जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

28 February 2024

आज भोकर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे लोकसभा निवडणूक आढावा आयोजित...!

भोकर/- येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे लोकसभा निवडणूक आढावा आयोजित घेण्यात आला व या बैठकीला नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचे सत्कार करण्यात आला या बैठकीला उपस्थित उपविभागीय अधिकारी साहेब प्रविण मंगशेटे साहेब तहसीलदार मा सुरेश घोळवे साहेब भोकर पोलीस निरीक्षक सुभाष मारकड साहेब नायक तहसीलदार चामनर मँडम पोलिस पाटील गाव कामगार संघटना तालुकाध्यक्ष कापसे पाटिल बटाळकर उपाध्यक्ष शिलानंद गायकवाड पिंपढव सचिव संदिप राठोड जांभळी कार्याध्यक्ष बालाजी शामनवाड नागापुर व नवनियुक्त पोलिस पाटील नितीनकुमार राठोड धावरी संदिप गजभारे चिदगीरी किरणकुमार जाधव महागाव शेषराव हुरदुके आमदरी राम भिसे बोरवाडी श्रीनिवास श्रीमलवार सोनारी भागवत बाच्चेवाड पोमनाळा सुरज सुरकर कांडली प्रदीप वाघमारे सुदर्शन लुगारे बोरगाव स्वाती कल्याणकर भोसी कविताबाई चंदनवाड बेंबर आशाबाई जाधव जाधव शिल्पा जाधव सुजाता रजपवाड मोघाळी ममता ढगे सूत्रसंचालन सुनील राठोड पोलीस पाटील फुलवाडी तांडा आभार प्रदर्शन नितीन राठोड धावरीकर पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

21 February 2024

अठरा पगड रयतेने साजरा केला 'महाराजांचा' भव्य-दिव्य जन्मोत्सव सोहळा

भोकर मधील विविधतेने सजलेल्या शोभायात्रेतील 'शिवकालीन मर्दानी खेळ' ठरले विशेषाकर्षण!

प्रतिनिधी
भोकर : ढोल,ताशा,बँड पथक,भजनी मंडळ,अश्व,अश्वारूढ देखावे, पारंपरिक वेशभुषेतील महिला,पुरुष, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सर्व जाती,पंथ,धर्मीय सहभागी अठरा पगड रयतेने सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला असून विविधतेने सजलेल्या शोभायात्रेतील 'शिवकालीन मर्दानी खेळ' हे विशेषाकर्षण ठरले आहेत.

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती भोकर च्या वतीने भोकर शहरातील सर्व मुख्य रस्ते भगवे पताके व ध्वजांनी सजविण्यात आले होते.सोमवार,दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे १२:०५ वाजता (मध्यरात्री)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याची ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य आतिषबाजीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.तर सकाळी ९:०० वाजता मासाहेब जिजाऊ चौक भोकर येथे ध्वजारोहण करण्यात आले व तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर पर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.यानंतर महंत प्रभाकर कपाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आणि याच ठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले. अनेक दात्यांनी दान केलेले रक्त संकलन श्री गुरु गोविंदसिंग शासकीय रक्त पेढी नांदेड यांनी केले.यावेळी भोकर चे नुतन तहसिलदार सुरेश घोळवे,जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर,पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड,सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील,माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती प्रकाश देशमुख भोसीकर,सुभाष पाटील किन्हाळकर,बहुजन नेते नागनाथ घिसेवाड,ओबीसी नेते नामदेव आयलवाड,प्रा.डॉ.व्यंकट माने,डॉ. यु.एल.जाधव,माधव अमृतवाड, किशोर पाटील लगळूदकर,ॲड. शिवाजी कदम,गणपत पिट्टेवाड, आत्रिक पाटील मुंगल,शंकर पाटील बोरगावकर,बालाजी शिंदे,संपादक उत्तम बाबळे,सुरेश बिल्लेवाड, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती चे अध्यक्ष संदिप पाटील गौड व सर्व पदाधिकारी,असंख्य शिव प्रेमी यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

दुपारी १२:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथून रथारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत ग्रामीण भागातून आलेले भजनी मंडळ,ढोल-ताशा पथक,बँड पथक, आदिवासी नृत्य पथक,बंजारा डफडी पथक,गोंधळी पथक,डीजे,अश्व, अश्वारुढ देखावे,पारंपरिक वेशभूषाधारी मावळे,महिला,पुरुष, तरुण,तरुणी,सर्व धर्मीय हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते.तर या शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण ठरले ते कोल्हापूर येथील 'शिवकालीन मर्दानी खेळ' पथक.या पथकाने लाठी,काठी,तलवारबाजी,दांडपट्टा,युद्धकला,आत्मसंरक्षणार्थचा हल्ला, प्रतिहल्ला यांसह आदींची प्रात्यक्षिके सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. तर ढोल ताशा,बँड,शिवरायांची गिते व पोवाड्यांवर तरुणाईने ठेका धरत शिवरायांचा नामाचा गगनभेदी जयघोष करत विविधतेने सजलेल्या शोभायात्रेचा समारोप शिवछत्रपती वंदना,माॅंसाहेब जिजाऊ वंदना व आरतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला.

दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील मुस्लीम बांधवांनी १० क्विंटल खिचडीचा महाप्रसाद वाटप केला.तर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप के.राव यांच्या पुढाकारातून बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शर्बतीचे वाटप केले.यावर्षी संपन्न झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात केवळ मराठा समाज बांधवच नव्हे तर सर्व जाती,पंथ,धर्मीय शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व खऱ्या अर्थाने रयतेने रयतेच्या राजांची जयंती साजरी केली.कायदा,शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या सुनियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली महिला सहा.पो.नि.कल्पना राठोड, पो.उप.नि.दिगांबर पाटील,पो.उप. नि.केशव राठोड,डी.एस.बी.पो.ना. परमेश्वर गाडेकर यांसह आदी पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दल कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.तसेच महा.विद्युत वितरण कर्मचारी,नगर परिषद कर्मचारी, व्यापारी,पत्रकार बांधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर,आदींनी सहकार्य केले.तर हा शिवजन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती चे अध्यक्ष,संदिप पाटील गौड,सचिव आनंद डांगे,स्वागताध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,ॲड.शेखर कुंटे,उमेश पाटील कापसे,गजू पाटील कल्लूरकर,सय्यद जुनेद,तौसिफ इनामदार,निळकंठ वर्षेवार,राजेश्वर कदम देशमुख,दिपक वर्षेवार,मोहन राठोड,अंकुश रतनवार,गोविंद मेटकर यांसह सर्व पदाधिकारी बांधव व शिवप्रेमींनी अथक परिश्रम घेतले.

15 February 2024

भाजपाने नांदेड मधील दोघांना एकाचवेळी राज्यसभेचे खासदार होण्याची दिली संधी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि कारसेवक डॉ. अजित गोपछडे होणार राज्यसभेचे खासदार ; आता नांदेड जिल्हा होणार ५ खासदारांचा …

नांदेड : नांदेड जिल्ह्याचे क्षेत्र तीन लोकसभा मतदारसंघात विभागलेले असल्याने भाजपाचे दोन व शिवसेनेचे एक असे तीन विद्यमान खासदार असतांना भाजपाने होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणूकीत नांदेड मधून एकाचवेळी दोघांना उमदवारीची संधी दिल्याने आता नांदेड जिल्हा हा पाच खासदारांचा जिल्हा म्हणून राजकीय पटलावर ओळखल्या जाणार आहे.योगायोगाने ही संधी प्राप्त झाल्याने केंद्रीय निधी मोठ्या प्रमाणात याव्या व नांदेड जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजपाने राज्यसभा उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे.यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व कारसेवक डॉ. अजित गोपछडे या नांदेडच्या दोन भूमिपुत्रांचा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी अशा महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दि.१३ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता.त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठीने अशोक चव्हाण यांना केंद्रीय सत्तेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

विधानपरिषदेची संधी हुकलेल्या डॉ.अजित गोपछडेंना भाजपाने दिला न्याय…

अगदी तारुण्यात संघाचे स्वयंसेवक म्हणून ज्यांनी सेवाकार्य केले आहे व बाबरी पतनात कारसेवक म्हणून डॉ.अजित गोपछडे यांनी यांनी मोठे योगदान दिले आहे.पुढे भाजपात प्रामाणिकपणे कर्तव्यसेवा बजावली आहे.भाजपा डॉक्टर आघाडी चे प्रदेशाध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडली असल्याने पक्ष श्रेष्ठींनी त्यांची भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.तर यापूर्वी सन २०२० मध्ये भाजपाने त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेसाठी उमेदवारी घोषित केली होती.परंतू पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडून रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती.असे असले तरी नाराज होऊन डॉ.अजित गोपछडे यांनी भाजपा सोडली नाही.त्यांची पक्ष निष्ठा व बाबरी पतनातील कारसेवक म्हणून दिलेले योगदान पाहता भाजपाने त्यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी देऊन न्याय दिला आहे.आता नांदेड जिल्हा होणार ५ खासदारांचा जिल्हा …

नांदेड जिल्ह्याची व्याप्ती पाहता नांदेड,लातूर व हिंगोली लोकसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्याचे क्षेत्र विभाजन झालेले आहे.त्यामुळे नांदेड जिल्ह्यास नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजपा),लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे(भाजपा) व हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील (शिवसेना) असे तीन विद्यमान खासदार आहेत.होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणूकीसाठी नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि डॉ.अजित गोपछडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.महाराष्ट्रातील भाजपाचे मतदार संख्याबळ पाहता या दोघांची ही विजयश्री निश्चित आहे.त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यासाठी एकूण पाच खासदार प्राप्त होणार आहेत.भावी लोकसभा निवडणुकीनंतर हे चित्र कसे असेल ? हे ठामपणे सांगणे शक्य नसले तरी सद्या नांदेड जिल्हा हा पाच खासदारांचा जिल्हा म्हणून राजकीय पटलावर ओळखल्या जाणार आहे हे मात्र निश्चितपणे सांगता येईल.

भोकर वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड.संदीप कुंभेकर तर सचिव पदी ऍड.प्रदीप लोखंडे विजयी

भोकर :  जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथील वकील संघासाठी पार पडलेल्या अतीशय चुरशीच्या लढतीत  नुतन कार्यकारणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी  ॲड.संदीप कुंभेकर,
 उपाध्यक्षपदी मंगेश कुमार पेदे तर सचिव पदी प्रदीप लोखंडे हे विजयी झाले आहेत.

ॲड संदीप कुंभेकर व    ॲड  एस एन कादरी  यांना समान मते मिळाल्यामुळे नाणेफेक करून प्रत्येकी एक वर्ष विभागून  अध्यक्ष पद  भूषविण्याची संधी  देण्यात आली आहे. नाणेफेकीत जिंकल्याने प्रथम वर्षी  संदीप कुंभेकर यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदासाठी ॲड. मंगेश पेदे यांना पसंती दर्शविली आहे . 

 भोकर वकील संघाच्या कार्यकारिणीचा दोन वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे नुतन कार्यकारणीसाठी निवडणूक प्रक्रिया पार अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . सदर निवडणूक बिनविरोध पार  पडावी यासाठी ज्येष्ठ विधी तज्ञांकडून प्रयत्न करण्यात आले. शेवटी येथील विधी सदस्यांमध्ये  एकमत होत नसल्याने निवडणूक घोषित करण्यात आली होती.
   सदर निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन उपाध्यक्ष पदासाठी २, सचिव पदासाठी ४, तर  कोषाध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.  अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या  ॲड. परमेश्वर पांचाळ, ॲड.संदीप कुंभेकर, ॲड.एस एन कादरी, यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे मागील आठ दिवसापासून न्यायालय परिसराला राजकीय आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
 संघाच्या एकुण ६८ सदस्यापैकी ६६ सदस्यांनी मतदान केले.अध्यक्ष पदासाठी ॲड. संदीप कुंभेकर, ॲड.सय्यद एस.एन कादरी यांना  २५ - २५ अशी समान मते पडली तर प्रतिस्पर्धी ॲड. परमेश्वर पांचाळ यांना १६ मते मिळाली , उपाध्यक्ष पदासाठी ॲड. मंगेश पेदे यांना ४०मते तर ॲड.लक्ष्मीकांत मोरे यांना २६ मते, सचिव पदासाठी ॲड.प्रदिप लोखंडे यांना २६, ॲड. के जे राठोड यांना १५, आणि ॲड.पवन  वच्छेवार यांना  १६ तर ॲड संतोष पवार यांना ९ मते मिळाली.  कोषाध्यक्ष पदासाठी ॲड. विशाल दंडवे यांना ४३ तर ॲड. भानुप्रसाद सूर्यवंशी यांना १४, ऍड.पाटील हर्षवर्धन यांना ९ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी उमेदवार असलेल्या एडवोकेट एस. एन.कादरी आणि एडवोकेट संदीप कुंभेकर यांना  समान मते पडल्यामुळे  प्रत्येकी एक एक वर्ष  अध्यक्ष पद भूषविण्याची संधी  देण्यात आली. नाणेफेक जिंकून एडवोकेट कुंभेकर यांना द्विवार्षिक कार्यकाळातील  प्रथम वर्षी अध्यक्षपदाची संधी मिळाली .
दरम्यान सहसचिव पदा करिता ऍड. प्रकाश मेंडके,विशिष्ट सहायक पदाकरीता अॅड. देशपांडे निखील ,महिला प्रतिनिधी पदा करीता अॅड. सुजाता कांबळे या तिघाची बिनविरोध निवड झाल्याने पुर्वीच निवडणुक निर्णय अधिकारी यांनी घोषीत करून त्यांचे अभिनंदन केले .
  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. ऍड एस. एस. कुंटे तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. सिध्दार्थ कदम यांनी काम पाहिले. सय्यद आबेद यांनी  परिश्रम घेतले.या निवडीचे अनेकांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या .

---------------------
माझ्यावर विश्वास ठेवून मला मतदान करणाऱ्या मतदारांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी व सामाजिक उपक्रमात,न्यायिक कार्यात न्यायमिळवून देण्यासाठी सदैव अग्रेसर राहून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. गोरगरीब,पीडित, लोकांना विधिसेवा समिती  तर्फे भेटणाऱ्या उपचारासाठी वैद्यकीय सोई,सवलती,सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही कटीबद्ध आहे. तर वकील व न्यायाधीश मंडळी यांच्या सुसंवाद साधण्याचाही प्रयत्न करिन.

ऍड. संदीप कुंभेकर
अध्यक्ष भोकर वकील संघ

12 February 2024

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु

नांदेड, दि. 12 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे. 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं. 9423777789, एस.जी.आरसुलवाड (व.लि) मो.क्र. 7767825495 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ) मो.क्र. 9421765683 तर एस.एल.राठोड (क.लि) मो.क्र. 8830298158, ए.एल. सुर्यवंशी (क.लि) मो.क्र. 7620166354 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857, बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

तक्रार देताच गुत्तेदारासह अभियंता यांचे डोके ठीकाण्यावर

बिलोली: तालुक्यातील मौजे कार्ला खुर्द येथील चालू असलेले जल जीवन मिशन अंतर्गत पाईप लाईन चे काम अंदाज पत्रक नुसार होत नसल्याची तक्रार रिपबलिकान सेना चे शहर अध्यक्ष गंगाधर इबितकर यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सह जिल्हाधिकर यांच्या कडे निवेदन द्वारे केली होती. त्याच तक्रारी च्या अनुषंगाने आज जल जीवन मिशन ची संपूर्ण पाईप लाईन करण्यात आलेले पुन्हा खोदकाम करून पाइपलाइन वर कडून पुन्हा खोदकाम करून पाईप लाईन करण्याचे आदेश व्यापकास कंपनीचे अभियंता श्री उपलवर यांनी गुत्तेदराला दिले त्या प्रमाणे आज करण्यात आलेले पाईप लाईन खोद काम चालू केले आहे.
संबंधित गुत्तेदार यांच्या मन मनी कारभाराला संपूर्ण गावातील नागरिक कंटाळले असल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण पाईप लाईन खोदून पुन्हा पाईप लाईन करतील का या कडे गावातील नागरिकाचे लक्ष आहे.

11 February 2024

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या अध्यक्षपदी प्रा. आर.के.कदम

भोकर : जनसामांन्याना आपल्या लेखणीतून न्याय हक्क मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार प्रा.आर.के. कदम,उपाध्यक्षपदी बालाजी कदम पाटील व सचिवपदी गंगाधर पडवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्यासह सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

देश,राज्य पातळीवर सेवारत असलेल्या व शोषित,वंचित, पीडितांसह पत्रकार आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या भोकर तालुका शाखेच्या कार्यकारिणीचा वार्षिक कार्यकाळ पुर्ण झाल्याने नुतन कार्यकारिणी गठित करण्यासाठी दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार बांधवांची एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली. तसेच वार्षीक आढावा घेण्यात येऊन सर्वानुमते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर ची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.

ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे.. अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार प्रा.आर.के. कदम,उपाध्यक्ष-बालाजी कदम पाटील,सचिव-गंगाधर पडवळे, कोषाध्यक्ष-विशाल जाधव, सहकोषाध्य-विनय दुर्केवार, सहसचिव-संभाजी कदम, संघटकपदी-गजानन गाडेकर,जेष्ठ सल्लागार-अंबादास बोयावार,तर सदस्यपदी-भाविन शेठ,साईनाथ बंडोड, आकाश राठोड,निळकंठ पडवळे,श्रीकांत बाबळे यांसह आदींचा यात समावेश आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे संपादक उत्तम बाबळे यांनी स्वागत व अभिनंदन केले असून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गोपाळराव लाड, जिल्हाध्यक्ष संपादक शंकरसिंह ठाकुर,जिल्हा सचिव संपादक मारोती निकारे यांसह आदींनी सर्वांना पुढील सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

जीव सये मी ग तुला लावलाय बाई,पापनीत झाली कशी काजळाला घाई’-शंकर वाडेवाले

प्रतिनिधी -

जीव सये मी ग तुला लावलाय घाई
पापनीत झाली कशी काजळाला घाई
पापनीची कोर तुझ्या चाललाय मोरे
अंतरीच्या वादळात पावसाला कोर
         -सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी शंकर वाडेवाले यांनी मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूरचे अध्यक्ष लक्ष्मण मलगिरवार व देगलूर महाविद्यालय देगलूरने आयोजीत केलेल्या कविसंमेलन आणि कथाकथन कार्यक्रमात कविसंमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना ‘सये’ ही कविता सादर करून प्रियेशिच्या भावविश्वाचा गाव रेखाटत अंतर मनातील प्रेमभावनेची गोडी उपस्थितापुढे ठेवली.या कविसंमेलाचे अध्यक्ष नांदेड येथील सुप्रसिद्ध ग्रामीण लोककवी शंकर वाडेवाले हे होते.तर सहभागी कवी म्हणून शं.ल.नाईक,अमृत तेलंग,‌माधव देशमुख, उत्तम वनंजे,रूचिरा बेटकर,सारीका बकवाड,अशोक कुबडे,डी. एन.मोरे,खैरकेकर,गोविंद कवळे या कविंचा सहभाग होता.

काव्यजागराच्या रंगलेल्या मैफिलिच्या आरंभी…
लेक हाळदिचं खोंब
देह माईचा चंदण
दिला लेकिला मायेन
बाई गाईचं आंदण
      अस्सल ग्रामीण बोलीभाषेतील ओल,गाव खेड्यातील रूढिपरंपरेची खुणगाठ मांडणारे ग्रामीण कवि अमृत तेलंग यांनी ‘लेक’ ही कविता सादर करूण बाईच्या माहेराची आठवण जीवंत केली.काव्य मैफिलिच्या उपस्थित तरूणाईच्या हाळव्या मनाला डिवचत…
मिठीत यायचं तर असा ये
की,दुजेपणाचं भान सुटावं
सुप्त मनाच्या वादळातून
फक्त श्वासाचं रान उठावं
            -रूचिरा बेटकर यांच्या ‘मिठी’ या शृंगारीक कवितेने जुन्या नव्या प्रेमवीरांच्या आठवणींचा गाव जागा करत उपस्थितांचे मन तरूण केले.प्रेम कवितेचा हळवा नाजूक धागा धरत…
तू हसल्यावर वाराही
बेसावध होतो
तुझ्या वाचुनी हिशोब
सगळा कागद होतो
           –सारिका बकवाड या नव्या दमाच्या मराठी गझलकार यांनी प्रियकराच्या आयुष्यातील प्रियेशीच्या गोड स्वप्नांचा हिशोब मांडणारी ‘तू प्रिये’ ही गझल सादर केली.काव्य मैफिलीस उत्तरोंतर रंग चढत होता एकापेक्षा एक सरस अशा कवितेने वातावरण चांगलेच बहरले होते.
मव्हा बाप काळ्यामातीत
तळून मळून सपन पेरला होता
काळ्या मातीस नजर लाऊन बसायचा
सपनरान हिरवंगार दिसायचं…
        – शेत शिवारात राबणाऱ्या बापाड्याची सपन सुगी देगलूर येथील कवी माधव देशमुख यांनी ‘बाप’ या कवितेतून कष्टाची ओली चिंबळ रसीकापुढे ठेवली.तर
नारी मुक्तिची,देऊनी ललकारी
चला उठा ग,घेऊया भरारी
            -नारी मुक्तीचा अचूक संदेश घेऊन कवी उत्तम वनंजे यांनी आपली रचना सादर करत स्री मनाला जागरूकते विषयी आवाहन केले.गंभीर झालेल्या काव्य मैफिलीला बगल देत…
दिवस उजाडतो सखे
तुझ्याच नावाने
पाखरांची ही किलबिल होते
तुझ्याच नावाने
      सखीच्या नावाने होणारी सकाळ सुखी समाधानाची ओळखकरून देणारी असून जीवनाच्या या सारीपाठात सखीचे किती महत्व आहे ही ओळख नायगाव येथील नव्या दमाचे तरूण कवी गोविंद कवळे यांनी काव्य मैफिलीत तलींन झालेल्या जाणकारांना पटवून दिली.
कवितेच्या झाडाखाली
भेटली मज माऊली
कवितेच्या झाडाखाली
भेटली मज सावली
          देगलूर येथील ज्येष्ठ बाल साहित्यिक शं.ल.नाईक यांच्याही कवितेने रसिकांच्या टाळ्या घेतल्या.
रामदासा बाळ्या परेशान झाला
शाळांमधी दप्तरात त्याच्या वस्तरा गेला
पोट्टे लई बिलिंदर बोंबाबोंब केली
अन् वस्तऱ्याची बात भाऊ मास्तरला गेली
मास्तर म्हणे जाऊ दे न काळ्या आणलान् खरं
मया दाढीचे चार केसे खरडून दे बरं…
    -उपस्थितांना गुदगुल्या करत विनोदाचा बार फोडत कवी अशोक कुबडे यांच्या ‘वस्तारा’ या कवितेने सभागृहाला खळखळून हसवले.एकच हास्साचा कल्लोळ झाला.सहभागी कविंच्या विविध विषयाच्या काव्य सादरीकरणामुळे मैफिलीला रंग चढला.कविसंमेलाचे अध्यक्ष कवी शंकर वाडेवाले यांची गाजलेली कविता ‘सये’ या कवितेने कविसंमेलाची सांगता झाली.रंगतदार होत गेलेल्या काव्या जागराचे बहारदार सुत्रसंचालन अशोक कुबडे यांनी केले.तर आभार राजेश्वर दुडुकनाळे यांनी मानले.या संमेलनासाठी प्राचार्य मोहण खताळ,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बेकर,शशिकांत चिद्रावार,विलास तोटावार,देवेंद्र मोतेवार,रविंद्र द्याडे,लक्ष्मण मलगिरवार,अनिल चिद्रावार,पुरमवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूर चे अध्यक्ष लक्ष्मण मलगिरवार व देगलूर महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कविसंमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मराठी विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल जंबाले,डॉ. सर्जेराव रणखांब,चंद्रशेखर बाकेवाड,प्रा.गणपत मैलारे,पांडुरंग निवृत्तीराव पुठ्ठेवाड यांनी परिश्रम घेतले.

09 February 2024

रमाईचा आदर्श महिलांसाठी मोलाचा आहे.विद्दयाताई कांबळे यांचे प्रतिपादन

भोकरला रमाई जंयती उत्साहात साजरी 
भोकर (प्रतिनिधी)
मागील काळात सावित्रीबाई व महात्मा फुले, शिवाजी महाराज, जिजाऊ आणि रमाई, बाबासाहेब आंबेडकर याच्यासह अनेक महापुरुषात सूसंवाद असायचा म्हणून समाज सुसंस्कृत बनला आहे.माता रमाईच चरित्र प्रत्येकानी वाचल पाहिजे यातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे घडले हे माहिती होईल.रमाईचा आदर्श महिलांसाठी लाखमोलाचा आहे असे प्रतिपादन सौ.विद्दयाताई कांबळे यांनी बुधवारी ता. (सात) केले आहे.भोकर येथे बूधवारी माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विद्याताई कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
शहरातील महात्मा फुले नगर वसाहतीत लूबींनी बूध्दविहार येथे माता रमाबाई आंबेडकर जयंती सोहळा घेण्यात आला त्यावेळी त्या होत्या.यावेळी भीमराव दूधारे,अप्पाराव येरेकार, एल.पी.वारघडे, श्री.शहाणे, साहेबराव मोरे, सूधांशू कांबळे, बाबुराव पाटील,गौतम कसबे, पी.पी.हनवते, शिवाजी गायकवाड, जयभीम पाटील, यशोदाबाई महाबळे,कुसुमबाई सोनकांबळे,कांचन पाटील, सूरेखाबाई माळे,याची उपस्थिती होती.सौ.कांबळे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनात मातारमाई आल्या आणि तुम्हा आम्हाला सोनियांचे दिवस आलेत हे कुणी नाकारू शकत नाही.स्वताच्या कुटुंबीयांची पर्वानकरता न करता दिनदलीताच्या ऊध्दाराकरीता बाबासाहेबांना समर्थपणे साथ दिली आहे.सातकोटी लेकराची आई होऊन पोटची पोर गमवली अशी महान माता आता होणे नाही असे सांगितले आहे. रमाई जयंतीच्या निमित्ताने वकृत्व व डाॅंस स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धक संघर्षना धम्मानंद जाधव,प्रणवी हिरे, मनस्वी माधव कांबळे, समृध्दी मिलींद वाघमारे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.यापूर्वी बालगायक संकल्प जाधव व त्याच्या संचानी रमाईगीते सादर केली.भोजनदानानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सूरत जाधव यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कपील कांबळे,मनोज शिंदे ,दलीत डोंगरे,प्रितम डोंगरे, संतोष डोंगरे,राहुल जाधव, अविनाश गायकवाड, सुनील दूधारे, प्रकाश कागडे, अविनाश सरोदे, राहूल हनवते,अनिल कदम,प्रसेनजीत गाडेकर,वैभव कोकाटे,सुमेध सोनकांबळे,बाळा कदम, पृथ्वीराज वाघमारे यांनी परिश्रम घेतले आहेत.

चार चाकी वाहनाच्या अपघातात ५ जण ठार; १ गंभीर व ४ जण किरकोळ जखमी

रेणापूर ता.भोकर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

भोकर उमरी रस्त्यावरील मोघाळी तलाव नदीवरील पुलावर झाला हा भिषण अपघात

प्रतिनिधी
भोकर : भोकर येथून उमरीकडे जात असलेल्या चार चाकी वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व ते वाहन हाळदा-मोघाळी गावाच्या मध्ये असलेल्या शिवारातील तलावाच्या नदीवरील पुलावरुन नदीत पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेत असतांना दोघींचा मृत्यू झाला आहे.तर एक जण गंभीर व चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

भोकर येथील एका नातेवाईकाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे चार चाकी वाहनाने दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी १० जण परत जात असतांना त्या वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान भोकर उमरी रस्त्यावरील हाळदा-मोघाळी ता.भोकर या गावाच्या मधील शिवारात असलेल्या तलावाच्या नदीवरील पुलावरुन ते वाहन नदीत कोसळले.रात्रीची वेळ व नाल्यात पाणी असल्याने त्या वाहनातील प्रवाशांना बाहेर निघण्यास मोठा अडथळा निर्माण झाला.त्यातील काही जणांनी आरडाओरड केल्याने रब्बी पिकांच्या रक्षणासाठी जवळच्या शेतात असलेले मोघाळी व हाळदा येथील काही नागरिक मदतीसाठी धाऊन गेले.तसेच त्यांनी झालेल्या भिषण अपघाताची माहिती भोकर पोलीस ठाण्यात कळवली.ही माहिती मिळताच पो.नि.सुभाषचंद्र मारकड,महिला सहाय्यक पो.नि.कल्पना राठोड,सहा.पो.उप.नि.दिलीप जाधव, सहा.पो.उप.नि.संभाजी देवकांबळे,जमादार रवि मुधोळे,पो.ना. परमेश्वर कळणे,पो.कॉ.लहु राठोड,पो.चालक मंगेश क्षिरसागर व सामाजिक कार्यकर्ते जुनेद पटेल,सुलेमान शेख,शाहरुख खान यांची टीम घटनास्थळी पोहचली व तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने जखमींना त्या वाहनातून बाहेर काढले असता नाका-तोंडात पाणी गेल्याने गुदमरुन यातील सविता श्याम भालेराव (२५),प्रिती परमेश्वर भालेराव (८)दोघी ही रा.रेणापूर ता.भोकर व सुशिल मारोती गायकवाड (९) रा. रामखडक ता.उमरी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.तर जखमींना भोकर शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर रेड्डी व त्यांच्या मदतनीस परिचारिकांनी तात्काळ प्रथमोपचार केला.तसेच गंभीर जखमी झालेल्या रेखाबाई परमेश्वर भालेराव(३०),अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव(२८), श्याम तुकाराम भालेराव (३५) तिघे ही रा.रेणापूर ता.भोकर यांना पुढील अधिक उपचारासाठी नांदेड येथे रवाना करण्यात आले.परंतू नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी उपरोक्त दोघींचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.तर जखमी श्याम तुकाराम भालेराव यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु आहेत.तसेच जखमी दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (९),प्रितेश परमेश्वर भालेराव (८),सोहम ज्ञानेश्वर भालेराव (७),ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव(२८) सर्वजण रा. रेणापूर ता.भोकर यांच्यावर भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

मयत व जखमी सर्वजण हे एकाच कुटुंबातील असून मयत तिघी या सख्ख्या जावा आहेत.सदरील दुर्दैवी अपघातात एकाच गावातील ५ जणांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने रेणापूर गावावर शोककळा पसरली आहे.उत्तरीय तपासणी नंतर दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी मयत ५ जणांच्या पार्थिवावर रेणापूर ता.भोकर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच पुढील अधिक तपास व कारवाई पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलीस करत आहेत.

शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भाजपा उत्तर नांदेड चे जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख यांनी दिली भेट व जखमींची केली विचारपुस

भाजपाच्या गाव चलो अभियानाच्या अनुषंगाने भाजपा उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख हे भोकर तालुक्यातील पाळज,दिवशी या गावी जात होते.परंतू सदरील भीषण अपघाताची माहिती त्यांना मिळताच तो दौरा रद्द करुन ते व त्यांच्या सोबत असलेले माजी जि.प.सदस्य तथा ओबीसी मोर्चाचे उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस दिवाकर रेड्डी सुरकुंठवार,तेजस मलदोडे यांसह आदीजण शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आले व त्यांनी जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केली.तसेच उपस्थित वैद्यकिय अधिकारी डॉ.सागर रेड्डी यांना जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सुचना दिल्या. तसेच दुर्दैवी मयतांच्या कुटूंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

मुस्लिम धर्मगुरू मौलाना सलमान अजहरी यांच्या अटकेचा भोकर मध्ये निषेध

 प्रतिनिधी
भोकर : सुन्नी इस्लामिक रिसर्च स्कॉलर आणि मोटिवेशनल स्पिकर जामिया रियाजुल जन्नाह,अल-अमान एजुकेशन एंड वेलफेयर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक मुस्लिम धर्मगुरू मौलाना सलमान आजहरी यांनी जुनागढ येथील कार्यक्रमात केलेल्या भाषणात वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करुन गुजरात एटीएसने घाटकोपर मुंबई येथून त्यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेने मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली असून या अटकेच्या निषेधार्थ विविध पक्ष, सामाजिक संघटना व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने भोकर मध्ये दि.९ फेब्रुवारी रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच सदरील घटनेच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी व तहसिलदार भोकर यांच्या मार्फत राज्य आणि केंद्र शासनास निवेदन देण्यात आले आहे.त्या निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या असून त्यातील महत्वाची मागणी म्हणजे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे परत घेण्यात यावेत व त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी.सदरिल घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी व मागण्यांचे निवेदन देण्यासाठी एम.आय.एम.पार्टी तालुका भोकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग नांदेड व भोकर,आम आदमी पार्टी तालुका भोकर यांसह विविध सामाजिक संघटना व बहुसंख्य मुस्लिम समाज बांधवांनी सहभाग घेतला होता.तसेच सदरील निवेदन एका जंबो शिष्टमंडळाने दिले असून त्यात मुफ्ती ईमरान,हाफिज आहाद,मौलाना अकबर,मौलाना अ.खादिर, हाफिज फारूक,हाफिज सद्दाम,एम.आय.एम.ग्रामीण नांदेड जिल्हाध्यक्ष बाबा खान पठाण, भोकर तालुकाध्यक्ष जुनेद पटेल,निजाम बाबा,शेख करीम करखेलीकर,शेख सुलेमान, इर्शाद खान,अहेमद भाई,जमील पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष शेख एजाज कुरेशी,राष्ट्रवादीचे भोकर शहराध्यक्ष फहिम पटेल,शेख जब्बार, आम आदमी पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष सय्यद अल्मास, शहराध्यक्ष शेख फारुख शेख मेहबूब,अब्दुल मोफेद अब्दुल सामी, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते म.ताजोद्दीन,शफी पटेल, मन्सूर खान पठाण कोळगावकर,फारूख जहागिरदार करखेलीकर,स.जब्बार यांसह आदींचा समावेश होता.

बिलोली तालुक्याक्यातील मौ. कार्ला खु येथील चालु असलेल्या JJM अंतर्गत चालु असलेले कामाची चौकशी करा - गंगाधर ईबितकर

बिलोली: तालूक्याततील मौ. कार्ला खु ता. बिलोली येथील ज‍लजिवन मिशन अंतर्गत चालु असलेले काम अतिशय निकृष्टो दर्जाचे चालु असुन अंदाज पत्रका नुसार होत नाही. गावातील ब-याच ठिकाणी १.५० ते २ फुट वर पाईप लाईन टाकण्याशत आली आहे. व विहीरी पासुन येणारी पाईप लाईन पन १.५० ते २ फुट वर टाकण्याचत आली आहे. विहीरीचे खोद काम पण अंदाज पत्रका नुसार करण्याात आलेले नाही. त्यार मुळे संबधीत कामाची तात्कााळ चौकशी करून संबधीत व्याक्तीा वर योग्या ती कार्यवाही करावी व समोरी बिल कामाची चौकशी होई पर्यंत देण्या त येऊ नये अन्ययथा उपोषण करण्या चा इशारा रिपब्लिकन सेनेचे शहर अध्ययक्ष यांनी दिले.

--
व्यापकॉस कंपणीचे अंभियंता व पाणी पुरवठा अभियंता यांच्यार समक्ष बागस काम

विद्यार्थी-शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवादातून मोठे यश मिळू शकते-संपादक उत्तम बाबळे

भोकर येथील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी-पालक मेळावा व क्रिडा स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

प्रतिनिधी
भोकर : विद्यार्थी आपल्या आवडीनुसार जे क्षेत्र निवडतो त्यास पालकांनी विरोध केला नाही पाहिजे व शिक्षकांनी देखील त्यादिशेने योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.या दरम्यान परस्पर विरोधी विचार प्रकट न करता एकमेकांत सुसंवाद साधला पाहिजे.तरच विद्यार्थी-शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवादाने यशस्वी विद्यार्थी घडू शकतो व निवडलेल्या क्षेत्रात मोठे यश मिळू शकते,असे मनोगत अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.भोकर येथील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी-पालक मेळावा व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
भोकर येथील मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता शासकीय वसतीगृहातील सभागृहात विद्यार्थी-पालक मेळावा व क्रिडा स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,भोकर च्या गृहपाल श्रीमती एस.डी.साळुंके या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सुभाष नारायणराव पाटील,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,कै.लक्ष्मराव घिसेवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर चे प्राचार्य गणेश जाधव,प्रा. सोनटक्के यांची उपस्थिती होती.तसेच पालक प्रतिनिधी म्हणून केशव सुर्यवंशी, श्रीराम सुर्यवंशी व श्रीमती बोरकर ताई यांची उपस्थिती होती.
यावेळी उपरोक्त वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.तर विद्यार्थी-पालक मेळाव्याच्या आयोजनामागील पार्श्वभूमी मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह,भोकर चे गृहपाल यु.एच.जाधव यांनी प्रास्ताविकातून मांडली.प्राचार्य गणेश जाधव यांनी व पालक प्रतिनिधी केशव सुर्यवंशी आणि श्रीराम सुर्यवंशी यांनी सोहळ्यास अनुसरुन मनोगत व्यक्त केले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,आपण ज्या वसतीगृहाच्या भव्य इमारतीत बसलो आहोत त्या इमारतीची मोठ्या किंमतीची जागा भोकर विकास महर्षी सरपंच स्व.नारायण बाबागौड पाटील यांनी दिली आहे.हे होतांनाच्या ऐतिहासिक कामात आमचा ही खारीचा वाटा आहे.आज या इमारतीच्या छत्रछायेखाली गरीब,गरजू,होतकरु,मागासवर्गीय मुले-मुली राहत असल्याचे पाहून आत्मिक समाधान होत आहे.तर प्रत्येकाचे पाल्य डॉक्टर,इंजिनिअर झाले पाहिजे,अशी अपेक्षा ठेऊन पालक मुलांवर आपली इच्छा लादतात.परंतू मुलांची अन्य क्षेत्रात आपले करियर घडवण्याची इच्छा असेल तर त्यास ते क्षेत्र निवडू द्यायला पाहिजे.तरच त्यात तो उज्वल भवितव्य घडवू शकतो.प्रत्येक घरात ज्ञान यज्ञ पेटला पाहिजे.परंतू ज्ञान यज्ञ न पेटता अनेकांची घरे ही निम्नस्तरीय करमणुक केंद्र झाली आहेत.कारण त्या घरात पाल्यांसाठी स्वतंत्र खोली,त्यात टिव्ही,संगीत संच व वापरण्यासाठी महागडी स्मार्ट फोन उपलब्ध असतात.गरज नसतांनाही नको त्या भौतिक सुविधा पुरविल्या जातात.त्यामुळे त्यांची मुले अभ्यास करतात की नाही ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.यातून अनेक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात व पुढील जीवनात अयशस्वी होत आहेत आणि वेगळ्याच गैर मार्गावर जात आहेत.आता ती घरे नाही तर वसतीगृहच सुरक्षित राहिले आहेत.कारण विद्यार्थांची काळजी पालकांपेक्षा अधिकतेने वसतीगृहातील गृहपाल घेत असतात.म्हणून वसतीगृहांच्या व्ययस्थापक,गृहपाल यांनी दिलेल्या सुचनांचे विद्यार्थी व पालकांनी राग न मानता स्वागतच केले पाहिजे.असे ही ते म्हणाले.अध्यक्षीय समारोप श्रीमती एस.डी.साळुंके यांनी केले.सदरील सोहळ्यास बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमांचे सुरेख असे सुत्रसंचालन जे.डी.दांडगे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार बी.एल. बादे यांनी मानले.

शंकरसिंह ठाकुर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर

 प्रतिनिधी
नादेड : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड तर्फे दिल्या जाणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार दैनिक वीर शिरोमणी चे संपादक शंकरसिंह ठाकुर यांना जाहीर करण्यात आला असून निवड समितीचे प्रमुख डॉ.पुंडलिक नामवाड,डॉ.मनोज राऊत,पत्रकार सुशील कुमार भवरे यांनी ही माहिती दिली आहे.सदरील पुरस्काराने संपादक शंकरसिंह ठाकुर यांना सन्मानित करण्यात येणार असल्याने त्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेड द्वारा एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा,ता.हिमायतनगर,जिल्हा नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून गेल्या सहा वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार दिले जातात.पुरस्काराचे हे सातवे वर्ष असून एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोनारी फाटा ता.हिमायतनगर येथे दिला जाणार आहे.दि.१७ फेब्रुवारी २०२४ रोजी धम्म परिषद होणार असून या बौद्ध धम्म परिषदेमध्ये शंकरसिंह ठाकूर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शंकरसिंह ठाकुर यांच्या सामाजिक व न्यायीक पत्रकारितेची दखल घेऊन आयोजकांनी त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे घोषित केले असून धम्म परिषदेचे उद्घाटक शिवश्री कामाजी पवार(राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ),धम्म परिषदेचे अध्यक्ष आमदार माधवराव पाटील जळगावकर,स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे,कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक भाई शेठ हिमायतनगरकर,निमंत्रक कैलास भाऊ माने,माजी सभापती जोगेंद्र नरवाडे कामारीकर,निवेदक उत्तम कानिंदे,मार्गदर्शक सिने अभिनेते डॉ.प्रमोद आंबाळकर, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी भीमराव कावळे,अभियंता मिलिंद गायकवाड,अभियंता भरत कुमार कानिंदे,संयोजन समितीचे अध्यक्ष तथा वृत वारसदार चे संपादक त्रिरत्न कुमार भवरे कामारीकर,महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक रविराज भद्रे,बापूराव जमदाडे, रमेश नार्लेवाड, शंकर दादा गायकवाड,डॉक्टर कैलास कानींदे, पत्रकार जयभीम पाटील,मनोज शिंदे,हमीद खान पठाण यांसह आदींच्या उपस्थितीत सदरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.शंकरसिंह ठाकुर यांना उपरोक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याने अनेक स्नेहिजणांसह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून पुढील सामाजिक कार्य व पत्रकारितेसाठी अनेकांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संपादक उत्तम बाबळे यांच्या वतीने देखील संपादक शंकरसिंह ठाकुर यांचे अगदी मनापासून खुप खुप हार्दिक अभिनंदन व पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा!

एन एम एम एस परीक्षेत थेरबन शाळेचे विदयार्थी चमकले

भोकर- (प्रतिनीधी)
राष्ट्रीय दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2022–23 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती (एन एम एम एस) परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरबन येथील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या परीक्षेसाठी थेरबन शाळेच्या एकुण १० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यात पृथ्वीराज घनसटवाड,,माधव झंपलवाड,चंद्रकांत बत्तलवाड, कु आश्विनी येडके आदी
विदयार्थी या अवघड परिक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण होउन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत या विद्यार्थ्याना शासनातर्फे इयत्ता बारावी पर्यंत दर महिना एक हजार रू शिष्यवृत्ती मिळणार आहे.सदरील विद्यार्थ्याना वर्गशिक्षक महानाम गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. दरम्यान यशवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे, शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आले .याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश मुपडे , बाबुराव मलदोडे, भीमराव दासरे, मुख्याध्यापक वट्टमवार एस डी, सहशिक्षक काळेवाड बी एम,कळस्कर एस डी, करंडेकर जी एल, हुलसुरे के एच,मुंडे डी एस आदी उपस्थीत होतें.
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एम. जी वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सुमन गोणारकर, अनिल शिरसाट, लक्ष्मण सुरकार केंद्रप्रमुख जे.एम.शेख यांनीही विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे

07 February 2024

घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेसही आता अजित पवारांचीच-भोकर मध्ये जल्लोष

भोकर : लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,क्रियाशील सदस्य, सदस्य यांचे बहुमत व प्रतिज्ञापत्राच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.त्यामुळे घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची झाली असल्याने राज्य आणि देशात त्यांच्या कार्यकर्त्यांत आनंदोत्सव साजरा केल्या जात असून याच अनुषंगाने भोकर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि.७ फेब्रुवारी रोजी ढोल-ताशा आणि भव्य आतिषबाजीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याकडे सोपवलं होतं.त्याच निकषांवर निवडणूक आयोगाने दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी घड्याळ चिन्ह व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्षही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताब्यात देण्यात आला आहे.त्यामुळे अजित पवार हे आता सदरील पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचा शिक्का मोर्तब झाला आहे.परंतू हा निर्णय माजी केंद्रीय मंत्री तथा जेष्ठ नेते शरदचंद्र पवार व त्यांच्या समर्थकांसाठी अत्यंत धक्कदायक मानला जात आहे.
निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी असल्याची मान्यता दिली आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता पक्ष संपर्क कार्यालयापासून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असलेली ढोल-ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर येथे भव्य आतिषबाजी करण्यात आली आणि “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद,एकच दादा अजित दादा,अजित दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है” चे नारे देत रॅलीचा समारोप करण्यात आला.सदरील रॅलीत व जल्लोषात राष्ट्रवादी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष बालाजी पाटील गौड,राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव आनंद पाटील सिंधीकर,ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस नामदेव वाघमारे,उत्तर नांदेड जिल्हा उपाध्यक्ष माधव देशमुख,अहेमद करखेलीकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष एजास कुरेशी,सोसिअल मीडिया उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,तालुका सचिव महेंद्र कांबळे,भोकर शहराध्यक्ष फईमभाई पटेल,सिद्धू पाटील चिंचाळकर,दर्शन डूरे,रवी गेंटेवार,गणेश देशमुख,पंकज देशमुख,सचिन नांदेकर,शेख इब्राहिम,राजू कोरडे,श्याम बोडेवार,सतीश चाटलवार, ॲड.शेख सलीम,ॲड.शेख अल्तमश,शेख जब्बार,तुकाराम महादावाड, शंकर गाढे,राजू पांचाळ,महेंद्र दुधारे,अविनाश आलेवार,विलास गुंडेराव,दिनकर पाटील, विजय पाटील सोळंके,निलेश खांडरे, महोम्मद मझरोद्दीन,दशरथ इंदरवाड,गजानन पाटील सोळंके, साहेबराव वाहूळकर यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

06 February 2024

संदिप पाटील गौड अध्यक्ष असलेली भोकर येथील शिवजयंतीची जंबो कार्यकारिणी गठित

भोकर : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील भोकर येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंदोत्सवात साजरी करण्यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते संदिप पाटील गौड हे अध्यक्ष असलेल्या सार्वजनिक शिवजयंती मंडळाची जंबो कार्यकारिणी गठित करण्यात आली असून सर्व सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या हेतूने स्वागताध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक नेते तथा बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर,संपादक उत्तम बाबळे,पत्रकार बी.आर. पांचाळ,वंचितचे अध्यक्ष दिलीप के.राव व सय्यद जुनेद यांची ही निवड करण्यात आली आहे.

भोकर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून त्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी ध्वजारोहण व मानवंदना, झांज पथक,लेझीम पथक,भजनी मंडळ,प्रबोधनात्मक देखावे,विविध पारंपारिक वेशभुषा परिधान केलेले शिवप्रेमी यांचा सहभाग असलेली भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे.तसेच विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.त्या निमित्ताने संपन्न झालेल्या सर्व समावेशक बैठकीमध्ये सार्वजनिक शिवजयंतीची जंबो कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.ती कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे...
अध्यक्ष-संदीप पाटील गौड, उपाध्यक्ष-मोहन राठोड,दीपक वर्षवार,उमेश पाटील कापसे बटाळकर,सचिव- आनंद डांगे, सहसचिव-माधव पाटील बोरगावकर, गोविंद दोडिया,कोषाध्यक्ष-गजू पाटील पोमनाळकर,विजय पवार, सदस्य-नामदेवराव आयलवाड, नागनाथ घिसेवाड,शिवाजीराव पांचाळ,डॉ.यु.एल.जाधव,सतीश देशमुख,संतोष मारकवार,सुरेश बिल्लेवाड,केशव मुद्देवाड,दत्तात्रय पांचाळ,राजू देशमुख,विठ्ठल फुलारी, गणपत पिट्टेवाड,ॲड.परमेश्वर पांचाळ,प्रशांत पोपशेटवार,तौसीफ इनामदार,मजहर लाला,एल.ए.हिरे, बाबुराव पाटील,बालाजी नार्लेवाड, गोविंद मेटकर,गंगाधर पडवळे,यांसह आदीजण.

तसेच दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली व सर्वानुमते विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार असल्याच्या अनुषंगाने स्वागत समिती गठीत करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी येथील जेष्ठ सामाजिक नेते तथा स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, संपादक उत्तम बाबळे,पत्रकार बी. आर.पांचाळ,वंचित चे अध्यक्ष दिलीप के.राव,सामाजिक कार्यकर्ते सय्यद जुनेद यांसह आदींची निवड करण्यात आली आहे.तर सल्लागार म्हणून- माधव अमृतवाड,ॲड.शेखर कुंटे, डॉ.राम नाईक,आत्रिक पाटील मुंगल, ॲड.शिवाजी कदम,अमोल धनराज पवार,साईप्रसाद जटालवार,साईनाथ राठोड,बाळू मेटकर,मारुती अंगरवार, बालाजी एलपे,निळकंठ वर्षेवार,ॲड. विशाल दंडवे,प्रसिद्धी प्रमुख- आदिनाथ चिंताकुटे,अनिल डोईफोडे, संतोष आनेराये,सम्राट हिरे आदींची निवड करण्यात आली आहे.

05 February 2024

नव शैक्षणिक उपक्रम : विद्यार्थ्यांसह पालकांचा ही सहलीत समावेश-सौ.रुचिरा बेटकर

 नांदेड : शिक्षक -विद्यार्थी-पालक यांच्यात सुसंवाद घडून आपसातील अंतरक्रिया दृढ होण्यासाठी शैक्षणिक सहली मध्ये महिला पालकांचाही समावेश करून सहलीचे आयोजन करण्यात यावे याच पार्श्वभूमीवर केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकांना ही सहलीत समावेश करुन घेत नव शैक्षणिक उपक्रमाने आनंदोत्सवी सहल आम्ही केली,अशी माहिती मुख्याध्यापिका सौ.रुचिरा बेटकर यांनी दिली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील रविवार,दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी सॅटेलाइट डिजिटल पब्लिक स्कूल,गणेश नगर रोड,नांदेड येथील मुख्याध्यापिका सौ.रूचिरा बेटकर यांनी त्यांच्या शाळेची सहल वारंगा गार्डन येथे विद्यार्थी व महिला पालकांसह नेली आणि महिला पालकांचे विविध खेळ घेऊन त्या खेळात विजेत्यांना बक्षिसे ही देण्यात आली.यावेळी आपले पालक ही सोबत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.पालकांची मुलांसह घेण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत-सौ.सुरेखा रविराज ससाणे,लंगडी मध्ये-सौ.अश्विनी आकाश भदरगे,गट तयार करणे- सौ.आश्लेषा दशरथ सोनकांबळे आणि तळ्यात मळ्यात या स्पर्धेत – सौ.प्रियंका सुनील काळे या महिला पालक प्रथम विजेत्या ठरल्या.
शालेय शिक्षण घेत असताना शालेय सहल हा उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो.पण यात काहीतरी नवीन्य यावे म्हणून या शाळेने महिला पालकांसह या सहलीचे आयोजन केले आहे.क्षेत्रभेट असो वा शालेय सहल यातून शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्यात उत्तम अशी अंतरक्रिया घडून यावी म्हणून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.या सहलीमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य असे संगोपना संबंधित मार्गदर्शन करण्यात आले.नितीन सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल नेण्यात आली.नव शैक्षणिक उपक्रमाने यशस्वी झालेल्या या सहलीसाठी कु.सुनिता गायकवाड,सौ.सुचिता इंगोले आणि राधाबाई सोनसळे या शिक्षिकासह,कर्मचारीवृंद आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

04 February 2024

नामदेव वाघमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती. तर भोकर शहर कार्याध्यक्षपदी अविनाशभाऊ आलेवार यांची नियुक्ती

भोकर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेवरुन भोकर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेव लालबाजी वाघमारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून भोकर शहर कार्याध्यक्षपदी अविनाश भाऊ आलेवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांच्याही नियुक्तीचे पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
सामाजिक चळवळीचा वडीलांचा वारसा असलेल्या नामदेव लालबाजी वाघमारे यांचे आंबेडकरी चळवळ व मातंग समाजातील अनेक आंदोलने आणि न्यायीक कार्यात योगदान आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)मध्ये जाहीर प्रवेश केला होता.नामदेव वाघमारे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार यांना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पदनियुक्त मान्यता दिली. त्यांच्या मान्यतेवरुन इंजि.विश्वंभर पवार यांनी नामदेव वाघमारे यांची उत्तर नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.


याच बरोबर भोकर शहरातील नागरिक व तरुणवर्गात मोठा जनसंपर्क असलेले युवा कार्यकर्ते अविनाश आलेवार यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भोकर शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना देखील उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार, भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख व भोकर शहराध्यक्ष फईम पटेल यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

सदरील नियुक्तीपत्र दि.३ फेब्रुवारी २०२४ रोजी भोकर येथील पक्ष संपर्क कार्यालयात देण्यात आले आहेत.यावेळी उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष इंजि.विश्वंभर पवार,ओबीसी विभाग उत्तर नांदेड जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्षा पुजाताई व्यवहारे,भोकर तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम देशमुख,जिल्हा सरचिटणीस रवि गेंटेवार,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील नांदेकर,मुदखेड तालुकाध्यक्ष आनंद टिपरसे,तालुका सचिव महेंद्र कांबळे,भोकर शहराध्यक्ष फईम पटेल,ओबीसी विभाग भोकर तालुकाध्यक्ष तुकारामजी महादावाड यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नियुक्तीपत्र बहाल करण्यात आल्यानंतर उपरोक्त सर्वांसह उपस्थित कार्यकर्त्यांनी उभयंतांचाही यथोचित सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.दलित,मागासवर्गीय व आदींत नामदेव वाघमारे यांचा मोठा जनसंपर्क असल्याने व तरुणांत अविनाश आलेवार यांचा संपर्क मोठा असल्याने पक्ष बळकटीकरणासाठी या दोघांचीही नियुक्ती उपयुक्त ठरणार असल्याने पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते आणि मित्रपरिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने देखील त्यांना पुढील सेवाकार्यासाठी मनापासून खुप खुप हार्दिक शुभेच्छा!

03 February 2024

भोकर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक

भोकर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक
भोकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड उ. जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ०४ वाजता भोकरच्या पक्ष कार्यालयात पक्ष संघटना व बुथ कमिटी बांधणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीसाठी नांदेड जिल्हा उत्तरचे, विधानसभा अध्यक्ष विश्वंभर पवार, तालुका अध्यक्ष राजेश्वर देशमुख, सचिव महेंद्र कुमार कांबळे, व शहराध्यक्ष तसेच सेलचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत तेंव्हा मोठ्या संख्येने उपस्थीत राहावेअसे आवाहन नांदेड जिल्हा सरचिटणीस नांदेड उत्तर राहुल चौदंते यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट अधिक सक्रिय झाला असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्यानेच पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना विविध पदे देण्याचा सपाटा सुरू आहे. दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अजित पवार गटाची ही घोडदौड सुरू असल्याने राष्ट्रीय काँग्रेससाठी चांगलेच अहवान निर्माण झाले आसल्याचे दिसून येत आहे….

शिवजन्मोत्सव समिती भोकर च्या अध्यक्षपदी संदिप पाटील गौड यांची निवड तर सचिवपदी आनंद डांगे यांची निवड…

भोकर : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी भोकर येथे प्रथमच विविध सामाजिक प्रवर्गातील समाज बांधवांची दि.२ फेब्रुवारी रोजी एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली आणि या बैठकीतून सर्वानुमते निवडण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव समिती भोकर-२०२४ च्या नुतन कार्यकारिणी अध्यक्षपदी सामाजिक युवा नेतृत्व संदिप पाटील गौड कोंडलवार यांची तर सचिवपदी युवा नेतृत्व आनंद डांगे यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व सामान्य समाज घटकातील विविध सामाजिक प्रवर्गातील समाज बांधवांनी एकत्र येऊन देशाचा स्वाभिमान,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रम व उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला असून याच अनुषंगाने दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री हनुमान मंदिर,जेठीबा नगर भोकर येथे एक व्यापक बैठक घेण्यात आली.तसेच झालेल्या चर्चेअंती सर्वानुमते शिवजन्मोत्सव समिती-२०२४ ची कार्यकारिणी निवडण्यात आली.त्या कार्यकारिणीचे उर्वरित पदाधिकारी पुढील प्रमाणे…
उपाध्यक्ष-दिपक निळकंठ वर्षेवार,मोहन राठोड,सहसचिव-माधव पाटील बोरगावकर,कोषाध्यक्ष-विजय पवार,प्रसिद्धी प्रमुख-आदिनाथ चिंताकुंठे,अनिल डोईफोडे यांची निवड करण्यात आली असून,सल्लागार म्हणून भोकर येथील विविध पक्ष,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक नेत्यांची निवड करण्यात आली आहे.तर या महत्वपुर्ण बैठकीस माधवराव अमृतवाड,सुरेश बिल्लेवाड,निळकंठ वर्षवार,ॲड. परमेश्वर पांचाळ,ॲड.शेखर कुंटे,संतोष आलेवाड,सिताराम मेटकर,पांडूरंग वर्षेवार,सुभाष नाईक,कृष्णा पाटील कोंडलवार, लालू धोत्रे,संतोष आणेराये,राठोड, बाळू मेटकर,बालाजी एलपे, अंकुश रतनवार,व्यंकट मेटकर,दीपक मेटकर,बाळासाहेब देवकर,बालाजी देवकर,दत्ता बोईनवाड यांसह बहुसंख्य बहुजन बांधवांची उपस्थिती होती.सर्व उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे यथोचित स्वागत करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून भोकर शहरात प्रथमच बहुजन समाजातील असंख्य मावळे एकत्र येऊन रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा साजरा करणार असल्याने शिवजन्मोत्सव कार्यकारिणी च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

वलांडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या!नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी गृहमंत्र्यांकडे केली मागणी

नांदेड : मौजे वलांडी ता.देवणी जि.लातूर येथील हिंदू खाटीक समाजातील ६ वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागाणी नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मौजे वलांडी ता.देवणी येथील या निंदणीय घटनेचा नांदेड जिल्हा सकल अनुसूचित जातीतील व मानवतावादी न्यायप्रिय संघटनांच्या वतीने दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे तीव्र जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निंदणीय घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी व खालीलप्रमाणे कठोर कार्यवाहीचे निर्देश द्यावेत.तसेच गरीब असहाय्य पिडीत मुलीस व तिच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी जिल्हाअधिकारी नांदेड यांच्या मार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे.त्या मागण्या पुढील प्रमाणे…
या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवून गुन्हे प्रकरणातील आरोपीस फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवावे,पिडीत मुलीच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे,या घटनेतील पिडीत मुलीस शासनाच्या मनोधैर्य योजनेतून व समाजकल्याण विभागामार्फतची शासनाची मदत तातडीने मिळवून द्यावी, यांसह आदी न्यायीक मागण्या करण्यात आल्या आहेत.तर सदरील मागण्या मान्य न झाल्यास विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,परमेश्वर बंडेवार,अ‍ॅड.बी.एम. गायकवाड,एन.डी.रोडे,शिवाजी नुरूंदे,चंपतराव हातागळे, नागेशभाऊ तादलापूरकर,मर्‍हारी तोटरे,सत्यशोधक समाज संघाचे दत्ता तुमवाड,ओबीसी समन्वय समतीचे नेते एस.जी. माचनवार,नंदकुमार कोसबतवार,मानवहित लोकशाही पार्टीचे मालोजी वाघमारे,आकाश सोनटक्के, हिंदू खाटीक समाज संघटनेचे बालाजी सौदागर,अंबादास सांडवे,मिथुन रत्नपारखे, अ‍ॅड.विजय रत्नपारखे,डिगांबर धाकपाडे,गणेश रत्नपारखे,दत्ता धाकपाडे,गंगुलाल नामतकर,गणेश घोरपडे,बहुजन समाज पार्टीचे सुनील डोंगरे,क्रांती आंदोलनाचे उत्तमराव वाघमारे, गोपीनाथ सूर्यवंशी,उत्तमराव देगावकर यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी दिला आहे.

02 February 2024

स्किलबेस अकॅडमीचा ४ था वर्धापन दिन उत्साहात साजरा

नांदेड : स्किलबेस अकॅडमीचा ४ था वर्धापन दिन व हळदी-कुंकू समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी नांदेड शहराच्या माजी महापौर तथा गुरुकुल पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई निलेश पावडे,जेष्ठ साहित्यिक,कवयित्री आशा पैठणे,ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा सौ.वैशाली मारकोळे पाटील व उपअभियंता(जलसंपदा )इंजि.किशन विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित सर्व मान्यवरांचा स्किलबेस अकॅडमी तर्फे संचालक सौ.प्रियंका विरभद्र विभुते,विरभद्र विभुते यांच्यासह शिक्षिका वृषाली जाधव व शिल्पा कल्याणकर यांच्याहस्ते शाल व तुळसीचे रोप देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तर अकॅडमीचे गुणवंत विद्यार्थी सार्थक कऊटकर (IMO गोल्ड मेडल),श्रेया माने (IMO गोल्ड मेडल),राजवीर काशीद (IMO गोल्ड मेडल व सेकंड लेवल क्वालिफाय),अभिजित एकाळे (IMO गोल्ड मेडल) व श्रीजय राठोड (7th Rank) या सर्व विध्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यानंतर सर्व माता पालक व आप्तस्वकीयांचा हळदी-कुंकू समारंभ व तिळगुळ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सदरील कार्यक्रम प्रसंगी सर्व विद्यार्थी, पालकवृंद, आप्तेष्ट व मान्यवर पाहुणे यांसह आदींची मोठ्याप्रमाणात उपस्थित होती.

शेती उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी भोकर तालुका युवक काँग्रेसने काढला मोर्चा

भोकर : शेती उत्पादनावर खर्च अधिक होतोय तर उत्पादनास भाव कमी मिळतोय.अहोरात्र राबून शेती उत्पादनावर अवलंबून राहणाऱ्या शेती उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे.यास केंद्र व राज्य सरकारचे शेती धोरण जबाबदार असल्याचा आरोप करुन शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला योग्य भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी भोकर तालुका युवक काँग्रेसने दि.१ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले निवेदन.
खरीप असो अथवा रब्बी पिकांसाठी लागणारे रासायनिक खते,बी-बियाणे,औषधी यांसह आदींचे भाव प्रतिवर्षी वाढतच आहेत.यामुळे शेती उत्पादनावर होणारा खर्च अधिक होत आहे व उत्पादन ही कमी आणि त्या उत्पादनास भाव ही कमी मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड व संकटांना सामोरे जावे लागत आहे.नव्हे तर अनेकजण यामुळे आत्महत्या ही करत आहेत.भोकर तालुक्यातील शेतकरी देखील अशाच संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा होणारा खर्च पाहता सोयाबीनला प्रतिक्विंटल ७ हजार रुपये,कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपये व हरभऱ्यास प्रतिक्विंटल ८ हजार रुपये भाव मिळायला पाहिजे.परंतू या प्रमाणे भाव मिळत नसून सोयाबीनला प्रतिक्विंटल ३ हजार ८०० रूपये व कापसाला प्रतिक्विंटल केवळ ६ हजार रुपये भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या पणन महामंडळाने कापसाला हमी भाव देऊन कापूस खरेदी करावयास पाहिजे होता.परंतू अद्यापही खरेदी केंद्र सुरु केले नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यास केंद्र व राज्य सरकारचे शेती धोरण जबाबदार आहे.असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनास योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे. यामागणीसाठी भोकर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी महात्मा बसवेश्वर चौक ते भोकर तहसिल कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढला.तसेच ही मागणी सरकारने तात्काळ मंजूर केली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.सदरील निवेदन तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.
सदरील मोर्चाचे नेतृत्व स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे सभापती जगदीश पाटील भोसीकर व युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्रिक पाटील मुंगल बेंबरकर यांनी केले असून या मोर्चात,बाजार समितीचे उपसभापती बालाजी श्यानमवाड, संचालक रामचंद्र मुसळे,केशव पाटील पोमनाळकर,संचालक राजू अंगरवाड,व्यंकट पाटील,सुरेश पाटील डूरे,कैलास पाटील,राघोबा पाटील,सतिश पाटील,विक्रम क्षिरसागर,नागोराव दंडे,श्रीधर जाधव,परसराम पाटील,प्रताप पाटील,शिवाजी पाटील,माधवराव पाटील सुर्यवंशी,आनंद ढोले, गणेश यादव,गिरीष पाटील,श्रीकांत दरबस्तवार,धनराज मोघाळीकर,श्याम पाटील,विठ्ठल धोंडगे,साई येलूरे,बालाजी येलपे,सुनिल जाधव,गोविंद मेटकर यांसह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

नांदेड जिल्ह्यात स्वस्त दरात वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी वाळू डेपो तयार

नांदेड  : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.१९ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने वाळू,रेतीचे उत्खनन, साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे.या नवीन वाळू धोरणानुसार नांदेड जिल्‍हयात टप्‍याटप्‍याने वाळू डेपो तयार करण्‍याचे काम सुरु आहे.काही वाळु डेपो कार्यान्‍वीत पण झाले आहेत.या डेपोवरुन नागरिकांना प्रती ब्रास ६०० रुपये अधिक इतर कर ७७ रुपये याप्रमाणे डेपोत उपलब्ध होणाऱ्या वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरुन दि.११ फेब्रुवारी २०२४ नुसार वाळू विक्री करण्यात येणार आहे.तरी ज्‍या नागरिकांना वाळुची आवश्‍यकता आहे अशा नागरिकांनी नजिकच्‍या सेतू केंद्रावर जाऊन संपर्क करावा,असे नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आवाहन केले आहे.

सदरील सेतु केंद्रावर पुढील प्रक्रियेनुसार वाळु मागणीसंदर्भात नोंदणी करावी.वाळु डेपोतुन वाळु मागणी करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीवर दररोज कार्यालयीन वेळेत सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत नोंदणी करावयाची आहे. प्रत्‍येक वाळु डेपोवरुन प्रतिदिन किमान २०० ब्रास इतकी रेती बुकींगची मर्यादा निश्‍चीत केली आहे.प्रत्‍येक लाभार्थ्‍याना प्रति महिना १० ब्रास इतकी वाळु उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. घरकुलाच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू विनामूल्य उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल.

त्यासाठी जनतेने वाळू धोरण-२०२३ च्या अनुषंगाने वाळू बुकींग करण्यासाठी नजिकच्‍या सेतू केंद्राला भेट द्यावी.सेतू केंद्रधारक यांनी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर वरील बाजूस SAND BOOKING असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे. SAND BOOKING वर क्लिक केल्यानंतर संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडेल.त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर लॉगिन करुन ग्राहकांची आवश्यक ती माहिती भरावी जसे नाव, मोबाईल क्रमांक व स्वत:चा ई-मेल आयडी इत्यादी माहिती भरावी.रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (ओटीपी) टाकून लॉग इन करावे.त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपली घर,इमारत,घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा.त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी.आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा STOCKYARD निवडावा.शेवटी ऑनलाईन पावतीने बुकींग केलेल्या वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी व संबंधित STOCKYARD वर जाऊन पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी.

वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे.ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायर पर्यत असणारे टिप्पर,टेम्पो व इतर) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोदणी करण्यात यावी. वाहतुकीचा दर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे राहील याबाबतची सविस्तर माहिती www.nanded.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.तसेच ऑनलाईन संदर्भात तक्रार असल्‍यास Helpline No. of Mahakhanij 020-67800800 या दुरध्‍वनीवर संपर्क करावा.याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

01 February 2024

भोकर येथे सगेसोयरे अधिसुचनेवर ओबीसीकडुन हजारो हरकती दाखल

भोकर प्रतिनिधी:- मराठा समाजाच्या दबावात येऊन दि.२६ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढून सन २००० व सन २०१२ च्या अधिसुचनेत बदल करुन मराठा जातिला ओबिसी प्रवर्गात छुप्या मार्गाने वैधता प्रमाणपत्रात देण्याची अधिसूचना शासनाने कढली आहे.या महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील आधीच अरक्षणा बाहेर असणारे बाराबलुतेदार,अलुतेदार,भटक्या जाती परत एकदा आरक्षणा पासून कसो दुर जाणार आहेत.म्हणून संबंध महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात आज दिनांक १ फेब्रुवारी २०२४ पासून हरकती नोंदविण्यात सुरवात झाली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज भोकर येथे हा शासनाचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी भोकर तालुक्यात ओबीसी समन्वय समितीच्या वतीने हरकती दाखल करण्यात आल्या व २६ जानेवारीच्या शासन आदेशची सामुहिक होळी करण्यात आली. यावेळी नामदेवराव आयलवाड,गोविंद बाबा गौड पाटील,नागनाथ घिस्सेवाड,विठ्ठल फुलारी, माधव अमृतवाड,नागोराव शेंडगे बापु,सुरेशराव बिल्लेवाड,सतीश देशमुख,संतोष आलेवाड, डॉ.राम नाईक,श्याम रेड्डी,सुभाष नाईक,संतोष पाटील बुद्धेवाड,साहेबराव भोंबे,आनंदराव गुरूजी आनंतवाड,संदीप गौड पाटील,माधव मेकेवाड,विशाल दंडवे,शेखर कुंटे,नागनाथ पाटील गौड,रमेश पाटील कोंडलवार,बालाजी येलपे,विठ्ठलराव माचनवाड, मोहनराव, आदिनाथ चिंताकुटे आदीसह अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी तहसीलदार भोकर यांच्याकडे हजोरो हरकती पत्र दिले.या वेळी नांदेड येथुन एस.जी माचनवार,गोविंदराव सुरनर,बि.के. पाटिल आदीसह अनेक मान्यवरांची ही उपस्थिती होती.