयोदीन फारूखी , बाबूराव गंजगावकर , काँ गंगाधर आरसे , प्रकाश पोवाडे , बाबूराव इंगळे , रत्नाकर जाधव , बस्वराज वाघमारे , मुन्ना पोवाडे , पि . जी गायकवाड , भिमराव बडूकर , शेख सुलेमान , बसवंत मुंडकर , माधव एडके , मोहसीन खान , अंकोश बालके ,शुभम निदाने,मारोती शिरगीरे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत . यासाठी अगदी सकाळ पासून तालुक्यातुन मोठ्या संख्येने नागरीक शहरात दाखल होऊन घोषणाबाजी करीत शहर वासियांचे लक्ष वेधुन घेतले .

22 January 2020

रामतीर्थ अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराच्या आरोपातील एक शिक्षक स्थागुशाच्या ताब्यात


नांदेड | एका अल्पवयीन निरागस बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपातील 4 शिक्षकांपैकी एकाला स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे .17 जानेवारी रोजी एका आईच्या तक्रारीवरुन तिच्या सहावी वर्गात शिकणाऱ्या 11 वर्षीय निरागस बालिकेवर एक - दिड महिन्यापुर्वी शाळेतच अत्याचार झाल्याची तक्रार दिली . त्या बालिकेवर नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता पण 17 जानेवारीला याबाबतची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाला गुन्ह्याचे स्वरुप प्राप्त झाले . गुन्हा दाखल होताच तक्रारीत असलेल्या नावातील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी . आर . शेळके , प्राचार्य पी . डी . पाटील , शिक्षक सय्यद रसूल ,  बी . आर . राजूळे यांच्यासह रामतिर्थच्या श्री साईबाबा प्राथमिक विद्यालयात पोषण आहार तयार करणारी महिला गायब झाली गुन्हा हा अल्पवयीन बालिकेसंदर्भाने असल्याने त्याचे पडसाद शहरासह जिल्ह्यात वेगवेळ्या ठिकाणी उमटत होते . आज युवा पँथरने जिल्हाधिकारी कार्यालयासमक्ष धरणे आंदोलन केले . बिलोली शहर सुध्दा आज बंद ठेवण्यात आले होते उमरी बंद होते .17 जानेवारी रोजी गुन्ह्याचे गांभीर्य पाहून पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार आणि दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनात या फरार आरोपींना शोधण्याची सुरुवात झाली . या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक डॉ . सिध्देश्वर धुमाळ यांच्याकडे आहे . स्थानिक गुन्हा शाखेतील एका पथकाचे नेतृत्व करत पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी अहमदपूर , उदगीर , औसा , निलंगा आणि लातूर या भागात धावपळ केली आणि आज चिखलीकरच्या पथकाने सय्यद रसूल मेहबुब ( 44 ) या प्राथमिक शिक्षकाला ताब्यात घेतले आहे . सायंकाळी 6 वाजेपर्यंत ते नांदेडला पोहचतील अशी अपेक्षा आहे . त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी शेख रसुलला डॉ . सिध्देश्वर धुमाळ यांच्या ताब्यात देण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या अटकेची प्रक्रिया पुर्ण होईल . बहुदा उद्या दि . 23 जानेवारी रोजी पकडलेल्या शिक्षकाला डॉ . सिध्देश्वर धुमाळ न्यायालयात हजर करतील आणि तपासासाठी पोलीस कोठडी मागतील असे चित्र आहे .

दर बुधवारी मुंबईत ‘लोकदरबार’; अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई, दि. २२ जानेवारी २०२०:
आपल्या विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांचे परिश्रम आणि वेळ वाचविण्यासाठी दर बुधवारी मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या गांधी भवन कार्यालयात ‘लोकदरबार’चे आयोजन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, विशेषतः मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यातही एखादी शासकीय बैठक लागल्यास मंत्र्यांना त्यासाठी जावे लागते व लोकांचा अधिक वेळ खर्ची पडतो. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी मी स्वतःच दर बुधवारी दुपारी ३ वाजता गांधी भवन, तन्ना हाऊस, मॅजेस्टिक एमएलए हॉस्टेलच्या मागे, रिगल सर्कलजवळ, कुलाबा, मुंबई येथील प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे ठरवले आहे. पहिला ‘लोकदरबार’ बुधवार, दि. २२ जानेवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामुळे लोकांना आपली निवेदने देण्यासाठी निश्चित जागा व वेळ उपलब्ध होऊ शकेल, तसेच त्यांचा वेळ आणि श्रमही वाचतील. हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असल्याने याला ‘लोकदरबार’ असे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.

शंकरनगर, बलात्कार प्रकरणी नांदेड जिल्हा NSUI च्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

नांदेड| बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ६ व्या वर्गात शिकरणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थीनीवर अत्याचार केलेल्या नराधमांना तात्काळ अटक करून निलंबित करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन एनएसयुआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल जेठे यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले . यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे , उपाध्यक्ष अमोल जेठे , सुभाष सोनाळे , प्रतिक देमनगुडे , अक्षय गोवंदे , कपिल ऐडके , शिवारा सोळंके , राहल कौशल्य , अझिम शेख , मुनवर शेख , अशिष गोवंदे , सतिश हनमंते , सौरभ सूर्यजन , रुपेश आळणे , यश अटकोरे , कुणाल कोल्हे , अक्षय देशमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.

21 January 2020

इंडियन नर्सिंग काॅन्सील (आय एन सी) चे रजिस्टेशन जिल्हाध्यक्ष मा.आदी बनसोडे यांच्या प्रयत्नातून सुरू

 नांदेड:- बि एससी नर्सिंग, जि.एन.एम, ए.एन.एम, पास झालेल्या विद्यार्थ्यांचे आरोग्यसेवक सेवीकाचे इंडियन नर्सिंग काॅन्सील मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मा.आदी बनसोडे यांनी आवाहन केले आहे. नर्सिंग मध्ये बहुचर्चित व राष्ट्रीय पातळीवर नोकरी करीता आय.एन.सि.चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सदरील नोंदणी नांदेड येथील द प्राइम नर्सिंग अॅकडमी बिके हाॅल समोर सुरू असल्याची माहिती अॅकडमीचे संचालक अरविंद कनगीरे, संदीप कोल्हे (जिल्हासरचिटणीस),आनंद घोडके (जिल्हा संघटक) यांनी दिली आहे.नर्सिंग मध्ये सदरील कॅम्प चा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णाच्या खाजगी नर्सेसच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढणारी एकमेव संघटना  रुग्ण हक्क परिषद नांदेड जिल्हा च्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.. सदरील रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे

अवैध वाळू उपसा करणारे तराफे जाळणाऱ्या तहसील पथकाच्या गाडीवर जबर हल्ला

नांदेड | गोदावरी नदीतून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पथकाने कौठा परिसरातील स्मशानाजवळच्या नदीकाठावरील 50 तराफे जाळल्यानंतर परत येतांना जवळपास 200 लोकांच्या जमावाने त्या वाहनावर चारही बाजूनी तुफान दगडफेक केली आहे . या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .
नांदेडचे तहसीलदार अरुण जराड यांचे सरकारी वाहन क्रमांक एम . एच . 26 आर . 2611 घेवून मंडळ अधिकारी के . एम . नागरवाड , अनिल धुळगंडे , तलाठी मनोज देवणे , प्रदिप पाटील , सचिन नरवाडे , श्वेता लाठी , कोतवाल बालाजी सोनटक्के आणि वाहन चालक शेख जहिरोद्दीन हे कौठा परिसरातील नदी घाटावर गेले त्या ठिकाणी उपलब्ध असलेले नदीतून वाळू काढण्यासाठीचे 50 तराफे या पथकाने जाळून टाकले . ते पथक परत येत असतांना अंधार झाला होता . या अंधाराचा फायदा घेत अवैध रेती उपसा करणाऱ्या कामामध्ये नेहमी लिप्त असलेल्याजवळपास 100 ते 200 जणांच्या जमावाने ज्यात बहतांश महिला होत्या . त्यांनी हल्ला केला . चौहूबाजून जोरदार दगडफेक झाली . या दगडफेकीत कोणालाही मार लागला | की , नाही याची माहिती प्राप्त झाली नाही . जमावाने सरकारी लोकांना आर्वाच्च शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीही केली . घटनेची माहिती अरुण जराड यांना कळाली तेंव्हा त्यांनी नायब तहसीलदार मुंजाजी काकडे यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले . त्वरीत पोलीसांना सुध्दा बोलावण्यात आले .
इतवाराचे पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील , इतवाराचे पोलीस निरिक्षक प्रदीप काकडे , नांदेड ग्रामीणचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तेथे धावले . पोलीस येईपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते . या संदर्भाने तहसीलदार अरुण जराड यांच्याशी संपर्क साधला तेंव्हा त्यांनी कितीही मोठी दहशत आमच्याविरुध्द पसरवली तरी सुध्दा अवैध रेती उपसा है थांबवण्याची कार्यवाही आम्ही करत राहणार असे सांगितले . वृत्त लिहिपर्यंत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

20 January 2020

बिलोलीत पल्स पोलिओ लसिकरण मोहीमेत 93% पुर्ण

बिलोली : पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेत एकूण  93% पूर्ण झाले आहे बाकीचे राहिलेले उदिष्ट पूर्ण करण्यात येईल असे उपजिल्हा रुग्णालयचे अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी दिली .
पाच वर्ष खालील मुलांना पल्स पोलिओ डोस पाजन्याची विशेष मोहीम 19 जानेवारी रविवार संपन्न झाली या मोहिमेत एकूण 3843 पैकी 3580  93%बालकांना डोस पाजवन्यात आले उर्वरित राहिलेले बालकांना फिरते पथक तैनात करून घरोघरी फिरुन राहिलेले उदिष्ट 100% पूर्ण करण्यात येईलअसल्याचे  वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार यांनी सांगितले शहरातील विविध बूथ वर् पल्स पोलिओ चे लसिकरण देण्यात आले होते बिलोली ग्रामीण रुग्णालयात बिलोली येथील जामा मस्जिद येथील मौलाना अहमद बेग ईनामदार व पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेख फारुख अहेमद,नांदेड़ येथील एम.ओ.डॉ. अविनाश वाघमारे यांच्या हस्ते मुलांना पोलिओ चे डोस देण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयचे अधीक्षक वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर व कर्मचारी आदिनी परिश्रम घेतले

19 January 2020

भोकरः अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्नः आरोपी जाधव यास 3 वर्षे शिक्षा

नांदेड दि . 19 , प्रतिनिधी - एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा - या आरोपी गोविंद भगवानराव जाधव , वय 22 यास जिल्हा स सत्र न्यायालय , भोकरचे न्यायाधिश एम . एस . शेख यांनी  दि . 18 रोजी तीन वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली . _ _ _ पोलीस ठाणे भोकर अंतर्गत मौजे हाडोळी ता . भोकर येथे सदरील मुलीच्या घराच्या दक्षिण बाजुच्या बोळीत दि . 28 जुलै 2018 रोजी दुपारी 2 वा . सदरील पिडीत अल्पवयीन वय 15 वर्षान शौच्यासाठी गेली असत गोविंद भगवानराव जाधव याने अचानक पिडीतेच्या पाठमोरी येवून पिडीत अल्पवयीन मुलीचा पंजाबी ड्रेस पकडून पिडीतेसोबत तिच्या मनाविरूध्द बलात्कार करण्याचा प्रयत्न केला . पिडीतेच्या ओरडण्याने तिचे नातेवाईक लगेच धावून आल्याने आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला . हा सर्व प्रकार पिडीतेने नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्याप्रमाणे भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली व गुन करण्यात आला होता . या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले . साक्षीदारांचे साक्षपुरावा व आरोपी विरूध्द सबळ पुरावे आधारे आरोपीस दोषी ठरविण्यात आले . भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम . एस . शेख यांनी आरोपी गोविंद भगवानराव जाधव यास शिक्षा कलम 354 , 354 - ड , अ . जा . अ . ज . व कलम 8 पोक्सो अॅक्ट मध्ये एकूण 3 वर्षाची शिक्षा व 9 हजार रू . दंड ठोठावण्यात आला . सरकारी पक्षातर्फे अॅड . रमेश राजुरकर यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी एस . बी . देशपांडे यांनी काम पाहिले त्यांना सहायक म्हणून पैरवी अधिकारी फिरोज खॉ पठाण यांनी मदत केली .

18 January 2020

सातवीच्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ५ जणांविरुध्द रामतीर्थ पोलिसात गुन्हा दाखल

बिलोली | शंकरनगर तालुका बिलोली येथील श्री . साईबाबा प्राथमिक विद्यालयातील सातविच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द रामतीर्थ पोलिसात दि . 17 जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही जण फरार असल्याने या प्रकरणाचा तपास बिलोली येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहेत .
श्री . साईबाबा प्राथमिक विद्यालय शंकरनगर ता बिलोली येथील शिक्षक राजूळे व रसूल सय्यद या दोघांनी शाळेच्या इयत्ता सातवित शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीस शाळेतील संस्कृतीक कार्यक्रमाच्या डान्सचे व्हिडिओ दाखवतो म्हणून सदरील मुलीला शाळेच्या रूममध्ये बोलवून अश्लील व्हिडिओ व फोटो दाखवुन तिची छाती दाबुन जबरी संभोग केल्याचा धक्कादायक प्रकार दि . 17 जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजता समोर आला आहे . तसेच या प्रकराची कुठेही वाच्यता केल्यास तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हणून अल्पवयीन मुलीच्या आईकडुन बॉन्ड लिहुन घेण्यात आले असून
  नर्मदाबाई विलास वाघमारे वय 35 यांनी दिलेल्या फिर्यादी वरुण सय्यद रसुलसर , राजुळेसर , या दोन्ही शिक्षकासह शाळेचे प्राचार्य शेळके , मुख्याध्यापक पाटील आणि शालेय पोषण आहार शिजवनारी सुरेखाबाई बनसोडे या पाच जणांविरुध्द रामतीर्थ पोलिस ठाण्यात कलम 376 ( D ) , 376 ( 2 ) , ( N ) , 506 , 34भादंवि सह कलम 4 , 6 , 10 , 12 , श . लैं . अ . ब . स . अधी - 2012 सह कलम 3 ( 1 ) ( w ) 3 ( 2 ) ( v ) अ . जा . 2015 प्रमाणे रामतीर्थ पोलिस ठाण्यातगुन्हा दाखलकरण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ व सपोनि सोमनाथ शिंदे हे करीत आहेत .
साईबाबा प्राथमिक विद्यालय सातव्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण करून शिक्षण क्षेत्राला काळीमा लावनार्या शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात धिक्कार केल्या जात आसून हा प्रकार गेल्या एक ते दीड महिना अगोदर घडला असून हि अल्पवयीन मुलगी नांदेड येथील किर्टीकल रूग्णालयात उपचार घेत असल्याने संबंधित प्रकरणाची इतके दिवस कुठेही कोणीही रितसर फिर्याद का देण्यात आले नसल्याने या बाबत शंकरनगर परिसरात उलट सुलट चर्चा केली जात आहे .

पाच वर्षा खालील मुलांना पल्स पोलिओचे लस देवून राष्ट्र कार्यास सहकार्य करावे* -डॉ.नागेश लखमावार

बिलोली शहरात पल्स पोलिओ लसिकरण जनजागृतीसाठी  प्रभात फेरी.
बिलोली: (प्रतिनिधी)शुभम निदाने
बिलोली उपजिल्हा रुग्णालय बिलोलीच्या वतीने दि.१९ रोज रविवार रोजी शून्य ते पाच वर्ष  वयोगटातील मुलांसाठी पोलिओ लसिकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीम अंतर्गत आज रोजी पल्स पोलिओ जनजागृती मोहीम रैली काढन्यात आली.
बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयच्या विभागाच्या वतीने दि.१९ रोज रविवारी पल्स पोलिओ मोहीम राबविन्यात येत आहे शून्य ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओ लसिकरण डोस देवून राष्ट्र कार्यास सहकार्य करावे व या मोहिमेत पालकानी आपल्या बालकांना  पोलिओ लसिकरणाचा डोस ग्रामीण रुग्णालय बिलोली,कन्या शाळा,नगर परिषद शाळा बिलोली,पंचायत समिति,समाज मंदिर आंबेडकर नगर,देशमुख नगर,जनक्रांति वाचनालय गांधीनगर,ट्रांजिट टीम जूना बसस्थानक,ट्रांजिट टीम नवीन बसस्थानक बिलोली,मोबाईल टिम आदि बूथ वर  न चुकता आपल्या जवळच्या बूथ वर जाऊन पोलिओ चा डोस द्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी केले आज दि.१८ रोज शनिवार सकाळी छोटी गल्ली,गांधी चौक  मार्ग ते जूना बसस्थानक पल्स पोलिओ जनजागृती रैली काळण्यात आली यावेळी वैद्यकीय अधीक्षक नागेश लखमावार, वैद्यकीय  अधिकारी डॉ.सतीश तोटावार,डॉ.झहिम सिदिखीं,डॉ.सुनील कदम,डॉ.शेडके,डॉ.मसले,सौ.के.एल.ठाकुर,शेख सोहेल, शेख अनसार,ओम सूर्यवंशी,बसवंत आदि कर्मचारी परिश्रम घेत आहे.

15 January 2020

छत्रपती शिवाजी महाराजांची नरेंद्र मोदी शी तुलना करणाऱ्या गोयलचा केला निषेध


बिलोली:(वार्ताहर):
आजचे शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर देशभरात वादंग उठलेले असतांना त्यांचा आज बिलोली तालुका काँग्रेस पक्षा तरफे जाहीर निषेध करण्यात आले.
छत्रपती शिवराय यांच्याशी पंतप्रधान यांची तुलना करणारे पुस्तक नुकतेच दिल्ली येथील भाजपा कार्यालयात भाजपा नेते जय भगवान गोयल यांनी प्रकाशित केले आहे.यावरून देशभरात वाद सुरु झाला असून त्यांचा बिलोली तालुका काँग्रेस पक्षा तरफे आज दि.१४ रोजी तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देवून घटनेचा जाहिर निषेध करण्यात आले  यावेळी नगरसेवक अमजद चाऊस,जावेद क़ुरैशी,जिल्हा उपाध्यक्ष शेख फारुख अहेमद,संदेश जाधव,पांडुरंग रामपुरे,राजू पाटील,संदीप कटारे,शुभम निदाने,प्रवीण सोनकाम्बळे,विकास जाधव आदिची उपस्थित होती.

09 January 2020

बिलोली आगारास पावले मल्हारी दहा लाख रुपयांचे उत्पन्न

बिलोली :दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव येथील मल्हारी म्हाळसाकांत यात्रेनिमित्त बिलोली आगाराचे प्रमुख संजय वाळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जादा बस सोडण्यात आल्या . या जादा बसमधून आगाराला १० लाख ५९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले . श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेसाठी बिलोली आगारातून यात्रेला सुरूवात झाल्यापासून ते यात्रा संपेपर्यंत बिलोली बसस्थानक व नरसी बसस्थानकातून जादा बस सोडण्यात आल्या होत्या . माळेगाव यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या बसच्या २४० फेऱ्यांमध्ये २२ हजार २२९ किलोमीटर अंतराच्या फेऱ्याचे अंतर कापण्यात आले . या संपूर्ण फेऱ्यातून माळेगाव यात्रेच्या माध्यमातून बिलोली आगारासाठी । १० लाख ५९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे . नरसी बसस्थानकात या जादा गाड्यांच्या नियोजनासाठी एच . एम . गुरुपवार व के . एन . पांचाळ या दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती . तसेच ए . डी . सुगावकर , एम . व्ही . डाके , जी . जी . सलगरे , आर . के . मलदोडे , एस . जी . गोपणे , एस . एस . जारीकोटकर , बी . एन . परगेवार , एम . पी . तुरटवाड , आर . एन . घाटे , एस . एम . इर्लेवाड , एम . एम . कळसे , आर . बी . ढवळे , एस . टी . ढवळे , एन . एन . सूर्यवंशी , एम . आर . मुळे , आर . एस . गायवेल्हाळ या चालक - वाहकांनी यात्रेत कुठलाही अपघात होणार नाही याची काळजी घेतली , असे बिलोली आगाराचे वाहतूक निरीक्षक खुशाल ओलापाडे यांनी एक्सप्रेस न्यूज लाईव्ह ला बोलताना सांगितले . . .

08 January 2020

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याचं पालकमंत्री कोण?

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत . त्या पुढीलप्रमाणे
1.पुणे - श्री . अजित अनंतराव पवार
2.मुंबई शहर - श्री . अस्लम रमजान अली शेख
3.मुंबई उपनगर - श्री आदित्य उद्धव ठाकरे
4.ठाणे - श्री . एकनाथ संभाजी शिंदे
5.रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6.रत्नागिरी - अॅड . अनिल दत्तात्रय परब
7.सिंधुदुर्ग - श्री . उदय रविंद्र सामंत
8.पालघर - श्री . दादाजी दगडू भुसे
9.नाशिक - श्री . छगन चंद्रकांत भुजबळ
10.धुळे - श्री . अब्दुल नबी सत्तार
11.नंदुरबार - अॅड . के . सी . पाडवी
12.जळगाव - श्री . गुलाबराव रघुनाथ पाटील
13 . अहमदनगर - श्री . हसन मियालाल मुश्रीफ
14 . सातारा - श्री . शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15 . सांगली - श्री जयंत राजाराम पाटील
16 . सोलापूर - श्री . दिलीप दत्तात्रय वळसे - पाटील 17 . कोल्हापूर - श्री . विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
19. जालना- राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड-अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

अशोक चव्हाण दीपिकाच्या पाठीशी

मुंबई – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ट्विटरवर ट्रोल होत आहे. महाराष्ट्रातील नव निर्वाचित मंत्री अशोक चव्हाण दीपिकाच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री झालेल्या हिंसाचाराविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहेत. मंगळवारी रात्री दीपिका या आंदोलनात सहभागी झाली. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती यात सहभागी झाल्याची चर्चा सुरु आहे. #BoycottChhapak नावाचा हॅशगॅटही ट्रेंड होत आहे. महाराष्ट्रातील नव निर्वाचित मंत्री मा. ना अशोकराव चव्हाण यांनी दिपीकाचे समर्थन केले आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काय घडले याबाबत कोणीही आपले मत मांडू शकतो. यामुळे दीपिका या आंदोलनात सहभागी होऊन तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला यात काहीच चुकीचे नसल्याचे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

07 January 2020

समाजाचा हितासाठी सकारात्मक पत्रकारिता करावी -पोलीस निरीक्षक डोईफोडे

बिलोलीःप्रतिनिधी मराठवाडा बहुभाषीक पत्रकार संघाच्या वतीने दि.७ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह बिलोली येथे मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण दिनाचे औचित्य साधुन पोलीस निरीक्षक श्री शिवाजी डोईफोडे साहेब यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले व जेष्ठ पत्रकार ए. जी.क़ुरैशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण च्या रुपान पहिल मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात  सुरु झाल दर्पण या वृत्तपत्राच पहिल अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशीत झाल. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म देखील ६ जानेवारी १८१२ रोजी झाला याच योगायोगाने बाळशास्त्रीचां जन्मदिवस त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस पत्रकार दिन म्हणुन ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात साजरा केला जातो.या अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहिलेले येथील पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे साहेब यानीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेल्या कार्याचा इतिहास सांगतांना ते म्हणाले महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजीक परिवर्तनासाठी जांभेकरांनी पत्रकारीतेचा वापर केला त्याच बरोबर जातीभेद निर्मुलन आणि विधवा पुनर्विवाह सती प्रथा बंदी या बाबींना ते आपल्या दर्पण च्या माध्यमातुन जन माणसा पर्यंत पोहचविण्याच काम केल त्याच प्रमाणे आताच्या पत्रकार बांधवांनी समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारीता करावी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातुन सर्वसामाण्याचे प्रश्न सोडविण्याचे काम करुन समाजापुढे या दिनाचा आदर्श कायम टिकुण ठेवावा असे यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.या पत्रकार दिनी बिलोली येथील जेष्ठ पत्रकार ए.जी.कुरेशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला या प्रसंगी जेष्ठ पत्रकार प्रकाश पोवाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले बहुभाषीक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख यांनी अध्यक्षीय समारोप केला तर सूत्रसंचालन बालाजी नरहरे यांनी केले तर संघाचे सचिव सतीश बळवंतकर यांनी आभार मानले या वेळी बहुभाषीक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेख युनुस, माधव एडके,सुनील कदम,पत्रकार माजीद सर, शेख नवाब, सय्यद रियाज, मार्तंड जेठे ,माधव दंतापल्ले,साईनाथ शिरोळे, शुभम निदाने आदि पत्रकार या वेळी उपस्थित होते

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा


पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे.
हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळकेचा ३-२ने पराभव करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवारांनी या सामन्यांना हजेरी लावली. पवार यांच्या हस्ते हर्षवर्धनला मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.
हर्षद सरगीर हा नाशिक विभागाकडून खेळला. माजी महाराष्ट केसरी अभिजीत कटके याला धूळ चारत हर्षदने फायनलमध्ये धडक मारली. तर, शैलशने तुल्यबळ प्रतिस्पर्धी सोलापूरच्या माऊली जमदाडेवर मात करत फायनलमध्ये धडक मारली.
विशेष म्हणजे हे दोघेही एकाच तालमीतले मल्ल आहेत. हर्षवर्धन आणि शैलेश दोघेही वस्ताद काका पवार यांचे शिष्य आहेत. दोघेही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत

06 January 2020

बिलोली पंचायत समिति सभापती पदी सुंदराबाई पाटील तर उपसभापती शंकर यंकम यांची बिनविरोध निवड

बिलोली:(ता.प्रतिनिधी) 
 दि.६ जानेवारी 2020 रोजी बिलोली पंचायत समिति निवडणुकीत खतगावकर गटाचे रामतीर्थ गटाचे सुंदरा बाई पाटील यांची तर उपसभापती लोहगाव सर्कलचे शंकर यंकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिलोली पंचायत समिति सभापती पद हे इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षित झाले असून पंचायत समिति वर भाजपाचा ताब्यात आहे.आज दि.६ जानेवारी पंचायत समिति सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपा तरफे खतगावकर गटाचे सुंदरा पाटील व ठक्करवाड गटाचे दत्ताराम बोधने हे दोघेही सभापती साठी बाशिंग बाधुन होते शेवटी खतगावकर गटाने काँग्रेस सोबत हातमिळवनी करून सभापती पद हे खा. भास्कराव पाटील खतगावकर गटाकड़े पुन्हा खेचुनआणली.दिवस भराचे घळामोळी नंतर सभापती साठी सुंदरा पाटील तर दत्ताराम बोधने यांनी अर्ज भरला होता तर उपसभापती साठी काँग्रेस तरफे  शंकर यंकम तर संभाजी शेळके  यांनी अर्ज भरला होता शेवटी अर्ज परत घेण्याचे वेळी बोधने व शेळके यांनी माघार घेतल्यासमुळे भाजपा खतगावक गटाचे सभापती पदी सुंदरा पाटील व कांग्रेसचे उपसभापती शंकर यंकम यांची बिनविरोध निवड़ झाली  राज्यात महाविकास आघाडी ची सत्ता असताना बिलोलीत विधानसभेचे पुनावृती झाली विधानसभेत खतगावकर गटाने उगळ प्रचार करून काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर ला विजयात सहभाग नोदविला तर सभापती निवडणुकीत काँग्रेस ने भाजपा ला पाठीबा देवून विधानसभेचे परत फेड केल्याची चर्चा दिवस भरात होत होती .या बिनविरोध निवड झाल्याचे निर्वाचन अधिकारी शरव झाड़के होते तर नायब तहसीलदार आर.जी.चौहान ,प्रशांत नाईक आदिनी काम पाहिले. यावेळीमा. खा. भास्कराव पाटील खतगावकर,आमदार रावसाहेब अंतापुरकर,जिल्हा परिषद सदस्य संजय बेळगे,गणेश पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी पाटील,माजी अध्यक्ष यादवराव तुड़मे,माजी अध्यक्ष संतोष कुलकर्णी,रवि पाटील खतगावकर,उपाध्यक्ष मारोती पटाइत,रामपुरे सर ,दिलीप पांढरे, संदेश जाधव,शेख फारूख आदिची उपस्थित होती

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा

मुंबई , दि . 6 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते , इमारती , पूल आदी कामे ठरलेल्या वेळेत व्हावीत . तसेच त्या कामांचा दर्जा यावर पुढील काळात जास्त भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम वगळून ) अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले . सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर श्री चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात विभागाची आढावा बैठक घेतली . यावेळी विभागाच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले . सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे , विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते . सार्वजनिक बांधकाम विभागाची रचना , विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रस्ते , शासकीय इमारती , पुल आदी कामांची सद्यःस्थिती , पुढील काळात राबविण्यात येणारे उपक्रम आदींची माहिती यावेळी देण्यात आली . रस्ते विभागाचे सचिव सी पी जोशी व बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे यांनी सादरीकरण केले.मंत्री श्री . चव्हाण म्हणाले की , सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील राज्य मार्ग , प्रमुख जिल्हा मार्ग आदी रस्त्यांची कामे करताना ती ठरलेल्या वेळेत व्हायला हवीत . तसेच या रस्त्यांचा दर्जा राखला जावा यासंबंधी जबाबदारी निश्चित केली जावी . रस्त्यांच्या निर्मितीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा . महामार्गाबरोबरच शहरांमधील विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांची कामेही सुरु करावीत . वारंवार खराब होणारे रस्ते हे सिमेंट काँक्रिटने बनवावेत . पथकरातून रस्त्यांची कामे करताना त्या रस्त्यावर येणाऱ्या गावांतील रस्त्यांच्या कामाचा समावेश त्यामध्ये करावा जेणेकरून त्या मार्गावरील गावातील रस्ते उत्तम होतील . रस्त्यांसाठी भूसंपादन केलेल्यांचे पैसे तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करावी . शासकीय इमारती उत्तम व्हाव्यात , खासगी इमारतींप्रमाणेच त्या सुंदर दिसाव्यात , यासाठी त्याचा आराखडा , नियोजन यासाठी विभागातील वास्तुरचनाकारांची स्पर्धा घ्यावी . यासाठी खासगी वास्तुरचनाकारांचीही मदत घेता येईल . राज्यातील विविध निवडणुकीला उभारणाऱ्या उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी एक खिडकी योजना सुरू करावी , अशी सूचनाही श्री . चव्हाण यांनी यावेळी केली . रस्त्यांच्या कामासंदर्भात राज्यमंत्री श्री . भरणे यांनीही यावेळीसूचना केल्या .

05 January 2020

मंत्रीमडळाचे खाते वाटप जाहीर

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित केलेल्या मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाला मंजूरी दिली आहे. अनेक दिवसांपासून रखडलेला खातेवाटप आता निश्चित झाला आहे. त्यामुळे खातेवाटपाची आता औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.खातेवाटपाची अंतिम यादी हाती आली आहे. यादीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि विधी व न्याय खातं असणार आहे. तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण आणि पर्यटन, एकनाथ शिंदेंकडं नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याकडील अर्थखाते काढून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं आहेत. तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते देण्यात आलं आहे. महत्वाचं असणारं गृहखातं अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.काँग्रेसच्या मंत्र्यांपैकी बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम देण्यात आले आहे. तर नितीन राऊत यांना उर्जा खातं देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची यादी-
1. अजित पवार – वित्त व नियोजन (अर्थमंत्री)
2. जयंत पाटील – जलसंपदा
3. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
4. अनिल देशमुख – गृह
5. दिलीप वळसे पाटील – उत्पादन शुल्क व कौशल्य विकास
6. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
7. हसन मुश्रीफ – ग्रामविकास
8. बाळासाहेब पाटील – सहकार
9. राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
10. राजेश टोपे – आरोग्य
11. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
12. नवाब मलिक – कामगार, अल्पसंख्याक विकास
काँग्रेसची यादी –
1. बाळासाहेब थोरात –  महसूल
2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
3. के सी पाडवी – आदिवासी विकास
4. विजय वड्डेटीवार – ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन
5. यशोमती ठाकूर – महिला बालविकास
6. वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
7. अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्य
शिवसेनेची यादी-
1. एकनाथ शिंदे – नगरविकास
2. सुभाष देसाई – उद्योग
3. उदय सामंत – उच्च तंत्र शिक्षणं
4. अनिल परब – संसदीय कामकाज
5. शंकरराव गडाख – जलसंधारण
6. संदीपपान भुमरे –  रोजगार हमी
7. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
8. दादा भुसे – कृषी
9. संजय राठोड –  वने
10. शंभूराज देसाई –  गृहराज्यमंत्री ग्रामीण
11. अब्दुल सत्तार –  महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री
12. बच्चू कडू  – जलसंपदा शालेय कामगार
13.राजेंद्र यड्रावकर – आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन मंत्री

बिलोली येथे ना.अशोकराव चव्हाण यांच अभुतपूर्व स्वागत

बिलोली| भाजप सरकाने पाच वर्षात नांदेडच्या विकासाला खिळ बसविली आहे. एकही रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकासाला मिळाला नाही. आता जिल्ह्याच्या विकासाला चालणा देण्यासाठी माझी भुमिका राहणार आहे.आणि यामुळे बिलोलीकरांनी आता चिंता करण्याचे कारण नाही असे मत ना.अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
राज्यमंत्री मंडळात मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण शुक्रवारी प्रथमच नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.असता शनिवारी संध्याकाळी ६ वाजता विश्राम गृह बिलोली येथे आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करत अशोक चव्हाण जिंदाबाद अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.  जागोजागी कार्यकर्त्यांनी ना.चव्हाण यांचे स्वागत करण्यासाठी बॅंडबाजासह सज्ज होते. याचबरोबर अनेक ठिकाणी चव्हाण यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे नियोजित वेळेपेक्षा तिन तास ते उशीरा पोहचले. त्यां. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत स्विकारण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित झाले. यावेळी ते कार्यकर्त्याीना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मी कार्यकर्त्यांच्या अभूतपुर्व स्वागताने भारावून गेलो आहे.यावेळी आ.अमरनाथ राजूरकर,मा.आ.डि.पी सावंत,मा.आ वसंतराव चव्हाण, आ रावसाहेब अंतापुरकर,जिल्हा अध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, संजय बेळगे,ताअध्यक्ष शिवाजी पा.पाचपिंपळीकर,जिल्हा सरचिटणीस गिरीधर पा.डाकोरे अं.ताअध्यक्ष सुलेमान शेख, महिला ताअध्यक्ष मधुमती ताई सुकलोड,मा.नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, मा नगराध्यक्ष भिमराव जेठे,विधानसभा अध्यक्ष जनार्दन बिराजदार, नगरसेवक जावेद खुरेशी, उत्तम जेठे,फारुख शेख,संदेश जाधव पदाधिकारी व कार्यकर्ते आदि उपस्थित  होते

*पी.एम.किसान योजनेचा शेतकरी बांधव लाभ घ्यावा*

बिलोली ता.प्र.
पी.एम. किसान अंतर्गत पाञ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी बिलोली तालुक्यातील 13689 शेतकऱ्याचे आधार क्रमांक नुसार नाव दुरुस्ती विशेष कँप दिनांक 2/1/2020 ते 6/1/2020 या कालावधीत सेतु केंद्र मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांचे आंधार क्रमांक या तपशील दुरुस्ती करण्याचे आले आहे त्यांनी आपल्या जवळचा सेतु केंद्र मार्फत संपर्क साधून पी.एम.किसान  योजनेत या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ भेटला नाही अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड घेऊन दिनांक 2/1/2019 ते 6/1/2019 आयोजित केलेल्या कँम्पमध्ये सेतू केंद्रामार्फत आपले पी.एम.किसान योजनेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे सदर चा विशेष कँप मा.जिल्हाधिकारी श्री अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.उपविभागीय अधिकारी श्री. शरद झाडके व तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांच्या विशेष प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेले आहे. तालुक्यातील सर्व पात्र शेतकरी लाभार्था यांनी या कँपमध्ये सहभागी होऊन आपला आधार कार्डच तपशिल दुरूस्ती  करून घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदारऔम प्रकाश गौड यांनी केले आहे.

04 January 2020

अब्दुल सत्तार यांचा मंत्री पदाचा राजीनामा

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना , राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती . दरम्यान , मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे . दरम्यान , अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे दाखल झाले आहेत . अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते . त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते . त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती . त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपदअपेक्षा होती . त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले . तर औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले . मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार नाराज झाले . अखेर आज त्यांनी खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला .

ना. अशोक चव्हाण यांच सुधारित नांदेड दौरा

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नव्यानेच समावेश झालेले माजी मुख्यमंत्री तथा कॅबिनेट मंत्री ना . अशोकराव चव्हाण यांचे आज दुपारी नांदेड नगरीत मोठया जल्लोशात व जंगी स्वागत करण्यात आले . नांदेड मध्ये येताच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य त्यांनी आयटीआय कॉर्नर येथील म . ज्योतिराव फुले दांपत्यांच्या पुतळयास अभिवादन केले . या वेळी मा . आ . डि . पी . सावंत , आ . अमर राजुरकर व काँग्रेसचेपदाधिकारी , असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . ना . अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या तीन दिवसाच्या दौर्यावर आहेत . या दौ - र्या दरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . दि . 3 जानेवारी रोजी दुपारी 2 . 30 वाजता मा . ना . अशोकराव चव्हाण यांचे येथील गुरू गोविंदसिंघजी विमानतळावर  आगमन झाले.दुपारी ३ ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे अभ्यंगतांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आली आहे . या वेळेत जिल्ह्याभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी ना . अशोकराव चव्हाण संवाद साधतील . याच दिवशी सायंकाळी 6 वाजता गुरूद्वारा दर्शन तर रात्री 8 वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे . दि . 4 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत शासकीय विश्रामगृहनांदेड येथे अभ्यंगतांशी भेटी , 11 ते 12 यशवंत महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थितीत , दुपारी 2 वाजता धर्माबादकडे प्रयाण , धर्माबाद येथील नगरपालिकेतील आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत बैठक , रात्री 9 वाजता नायगाव येथे आगमन व माजी आ . वसंतराव चव्हाण यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थिती . दि . 5 जानेवारी रोजी सकाळी 10 . 30 वाजता जलसंपदा विभागाची आढावा बैठक ,दि . 5 जानेवारी रोजी सकाळी 10 . 30 वाजता जलसंपदा विभागाची आढावा बैठक , सायंकाळी 6 . 20 वाजता हैदराबादकडे प्रयाण . या पध्दतीने त्यांचा दौरा जाहिर असल्याचे काँग्रेस कार्यालयाकडून माहिती देण्यात आली .

02 January 2020

*माजी मुख्यमंत्री ना.अशोकराव चव्हाण हे उद्या नांदेडमध्ये*


नांदेड :मा.ना.अशोकराव चव्हाण यांची मंत्री पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच दि ३ जानेवारी २०२० रोजी नांदेड येथे आगमन होणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा ना.अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील दौर्यावर येत असून शुक्रवार दि . 3 जानेवारी रोजी .मुंबई येथुन विमानाने नांदेड येथे येणार असून त्यांच नांदेड येथे दुपारी २ वाजता आगमन होणार आहे.नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्तानी त्यांचे भव्य दिव्य स्वागत समारंभ ठेवण्यात आले आहे.त्यानतर मोटर सायकल रॅली  श्री गुरू गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड ते मा.श्री अशोक चव्हाण यांच्या घरापर्यंत काढण्यात येणार आहे .तरी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती  नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कडून करण्यात आले आहे. 

महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने परवानगी नाकारली

 .
 . नवी दिल्ली : मागील अनेक वर्षांपासून दिल्ली या ठिकाणी होत असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळत होत मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही . 2016 साली सुद्धा राजपथावरच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता यानंतर आता तब्बल 3 वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल क्रमांक पटकावत होता . मात्र यावेळी महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर भाजपच्या हातून सत्ता निसटली.आणि शिवसेना काँग्रेस , राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली यामुळेच महाराष्ट्र राज्याला यावेळी संधी दिली जात नाही असं बोललं जातं आहे . . . 26 जानेवारी 2020 रोजी दिल्लीत इंडिया गेटजवळील राजपथावर होणाऱ्या पथसंचलनाला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दरवर्षी निवडक राज्यांच्या । चित्ररथांना पथसंचलनाची संधी मिळते . गेली काही वर्ष महाराष्ट्राचा चित्ररथ पथसंचलनात झळकताना दिसतो . महाराष्ट्राच्या चित्ररथाने 2015 नंतर दोन वेळा प्रथम
क्रमांकही पटकावला आहे . मात्र 2020 मध्ये चित्ररथाला सादरीकरणाची संधीही मिळणार नाही . मराठी रंगभूमीची 175 वर्ष या संकल्पनेवर यंदा महाराष्ट्र चित्ररथ साकारणार होता . महाराष्ट्र सरकारसह 32 राज्यांनी चित्ररथाच्या सादरीकरणासाठी केंद्राकडे अर्ज केले होते . परंतु गहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने फक्त 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या तर सहा मंत्रालयांच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे . संमती नाकारलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगालचा समावेश आहे . महाराष्ट्राच्या चित्ररथाने 2015 मध्ये ' पंढरीची वारी ' , तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने अव्वल स्थान पटकावलं होतं . यावेळी राज्यपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते . महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी , जय शिवाजीच्या घोषणा दिल्या . दरम्यान , राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत - आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ 2018 मध्ये सादर करण्यात आले होते .

01 January 2020

कोरेगाव-भीमा विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी केले अभिवादन

पुणे – कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी अभिवादन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन 10 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

प्रशासन आणि विजय सेवा समितीने विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे. त्यासोबत पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच अनुयायांसाठी मदत केंद्रेदेखील उभारण्यात आली आहेत.