जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 April 2023

नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा 1 ते 4 मे असे चार दिवस येलो अलर्ट

▪️काळजी घेण्याचे जिल्हाप्रशासनाचे आवाहन 
नांदेड (जिमाका) दि 30:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आज दिनांक 30 एप्रिल 2023 या दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट व दिनांक 1,2,3 व 4 मे 2023 चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे.

दिनांक 30 एप्रिल 2023 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 1,2,3 व 4 मे 2023 या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

29 April 2023

भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे वर्चस्व कायम.

( सलग तिसऱ्यांदा काँग्रेसचे च निर्विवाद वर्चस्व) प्रतिनिधी अंबादास के एल बोयावार 
भोकर: येथे होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते अखेर काँग्रेस चा बालेकिल्ला काबीज करण्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना यश आले आहे. भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेस १३ व राष्ट्रवादी काँग्रेस चे ०२ असे एकूण १५ उमेदवार विजयी झाल्याने एक हाती सत्ता कायम ठेवण्यात यश प्राप्त झाले असून. भारतीय जनता पक्षाचे ०३ उमेदवार विजयी झाले आहेत. नव्यानेच तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या व नव्यानेच निवडणुकीत उतरलेल्या बी. आर. एस. पक्षाला खातेही उघडता आले नाही.
        विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे माजी सभापती जगदीश पाटील भोसीकर,माजी उपसभापती गणेश राठोड,माजी संचालक रामचंद्र मुसळे,माजी संचालक पंकज पोकलवार यांनी आपली विजयी परंपरा कायम राखली आहे.सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून उज्वल केसराळे,जाधव व्यंकट सोनबा,केशव पाटील सोळंके पोमनाळकर यांनी तर राष्ट्रवादी कडून विश्वंभर पवार तर भारतीय जनता पार्टी कडून सुभाष पाटील किन्हाळकर हे विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती शिवाजी कदम तर काँग्रेसच्या वर्षा आनंदराव देशमुख ह्या विजयी झाल्या आहेत. सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे बालाजी गंगाधर शानमवाड हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून काँग्रेसचे जगदीश पाटील कल्याणकर.ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल मतदारसंघातून राजकुमार लक्ष्मण अंगरवार हे विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून किशन सखाराम वागतकर हे विजयी झाले आहेत. हमाल व मापाडी सय्यद खाल्लेद सय्यद रफिक हे विजयी ठरले तर आडते व व्यापारी मतदारसंघातून पंकज सखाहरी पोकलवार व सारंग अशोककुमार मुंदडा यांनी विजय संपादन केला आहे.
      विजयी उमेदवारांचे ढोल ताशाच्या गजरात शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, जिल्हाउपाध्यक्ष भगवानराव दंडवे,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, संतोष कापवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

22 April 2023

वाळूला अवाच्या सव्वा भाव; नवे धोरण कधी लागू होणार ?

लिलावही नाही आणि धोरणही जाहीर होईना; सामान्यांची मात्र गोची
बिलोली: सर्वसामान्य नागरिकांना सहाशे रुपयांमध्ये वाळू उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने नवी योजना जाहीर केली खरी, पण त्यासंदर्भाने स्थानिक पातळीवर आणखी कोणत्याच सूचना नाहीत. दुसरीकडे लिलाव झाले नसल्याने चोरीच्या मार्गाने वाळू खरेदी करावी लागतेय. यात नागरिकांची मात्र गोची होतेय.

सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी राज्य शासनाने स्वतःचे वाळू डेपो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अजून त्याची अंमलबजावणी झाली नाही. शासनाच्या निर्णयामुळे यावर्षी वाळू घाटांचे लिलाव देखील जिल्ह्यात झाले नाहीत. त्यामुळे अधिकृत वाळू उपसा ठप्प असून, चोरुन वाळूची विक्री होत आहे. चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाळू विक्रीतून मोठी उलाढाल होत आहे. वाळूचे दरही दुपटीने वाढले असून, नागरिकांना ही वाळू परवडत नाही. परिणामी बांधकामे ठप्प पडली आहेत. तेव्हा किमान वाळू घाटाचे लिलाव करुन सामान्यांना वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.
काय आहे नवे वाळू धोरण?

शासन स्वतःच वाळू डेपो सुरु करणार आहे. या डेपोतून नागरिकांना ६०० रुपये प्रति ब्रास या प्रमाणे वाळू उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणत्याही सूचना स्थानिक पातळीवर नाहीत.

अंमलबजावणी कधी होणार?

राज्य शासनाने निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होणार? हा खरा प्रश्न आहे. वरिष्ठांकडून आलेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र अजून तरी कोणतेही निर्णय झालेले नाहीत.

16 April 2023

उड्डाणपूलाच्या कामात मातीयुक्त ढबराचा भरणाभोकर शहरातील प्रकार; राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे दुर्लक्ष

भोकर /अंबादास के एल बोयावार 
शहरातील नांदेड मार्गावरील वळणरस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामात काळी माती युक्त ढबर मुरूम भरण्यात येत आहे.त्यामुळे भविष्यात सदरील उड्डाणपूल ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरील उड्डाणपूलाचे काम करणारे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून घाईगडबडीत काम उरकण्याचा प्रयत्न करीत असतानाही भोकर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अभियंत्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संपुर्ण देशात रस्त्याचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.देशातील रस्ते दर्जेदार व्हावे असा त्यांचा उद्देश असला तरी भोकर तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते.नांदेड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी नरम मुरूम वापरून त्यावर पाणी टाकने आवश्यक असतानाही कंत्राटदाराने या कामासाठी काळी माती मिश्रीत ढबर मुरमाचा वापर करीत आहे.सदरील कामावर  राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याने थातूरमातूर काम उरकण्याचा प्रयत्न कंत्राटदाराकडून होत असल्याने या विभागाच्या ढिसाळ कारभाराबाबत नागरीकातून रोष व्यक्त होत आहे.

सदरील उड्डाणपूलाचे काम थातूरमातूर पध्दतीने होत असल्याचे मला कळाले.याबाबत संबंधित कंत्राटदारांची कान उघडणी केली असून या कामासाठी दर्जेदार साहित्य वापरण्याची सुचना मी केली आहे.यानंतर निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न झाल्यास आमच्या विभागाकडून कंत्राटदारांवर कार्यवाही केली जाईल.
 सुरेश हाटकर
सहाय्यक अभियंता राष्ट्रीय महामार्ग भोकर

स्वस्तात वाळू धोरण 'स्वप्न' तर ठरणार नाही ना?

गोरगरिबांची सरकारवर नाराजी : म्हणे, सगळं खोटं असतंय....
बिलोली : वाळूतस्करी व वाळूमाफियांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने नवे वाळू धोरण आणले आहे. याअंतर्गत वाळू लिलाव प्रक्रिया बंद करण्यात येणार असून, पुढील काळात जनतेला शासकीय दराने वाळू उपलब्ध करून देण्याची घोषणा महसूलमंत्र्यांकडून करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल घरकुल लाभार्थी, कशाचे धोरण, अन कशाचे काय, सगळं खोटं असतंय.... असे म्हणत सरकारबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

गरीब, गरजू घरकुल लाभार्थी, गुरांच्या गोठ्याचे लाभार्थी व इतर बांधकामासाठी गरीब जनतेला स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी म्हणून पारदर्शक अंबलबाजवणीची गरज आहे.नवीन धोरणाची सर्वसामान्य नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.सहाशे ते एक हजार रुपये ब्रास या दराने वाळू उपलब्ध होणार असल्याने बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस येतील,अशी आशा आहे. मात्र, जुन्या नियमाप्रमाणे नव्या धोरणाचेही होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. केवळ ट्रॉली व अन्य लहान वाहनांमधूनच वाळूची वाहतूक करावी लागणार आहे. शासनाच्या या निर्णयाने गरिबांना दिलासा मिळाला असून, त्यांना स्वप्नातील घर बांधणे शक्य होईल. मात्र त्यासाठी अंमलबजावणी पारदर्शीपणे झाले पाहिजे. अवैध वाळू उपसा थांबावा म्हणून अनेक नियम करण्यात आले. मात्र, अनेक ठिकाणी उपसा थांबण्यास फारसे यश आलेले नाही. त्यामुळे हे नवीन धोरण किती यशस्वी होईल? हे येणारा काळच ठरवेल.

13 April 2023

मध्यवर्ती बँक शाखेचे रोखपाल गंगाधर उमरे यांचे हृदय विकाराने निधन

भोकर प्रतिनिधी:- भोकर येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे रोखपाल श्री गंगाधर विठ्ठलराव उमरे वय ५६ वर्षे यांचे आज दि.१३ एप्रिल २०२३ रोज गुरुवारी बँकेत काम करीत असताना अचानक ३:३०च्या दरम्यान आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखद निधन झाले आहे.
   गंगाधर उमरे हे भोकर तालुक्यातील मोजे मोघाळी येथील रहिवासी असून ते गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भोकर येथे रोखपाल म्हणून काम करतात. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ, सुशील व प्रेमळ असल्यामुळे ते भोकर तालुक्यात एक लोकप्रिय व शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून प्रसिद्ध होते. नित्य नियमाप्रमाणे ते आजही दिनांक १३ एप्रिल रोजी बँकेत शेतकऱ्यांना विविध योजनेतील मिळालेल्या रक्कमेचे वाटप करीत होते.रक्कम वाटप करीत असताना दुपारी३:३० च्या दरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले परंतु लगेच दवाखान्याच्या बाहेरच पुन्हा दुसरा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. एका कर्तव्य तत्पर व सुशील आणि मनमिळावू स्वभावाच्या कर्मचाऱ्याचा असा अचानक मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दि.१३ एप्रिल रोज गुरुवारी रात्री १० वाजता मौजे मोघाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. उमरे परिवाराच्या दुःखात दैनिक मराठवाडा नेता परिवार सहभागी आहे.

06 April 2023

भोकर कृ.उ.बा.समिती निवडणूक कामकाजात डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नावच नाही

नामांतर होऊन पाच वर्ष झाली ; परंतू प्रशासकीय नोंदीत अद्यापही अंमलबजावणी झालीच नाही ? 

भोकर : तेलंगणा - महाराष्ट्र राज्य सिमेलगत असलेल्या मराठवाड्यातील मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीचे स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर असे नामांतर होऊन जवळपास पाच वर्ष होऊन गेलीत.परंतू सद्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक कामकाजात स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव कुठल्याही प्रशासकीय कागदपत्रांवर दिसत नसल्याची गंभीर बाब निदर्शनास येत असून 'त्या' नामांतराची प्रशासकीय नोंदीत अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याने ही अक्षम्य चूक तत्कालीन संचालक मंडळाच्या पाठपुरावा न करण्याची आहे का तालुका व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अधिकाऱ्यांची आहे ? यावर प्रश्नचिन्ह उभे आहे.तर निवडणूक प्रचारात ते नाव वापरावं का नाही ? अशी चर्चा संभ्रमावस्थेतील काही उमेदवारांतून होत आहे. 

भोकर कृषि उत्पन्न बाजार समिती,भोकर जि.नांदेड ची दि.२५ ऑगस्ट १९६० मध्ये स्थापना झाली.महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ही बाजार समिती असून पुर्वीचे आंध्रप्रदेश व आजच्या तेलंगणा राज्य सिमेलगत असल्याने दोन राज्यांतील शेतकऱ्यांचा शेती उत्पन्न माल या बाजार पेठेत विक्रीसाठी येतो.अनेक वर्ष सदरील बाजार समितीचा कारभार आमदार स्व.बाबासाहेब देशमुख गोरठेकर,माजी आमदार स्व.बापूसाहेब देशमुख गोरठेकर,माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,माजी सभापती नागनाथ घिसेवाड यांसह आदींच्या गटांनी पाहिला.तर सन २००९ मध्ये भोकर विधानसभा मतदार संघाची रचना बदलली व येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एंट्री झाली.त्यांच्या अधिपत्याखाली सदरील बाजार समितीवर एकहाती सत्ता आली व सभापती जगदिश पाटील भोसीकर यांच्या संचालक मंडळाने भोकर विधानसभा,नांदेड जिल्हा,महाराष्ट्र राज्य व देश पातळीवर नेतृत्व करुन विविधांगी विकास साधणाऱ्या माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि योगदानाची दखल घेऊन भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीचे स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती असे नामांतर करण्याचा ठराव सन २०१७ मध्ये घेतला. 

यानंतर भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी बहुउद्देशीय भव्य इमारत बांधण्याचा निर्णय घेतला.ठरावानुसार स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीच्या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा दि.२५ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मंत्री अशोकराव चव्हाण व तत्कालीन आमदार अमिता भाभी चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भुमिपूजन कोणाच्या हस्ते करायचे ? म्हणून काँग्रेस पक्ष व भाजपा- शिवसेनेच्या संचालकांत वाद रंगला आणि दोन्ही गटांनी आपापल्या परीने भुमिपूजन केले.सदरील इमारत पुर्णत्वास आली व या इमारतीचा लोकार्पण सोहळा दि.१४ जून २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या इमारतीस ही स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले असून याच इमारतीत स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे कार्यालय सुरु करण्यात आले.देशाच्या एका कर्तुत्ववान व्यक्तीमत्वाचे नाव सदरील बाजार समितीस देण्यात आल्याने अनेकांतून त्या संचालक मंडळाचे कौतुक व अभिनंदन केले. 

याच बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सद्या होऊ घातलेली आहे.काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजपा- शिवसेना,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,भारत राष्ट्र समिती व आदी पक्ष अपक्षांच्या गटातील जवळपास दोनशे इच्छूक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छाननी झाली आहे व दि.६ एप्रिल २०२३ पासून ते दि.२० एप्रिल २०२३ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुद्दत आहे.उमेदवारी अर्ज माघारी नंतर प्रत्यक्ष कितीजण निवडणूक लढणार आहेत हे चित्र स्पष्ट होईल. दि.२८ एप्रिल २०२३ रोजी मतदान होईल व दि.२९ एप्रिल २०२३ रोजी मतमोजणी पार पडेल आणि नुतन संचालक मंडळ अस्तित्वात येईलही.परंतू हे होत असतांना दरम्यानच्या काळात पार पडत असलेल्या निवडणूक कामकाजात एक दखलपात्र बाब निदर्शनास येत आहे,ती म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील कामकाजात कुठल्याही प्रशासकीय कागदपत्रांवर स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर असे लिहलेले दिसत नाही.देशाच्या एका कर्तुत्ववान नेत्याचे नाव उल्लेखिल्या जात नाही ही बाब अक्षम्य आहे,नव्हे तर निंदनीय आहे.तसेच उमेदवार असोत का त्यांचे नेते असोत याबाबद कोणीही काहीही बोलण्यास तयार नाहीत किंवा ही चुक दुरुस्त करावी म्हणून निवडणूक विभागास सांगत ही नाहीत.यामाघिल गौडबंगाल काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.जी.गन्लेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,या बाजार समितीच्या नामांतराचा ठराव नक्कीच झालेला आहे.परंतू राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाने तशी नोंद घेऊन अधिसूचना काढायला पाहिजे.त्यांनी का काढली नाही याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. कारण मला तसे अधिकार नाहीत म्हणून मी त्यांना अधिक विचारु शकत नाही.त्यांनी व माझ्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे माझे काम असून त्यानुसार मी माझे कर्तव्य करत आहे. 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वडील म्हणून नव्हे तर देशाच्या एका कर्तुत्ववान नेत्याचे नाव सदरील बाजार समितीस दिलेले असतांना या नामांतराची प्रशासकीय नोंदीत अंमलबजावणी का बरे करण्यात आली नाही ? याचा जाब सर्वांनीच विचारला पाहिजे.कारण निवडणूक प्रक्रियेतील प्रचार,प्रसिद्धी फलकांवर अधिकृतपणे स्व. डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर असे लिहणे गरजेचे आहे.आणि जर तसे लिहिले तर प्रशासकीय नोंदीनुसार ते योग्य राहणार नाही.असे असतांना या दखलपात्र बाबींकडे लक्ष न देता मलाच कशी अधिकृतपणे मोठ्या पॅनल कडून उमेदवारी मिळेल ? यातच अनेकजण मशगुल आहेत.देशाचे नेते स्व.डॉ.शंकरराव चव्हाण यांना माणणाऱ्यांनी तरी किमान या बेदखल बाबीकडे लक्ष घालून तात्काळ 'त्या' नामांतराची अंमलबजावणी करुन घेतली पाहिजे,असे अनेकांतून बोलल्या जात आहे.पाहुयात ही दुरुस्ती होते का दुरुस्तीविनाच निवडणूक पार पडते ?

बारड येथील ट्रक दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

भोकर : बारड जवळील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रक दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ०५ एप्रिल रोजी सायंकाळी अंदाजे ५:३० च्या सुमारास घडली आहे.भोकर कडून नांदेड कडे भरधाव वेगात जाणारा ट्रक क्रमांक महा १८ ए ए ५६६४ या ट्रकने नांदेड कडून भोकर कडे येत असलेल्या दुचाकी क्रमांक महा २६ बी डब्लू ८२०३ यास जोराची धडक दिल्याने यात दुचाकीस्वार गजानन आदिनाथ बिज्जमवार (३०) राहणार गांधी चौक,भोकर येथील हया युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार हा ट्रकच्या मधोमध घुसल्याने ट्रकच्या चाका खाली आल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.अपघातातील ट्रकच्या खाली अडकून मृत्यू पावलेल्या युवकास काढण्यासाठी जवळपास एक तास लागला होता,अपघाताची बातमी समजताच ग्रामस्थांनी तसेच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर ग्रामस्थांच्या तसेच पोलिसांच्या मदतीने युवकास बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. राष्ट्रीय महामार्ग वरील अपघातामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली होती यानंतर महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली अपघातात ठार झालेल्या युवकास स्वेच्छदनासाठी बारड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, वृत्त लिहीपर्यंत बारड पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती, पुढील अधीक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज तूगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. पवार हे करीत आहेत.