बिलोली:(ता.प्र) शहरातील हनुमान मंदिर येथील न.प.कॉम्प्लेक्स बाबत आज दिनांक:29 जानेवारी बुधवार रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरच बिलोली शहरातील व्यापाऱ्यांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स लिलावा साठीखुले होणार आहे.सदरील प्रकरण 2008 पासून प्रलंबित होते . मा.नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व उपाध्यक्ष श्री मारुती पटाईत यांच्या प्रयत्नाने शॉपिंग कॉम्प्लेक्स खुले होणार आहे .पुढील बैठक दि.4 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.आज झालेल्या बैठकीत मा.जिल्हाधिकारी श्रीअरुण डोंगरे ,जिल्हा प्रशासन अधिकारी,श्रीराजेंद्र चव्हाण सहाय्यक संचालक नगर रचना श्रीआलुरकर मा.गौस साहेब,माहुरे साहेब मुख्याधिकारी श्री त्र्यंबक कांबळे ,नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी उपाध्यक्ष मारुती पटाईत माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
29 January 2020
Home »
» नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या प्रयत्नाने प्रलंबित असलेले शाॅपिग काॅम्प्लेक्स लवकरच सुरू







0 comments:
Post a Comment