बिलोली:(वार्ताहर):
आजचे शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर देशभरात वादंग उठलेले असतांना त्यांचा आज बिलोली तालुका काँग्रेस पक्षा तरफे जाहीर निषेध करण्यात आले.
छत्रपती शिवराय यांच्याशी पंतप्रधान यांची तुलना करणारे पुस्तक नुकतेच दिल्ली येथील भाजपा कार्यालयात भाजपा नेते जय भगवान गोयल यांनी प्रकाशित केले आहे.यावरून देशभरात वाद सुरु झाला असून त्यांचा बिलोली तालुका काँग्रेस पक्षा तरफे आज दि.१४ रोजी तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देवून घटनेचा जाहिर निषेध करण्यात आले यावेळी नगरसेवक अमजद चाऊस,जावेद क़ुरैशी,जिल्हा उपाध्यक्ष शेख फारुख अहेमद,संदेश जाधव,पांडुरंग रामपुरे,राजू पाटील,संदीप कटारे,शुभम निदाने,प्रवीण सोनकाम्बळे,विकास जाधव आदिची उपस्थित होती.







0 comments:
Post a Comment