महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नव्यानेच समावेश झालेले माजी मुख्यमंत्री तथा कॅबिनेट मंत्री ना . अशोकराव चव्हाण यांचे आज दुपारी नांदेड नगरीत मोठया जल्लोशात व जंगी स्वागत करण्यात आले . नांदेड मध्ये येताच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य त्यांनी आयटीआय कॉर्नर येथील म . ज्योतिराव फुले दांपत्यांच्या पुतळयास अभिवादन केले . या वेळी मा . आ . डि . पी . सावंत , आ . अमर राजुरकर व काँग्रेसचेपदाधिकारी , असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते . ना . अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या तीन दिवसाच्या दौर्यावर आहेत . या दौ - र्या दरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांच्या बैठकीसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . दि . 3 जानेवारी रोजी दुपारी 2 . 30 वाजता मा . ना . अशोकराव चव्हाण यांचे येथील गुरू गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.दुपारी ३ ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे अभ्यंगतांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आली आहे . या वेळेत जिल्ह्याभरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी ना . अशोकराव चव्हाण संवाद साधतील . याच दिवशी सायंकाळी 6 वाजता गुरूद्वारा दर्शन तर रात्री 8 वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे . दि . 4 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत शासकीय विश्रामगृहनांदेड येथे अभ्यंगतांशी भेटी , 11 ते 12 यशवंत महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थितीत , दुपारी 2 वाजता धर्माबादकडे प्रयाण , धर्माबाद येथील नगरपालिकेतील आघाडीचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत बैठक , रात्री 9 वाजता नायगाव येथे आगमन व माजी आ . वसंतराव चव्हाण यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थिती . दि . 5 जानेवारी रोजी सकाळी 10 . 30 वाजता जलसंपदा विभागाची आढावा बैठक ,दि . 5 जानेवारी रोजी सकाळी 10 . 30 वाजता जलसंपदा विभागाची आढावा बैठक , सायंकाळी 6 . 20 वाजता हैदराबादकडे प्रयाण . या पध्दतीने त्यांचा दौरा जाहिर असल्याचे काँग्रेस कार्यालयाकडून माहिती देण्यात आली .







0 comments:
Post a Comment