19 January 2020
Home »
» भोकरः अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्नः आरोपी जाधव यास 3 वर्षे शिक्षा
भोकरः अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्नः आरोपी जाधव यास 3 वर्षे शिक्षा
नांदेड दि . 19 , प्रतिनिधी - एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा - या आरोपी गोविंद भगवानराव जाधव , वय 22 यास जिल्हा स सत्र न्यायालय , भोकरचे न्यायाधिश एम . एस . शेख यांनी दि . 18 रोजी तीन वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली . _ _ _ पोलीस ठाणे भोकर अंतर्गत मौजे हाडोळी ता . भोकर येथे सदरील मुलीच्या घराच्या दक्षिण बाजुच्या बोळीत दि . 28 जुलै 2018 रोजी दुपारी 2 वा . सदरील पिडीत अल्पवयीन वय 15 वर्षान शौच्यासाठी गेली असत गोविंद भगवानराव जाधव याने अचानक पिडीतेच्या पाठमोरी येवून पिडीत अल्पवयीन मुलीचा पंजाबी ड्रेस पकडून पिडीतेसोबत तिच्या मनाविरूध्द बलात्कार करण्याचा प्रयत्न केला . पिडीतेच्या ओरडण्याने तिचे नातेवाईक लगेच धावून आल्याने आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला . हा सर्व प्रकार पिडीतेने नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्याप्रमाणे भोकर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली व गुन करण्यात आला होता . या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले . साक्षीदारांचे साक्षपुरावा व आरोपी विरूध्द सबळ पुरावे आधारे आरोपीस दोषी ठरविण्यात आले . भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम . एस . शेख यांनी आरोपी गोविंद भगवानराव जाधव यास शिक्षा कलम 354 , 354 - ड , अ . जा . अ . ज . व कलम 8 पोक्सो अॅक्ट मध्ये एकूण 3 वर्षाची शिक्षा व 9 हजार रू . दंड ठोठावण्यात आला . सरकारी पक्षातर्फे अॅड . रमेश राजुरकर यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी एस . बी . देशपांडे यांनी काम पाहिले त्यांना सहायक म्हणून पैरवी अधिकारी फिरोज खॉ पठाण यांनी मदत केली .








0 comments:
Post a Comment