बिलोली:(ता.प्रतिनिधी)
दि.६ जानेवारी 2020 रोजी बिलोली पंचायत समिति निवडणुकीत खतगावकर गटाचे रामतीर्थ गटाचे सुंदरा बाई पाटील यांची तर उपसभापती लोहगाव सर्कलचे शंकर यंकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.बिलोली पंचायत समिति सभापती पद हे इतर मागासप्रवर्गासाठी आरक्षित झाले असून पंचायत समिति वर भाजपाचा ताब्यात आहे.आज दि.६ जानेवारी पंचायत समिति सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपा तरफे खतगावकर गटाचे सुंदरा पाटील व ठक्करवाड गटाचे दत्ताराम बोधने हे दोघेही सभापती साठी बाशिंग बाधुन होते शेवटी खतगावकर गटाने काँग्रेस सोबत हातमिळवनी करून सभापती पद हे खा. भास्कराव पाटील खतगावकर गटाकड़े पुन्हा खेचुनआणली.दिवस भराचे घळामोळी नंतर सभापती साठी सुंदरा पाटील तर दत्ताराम बोधने यांनी अर्ज भरला होता तर उपसभापती साठी काँग्रेस तरफे शंकर यंकम तर संभाजी शेळके यांनी अर्ज भरला होता शेवटी अर्ज परत घेण्याचे वेळी बोधने व शेळके यांनी माघार घेतल्यासमुळे भाजपा खतगावक गटाचे सभापती पदी सुंदरा पाटील व कांग्रेसचे उपसभापती शंकर यंकम यांची बिनविरोध निवड़ झाली राज्यात महाविकास आघाडी ची सत्ता असताना बिलोलीत विधानसभेचे पुनावृती झाली विधानसभेत खतगावकर गटाने उगळ प्रचार करून काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर ला विजयात सहभाग नोदविला तर सभापती निवडणुकीत काँग्रेस ने भाजपा ला पाठीबा देवून विधानसभेचे परत फेड केल्याची चर्चा दिवस भरात होत होती .या बिनविरोध निवड झाल्याचे निर्वाचन अधिकारी शरव झाड़के होते तर नायब तहसीलदार आर.जी.चौहान ,प्रशांत नाईक आदिनी काम पाहिले. यावेळीमा. खा. भास्कराव पाटील खतगावकर,आमदार रावसाहेब अंतापुरकर,जिल्हा परिषद सदस्य संजय बेळगे,गणेश पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी पाटील,माजी अध्यक्ष यादवराव तुड़मे,माजी अध्यक्ष संतोष कुलकर्णी,रवि पाटील खतगावकर,उपाध्यक्ष मारोती पटाइत,रामपुरे सर ,दिलीप पांढरे, संदेश जाधव,शेख फारूख आदिची उपस्थित होती







0 comments:
Post a Comment