जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

27 July 2024

निर्धार मेळाव्याला सर्व समाज बांधवांनी येण्याचे आवाहन अंबादास के एल बोयावार संतोष झुंजारे यांनी केले आहे


*
डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती महोत्सवा निमित्त डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने निर्धार महामेळावा*
डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती महोत्सवानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या 4 ऑगस्ट रोजीसत्यशोधक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती महोत्सवानिमित्त होणाऱ्या 4 ऑगस्ट रोजी निर्धार मेळाव्याचे अनुषंगाने सर्व समाज बांधवास एकजुटीने या निर्धार मेळाव्यास समाविष्ट व्हावे आणि आपल्या मातंग समाजाच्या अ ब क ड आरक्षण वर्गीकरण व अण्णाभाऊ साठेंणा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे या विविध मागणीला सरकारकडे आरक्षिततेच्या हितानुसार आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी सर्व समाज एकवटून जर संबंधित येणाऱ्या आमचे लाडके डॉ.अण्णाभाऊ साठे यांची नातू मा.सचिन भाऊ साठे आमच्या माई सावित्रीमाई साठे आणि आमचे अण्णाभाऊ साठे यांचे नातजावई गणेशजी भगत भाऊ यांचे या निर्धार मेळाव्याला मोलाचे योगदान आपल्या समाजासाठी हितकारक लाभदायक ठरणार आहे निर्धार मेळाव्याला सर्व समाज बांधवांनी येण्याचे आवाहन अंबादास के एल बोयावार संतोष झुंजारे यांनी आवाहन केले आहे

  साहित्यरत्न सत्यशोधक लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे येत्या पुढील रविवारी म्हणजेच 4 ऑगस्ट 2024 रोजी वेळ सकाळी 11 वाजता अनंता लॉन्स गुरुजी चौक पूर्णा रोड नांदेड येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, मराठवाडा सचिव किशोर कवडीकर व जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर यांच्या वतीने करण्यात येत आहे, 
तरी भोकर भोकर तालुक्यातील सर्व समाज बांधव माता भगिनी नांदेड येथे होणाऱ्या महानिर्धार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे भोकर तालुका अध्यक्ष संतोष झुंजारे, तालुका उपाध्यक्ष अंबादास बोयावार, तालुका संपर्क प्रमुख मुकुंद गोरलेकर, छायाताई मोरे जिल्हा कोषाध्यक्षा,पार्वतीताई बरकंबे, गजानन गाडेकर,जयश्री पोतरे, शंकर दिवटेकर,आनंदा चिलीमवार, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष काळे,भाग्यश्री शिरगीरकर , वंदनाताई पोतरे,कैलास मोतेकर,अजय गव्हाळे, रामा बोईवार यांनी केले आहे

भोकर च्या उडान पुढच्या डिव्हायडरला कार धडकली. चालकासह अन्य दोन जण गंभीर जखमी.

नांदेडहून भोकर मार्गे किनवट कडे जाणाऱ्या एका कारची उड्डाणपूलच्या काट्यास धडक होऊन झालेल्या अपघातात चालकासह कार मधील अन्य दोन जन जखमी झाल्याची घटना (दि 26)सायंकाळी नऊच्या सुमारास घडली असून नागरिकाच्या मदतीने जखमींना तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठविण्यात आले आहे. 
किनवट ला जाणारी एम एच 14 डी एन 6848 या क्रमांकाची ईरटीका कार अचानक उडणपूजा काट्यास धडकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत भर पावसात चालकासह जखमींना कारमधून बाहेर काढण्यास मदत केली.

26 July 2024

राष्ट्रीय महामार्ग पोलिसाची सुरक्षा विषयी जनजागृती- भोकर

भोकर- राष्ट्रीय महामार्ग मदत केंद्र बारड यांच्या वतीने दिनांक 24 वार बुधवार रोजी सुरक्षा जनजागृती विषय जनतेस माहिती देण्यात आली. 
गेल्या काही दिवसापासून वाहनाची होत असलेल्या अपघातामुळे अनेक जणांचे जीव गेल्याचे दिसून आले आहे. तसेच भोकर तालुक्यातील मार्तुळ येथे दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने जागीच चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे अत्यंत दुर्देवी घटना आहे. अपघाताची संख्या वारंवार वाढत चालली आहे सर्वात जास्त भोकर तालुक्यात अपघाताचा प्रमाण वाढत आहे.वाहन चालवताना काही महत्त्वपूर्ण सुरक्षा बाळगावी अशा संदर्भामध्ये महामार्ग पोलीस मदत केंद्र बारड पीआय पठाण साहेब, पीएसआय हनुमंतराव येलगुलवार व तसेच त्यांच्या सहकारी कर्मचारी सोबत जनतेस महत्त्वाचे वाहनाविषयी जनजागृती करण्यात आले . भरधाव व बेभाम पद्धतीने वाहन चालविणे, नशा करून वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, वाहन रॉंग साईडने चालवणे, चुकीच्या पद्धतीने वाहने ओलांडणे, रस्ता क्रॉस करताना काळजी न घेणे, आधी अपघाताची कारणे आहे... विना हेल्मेट वाहन चालवण्याने मृत्यू संकेत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. हेल्मेट विषयी महत्व जनतेस पटवून दिले. हेल्मेटचा वापर करावा .अपघात टाळण्याकरिता नियम पालन करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्याचे काम महामार्ग पोलीस मदत केंद्र बारड यांच्यावतीने करण्यात आले.

24 July 2024

गोरसेनेकडून विधानसभेसाठी उमेदवार उभा करणार

भोकर -समाजाच्या विकासासाठी समाजाच्या हितासाठी आता गोरसेना लवकरच विधानसभाच्या मैदानात उतरणार, आज भोकर येथे गोरसेना नांदेड जिल्हा अध्यक्ष पापाराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रमेश राठोड, जिल्हा नायक प्रकाश राठोड, जिल्हा संघटक धोंडू राठोड, जिल्हा सचिव सखाराम राठोड, यांच्या उपस्थितीमध्ये भोकर तालुका सर्व पदाधिकारी ची बैठक ठेवण्यात आली होती, या बैठकीमध्ये भोकर तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच समाजातील प्रमुख उपस्थित होते, येणाऱ्या दिवसांमध्ये विधानसभा साठी आता गोर सेना कडून उमेदवार उभा करणार असे जिल्हाध्यक्ष पापाराव चव्हाण यांनी म्हटले. लवकरच उमेदवार जाहीर होणार आणि या राजकारणाच्या मैदानामध्ये गोर सेना खंबीरपणे संपूर्ण ताकतीने इलेक्शन लढवणार असे जाहीर करण्यात आले.

23 July 2024

भारतीय जनता पार्टी पक्षाकडून भोकर येथे समस्त बंजारा समाज पदाधिकारी यांची बैठक संपन्न


     भोकर ( ) - भोकर येथे दि २३ जुलै वार मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे माजी आमदार अमर भाऊ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये समस्त बंजारा समाज प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. 
येणाऱ्या विधानसभा विषयी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपस्थित एडवोकेट रामराव नाईक, रोहिदास जाधव, उत्तमराव चव्हाण, डॉक्टर राम नाईक, एडवोकेट विनोद चव्हाण, रामभाऊ चव्हाण, मोहन राठोड, साई राठोड, गणेश राठोड, भगवानराव दंडवे, साहेबराव राठोड, बाळू महाराज, शेषराव राठोड, किशोर जाधव, अविनाश चव्हाण, विशाल जाधव, रंजीत राठोड, आकाश भाऊ पवार, पवन चव्हाण यांच्यासह भोकर तालुक्यातील सरपंच नाईक कारभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव जवळील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी

धडक; चार ठार, एक गंभीर जखमी 

भोकर :प्रतिनिधी 
येथील म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव जवळील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. मयतातील दोघे मातुळ येथील आश्रमशाळेचे कर्मचारी होते. 
        भोकर ते म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर दुचाकी (क्र. एम एच २६ सीके ६६५९) व दुचाकी (क्र.एम एच २६ सीएफ ९६१८) या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंगाधर विश्वनाथ म्हैसूरे (वय ५५, रा. शिळवणी ता. देगलूर. ह मु. भोकर), तर मदतनीस पदावरील परसराम किशन डाकोरे (वय ५०, रा. पांडुरणा ता. भोकर) हे दोघे कै. व्यंकटराव देशमुख निवासी आश्रमशाळा मातुळ येथे मदतनीस व कामाठी पदावर कार्यरत होते. तर ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड (वय २५, रा. नांदा बु. ) विनायक पोशट्टी बोरवाड (वय २३, रा. नांदा बु. ) या चौघांचा मृत्यू झाला असुन  श्रावण हनुमंत पेडेमोडे (वय २३, रा. कुंभरगाव ता. बिलोली) हा  गंभीर जखमी झाल्याने, त्यांचेवर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच ग्रामीण रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. सदरचे वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

22 July 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे रक्तदान शिबिर

उद्घाटक:-माननीय इंजिनियर विश्वंभर पवार (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड) मा. पत्रकार मनोज भाऊ चव्हाण

भोकर: अंबादास के एल बोयावार तालुका प्रतिनिधी 

आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका भोकर, शहर, युवक तथा जिल्हा ओबीसी तालुका शहर व युवक शहर
राजेश्वर देशमुख (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोकर), फहीम पटेल (शहराध्यक्ष), मो. मजरुद्दीन( युवा शहराध्यक्ष) आनंद डांगे (जिल्हा अध्यक्ष ओबीसी), तुकाराम महादावाड (तालुका अध्यक्ष ओबीसी ),शिवा पांचाळ (शहराध्यक्ष ओबीसी) ,गजू पाटील सोळंके (उपाध्यक्ष )महेंद्र कुमार कांबळे (सचिव), निलेश खांडरे (जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी), श्याम गणेशराव देशमुख, नामदेव दुधारे, प्रति कदम सुमेध, हनवते, सतीश चाटलवार, साहेबराव वारुळकर, संदीप नरवाडे, बंडू पवार, राजू पांचाळ, महेंद्र दुधारे, दशरथ इंदरवाड, संजू बनसोडे, विलास गुंडेराव, प्रकाश बुंदिरवाड

जिल्हा अध्यक्ष विशंभर पवार इंजिनीयर यांच्या संपर्क कार्यालय येथे महा रक्तदान शिबिर आयोजित.

भोकर -महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजितदादा गट चे जिल्हा अध्यक्ष नांदेड माननीय इंजिनियर विशंभर पवार यांच्याकडून भोकर संपर्क कार्यालय येथे सर्व कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका भोकर यांच्या वतीने पत्रकार गजानन गाडेकर साहेब पत्रकार विशाल जाधव यांच्यातर्फे रक्तदान करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ चे मराठवाडा महासचिव उत्तम बाबळे साहेब उपस्थित होते.

21 July 2024

माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांच्या प्रचाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच माजी नगराध्यक्ष भाजपमध्ये विलीन झाले मात्र या विरुद्ध न डगमगता काँग्रेसकडून दिवस-रात्र पक्षाने दिलेल्या उमेदवारास सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत विजयी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली ती काँग्रेसचे एकमेव माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांनी नांदेड जिल्ह्यातील एकमेव राखीव मतदारसंघाचे आमदार यांनी तेरी भी चूप मेरी भी चूप ही भूमिका निभावत असल्याने स्थानिक मतदार दुखावले गेले तर कार्यकर्ते मात्र गोंधळात पडले आहेत. मतदारसंघातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक व दलित मतदार असल्याने येथे नेहमीच काँग्रेस आणि मित्र पक्ष वरचढ ठरते आहे. या राखीव मतदारसंघातील मतदारांमध्ये सर्वपरिचित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांची ओळख आहे. सर्वांगीण दृष्टीने या भागातील तळागाळातील लोकांपर्यंत त्यांच्या सोबत राहत अडल्या-नडलेल्या नेहमीच अनपेक्षितपणे सहकार्याचा धक्का देण ही भिमराव जेठे यांच्यासाठी जमेची बाब आहे.
नुकत्याच नवनिर्वाचित खा.वसंतराव चव्हाण यांच्या प्रथम दौऱ्या निमित्त झळकलेल्या होर्डिंग्ज बॅनर्समुळे
माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांच्या या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आता बाहेरील आयात उमेदवारांपेक्षा स्थानिक उमेदवारांनाच संधी द्यावी अशी मागणी मतदारसंघात जोर धरत असून पक्षाने संधी दिल्यास पून्हा एका निष्ठावान आणि जनसामान्यांचे नेते म्हणून माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे यांच्या रूपाने या राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असं स्पष्टपणे दिसतं आहे.

17 July 2024

रसायन मिश्रित अवैध सिंधी पकडण्यात पोलिसांना यश.

पोलीस स्टेशन भोकर गुरन 242/2024 कलम 65 ई , 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा 
(1) फिर्यादी - चंद्रकांत गोविंदराव आरकिलवार पोका 527 पोलीस स्टेशन भोकर 
(2) आरोपी 1. शेख जावेद शेख सलीम वय 23 वर्षे राहणार समता नगर भोकर 2. चंद्राबाई खंडूराव जिंकलवाड वय 40 वर्ष राहणार नंदी नगर भोकर 
(3) गु घ ता वेळ ठिकाण - दिनांक 17/07/2024 चे 01.20 वाजताचे सुमारास शासकीय गोदामा समोरील मोकळ्या जागेत , शिवाजी चौक भोकर 
(4) मिळाला माल - सतरा नायलॉनच्या पोत्यामध्ये प्रत्येकी 50 शिंदीचे पाकिटे प्रति पाकीट एक लिटर प्रमाणे असे एकूण 850 लिटर शिंदी प्रति लिटर 50/- रुपये प्रमाणे 42,500/-रुपयाचा मुद्देमाल
(5) खुलासा - मा पोलीस निरीक्षक श्री मारकड साहेब यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोहेका 2401 नामदेव कोटु जाधव , पोका 527 चंद्रकांत गोविंदराव आरकिलवार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी मा पो नि साहेब यांचे आदेशाने रेड केली असता तेथे वर नमूद आरोपितानी विनापरवाना बेकायदेशीर रित्या शिंदीचे 17 पोत्यात 850 लिटर शिंदी किमती 42,500/- रुपये चा माल ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले.
(6) तपास- पोहैका 2401 नामदेव कोटू जाधव
(7) सापळा पथक - पोहैका 2401 नामदेव कोटू जाधव , पोका 527 चंद्रकांत गोविंदराव आरकिलवार

रसायन मिश्रित अवैध सिंधी पकडण्यात पोलिसांना यश.

     पोलीस स्टेशन भोकर गुरन 242/2024 कलम 65 ई , 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा 
(1) फिर्यादी - चंद्रकांत गोविंदराव आरकिलवार पोका 527 पोलीस स्टेशन भोकर 
(2) आरोपी 1. शेख जावेद शेख सलीम वय 23 वर्षे राहणार समता नगर भोकर 2. चंद्राबाई खंडूराव जिंकलवाड वय 40 वर्ष राहणार नंदी नगर भोकर 
(3) गु घ ता वेळ ठिकाण - दिनांक 17/07/2024 चे 01.20 वाजताचे सुमारास शासकीय गोदामा समोरील मोकळ्या जागेत , शिवाजी चौक भोकर 
(4) मिळाला माल - सतरा नायलॉनच्या पोत्यामध्ये प्रत्येकी 50 शिंदीचे पाकिटे प्रति पाकीट एक लिटर प्रमाणे असे एकूण 850 लिटर शिंदी प्रति लिटर 50/- रुपये प्रमाणे 42,500/-रुपयाचा मुद्देमाल
(5) खुलासा - मा पोलीस निरीक्षक श्री मारकड साहेब यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोहेका 2401 नामदेव कोटु जाधव , पोका 527 चंद्रकांत गोविंदराव आरकिलवार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी मा पो नि साहेब यांचे आदेशाने रेड केली असता तेथे वर नमूद आरोपितानी विनापरवाना बेकायदेशीर रित्या शिंदीचे 17 पोत्यात 850 लिटर शिंदी किमती 42,500/- रुपये चा माल ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेऊन जाण्याच्या तयारीत असताना मिळून आले.
(6) तपास- पोहैका 2401 नामदेव कोटू जाधव
(7) सापळा पथक - पोहैका 2401 नामदेव कोटू जाधव , पोका 527 चंद्रकांत गोविंदराव आरकिलवार

12 July 2024

नांदेड येथे होणा-या निर्धार मेळव्याला हजारो च्या संख्येने उपस्थित रहा:-.पंडित वाघमारे

भोकर (प्रतिनिधी)
डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेने च्या वतीने नांदेड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आव्हाहन जिल्हाध्यक्ष मा.पंडित वाघमारे यानी भोकर येथील बैठकीत केले आहे*.
            भोकर येथील विश्रामगृहात डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने ११ जुलै रोजी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जेष्ठ पत्रकार उतम बाबळे , जेष्ठ कार्यकर्ते के.वाय.देवकांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर ,जिल्हाउपाध्यक्ष परमेश्वर वाघमारे, जेष्ठ कार्यकर्ते सखाराम वाघमारे, विलास झिंजोरे, छायाताई मोरे, जयश्रीताई पोतरे, तालुकाध्यक्ष संतोष झुंजारे, मुकुंद गुरलेकर, परसराम कंरदिकर, गंगाधर करंदीकर, भास्कर वाघमारे,राम बोईवार, शंकर दिवटेकर,गोविंद मनपुर्वे 
आदी उपस्थित होते.
      पुढे बोलताना वाघमारे म्हणाले नांदेड येथे होत असलेला हा निर्धार मेळावा डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या कुंठूबांचा सन्मान वाढवणारा सोहळा असुन त्यांचे वंशज आदरणीय, सचिनभाऊ साठे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी निर्धार करण्यासाठीचा हा मेळावा असुन त्याचबरोबर मातंग समाजाची एकजुट दाखविण्यासाठी आपल्याला निर्धार करायचा आहे.म्हणून खेड्या पाड्यातला समाज आता अण्णाभाऊ च्या कुंटुंबासोबत आहे हे सिद्ध करण्यासाठीचा हा एक ऐतिहासिक निर्धार मेळावा असुन त्या मेळव्याला भोकर तालुक्यातुन हजारोच्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आव्हान शेवठी जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी केले आहे.
      या वेळेस जेष्ठ पत्रकार उत्तम बाबळे, जेष्ठ कार्यकर्ते के.वाय.देवकांबळ, परमेश्वर वाघमारे, संजय वाघमारे बोथीकर, सखाराम वाघमारे आदीची मनोगत झाली. संतोष झुंजारे , रामा बोयावार,साहेबराव बनसोडे , गोविंद मनपुर्वे , अदींनी परिश्रम घेतले असून मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

09 July 2024

कर्तव्यदक्ष अधिकारी पीएसआय दिगंबर पाटील यांचा वाढदिवस साजरा-

भोकर- पोलीस स्टेशन येथे सेवा बजावून.
आता मानवत जिल्हा परभणी येथे सेवा बजावत आहे.
आमचे मित्र व बंधू
कर्तव्यदक्ष अधिकारी पीएसआय PSI दिगंबर पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार विशाल भाऊ जाधव हे आज मानवत पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांना शुभेच्छा दिले.

डॉ आण्णाभाऊ साठे क्रांती सेना नांदेड जिल्हा कमिटी च्या वतीने मा. श्री रामचंद्रजी भरांडे साहेब यांच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात आला.

*लोकस्वराज्य आंदोलन या संघटने चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री रामचंद्र भरांडे साहेब* *ह्यांनी मातंग समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर अनेकदा आंदोलन उपोषण करण्यात आले असुन पण या भ्रष्टरंगीण सरकारला जाग येत नाही या झोपीचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागी करण्यासाठी मातंग समाजाच्या उन्नतीसाठी अनुसूचित जाती अ.ब.क.ड. वर्गीकरण, गायरान पट्टे व इतर आशा वेग वेगळ्या विषयास अनुसरून बेमुदत आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय समोर ०१ जुलै पासून सुरुवात झाली दि. ०९/०७/२०२४ रोजी*
*डॉ.आण्णाभाऊ साठे क्रांती सेना नांदेड जिल्हा कमिटी च्या वतीने मा. श्री रामचंद्रजी भरांडे साहेब यांची भेट घेऊन उपोषणास जाहीर पाठिंबा दिला.*.🛑"""""""""""""""""""""""""""""""🛑

प्रा.रामचंद्र भरांडेंच्या उपोषणास अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनसह आदी सामाजिक संघटनांचा पाठिंबा

प्रा.रामचंद्र भरांडेंच्या उपोषणास अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनसह आदी सामाजिक संघटनांचा पाठिंबा 

तर खासदार वसंतराव चव्हाण यांनी उपोषणार्थींना दिली भेट व याविषयी मुख्यमंत्र्यांना देणार लेखीपत्र 

प्रतिनिधी 

नांदेड : अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ,ब,क,ड असे वर्गीकरण मंजुर करण्यात यावे व यांसह विविध सामाजिक प्रलंबित प्रश्नांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.१ जुलै पासून लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेचे संस्थापक नेते प्रा. रामचंद्र भरांडे यांनी अमरण उपोषण केले आहे.सदरील उपोषणास अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन या सामाजिक संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला असून राज्य सरकारने या उपोषणाची दखल घेऊन प्रस्तावित मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात असे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.तर काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट दिली असून याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधीपक्षनेते विजयकुमार वडेट्टीवार यांना लेखीपत्र पाठविणार आहे,असे उपोषणार्थींना आश्वस्त केले आहे.

लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ,ब,क,ड असे वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे, गायरान जमिन कास्तकारांच्या नावे विना अट करण्यात यावी,दलित मागासर्गीय वस्तीमधील अनाधिकृत अवैध देशी विदेशी दारु विक्री त्वरित बंद करण्यात यावी, महाराष्ट्र राज्यात वाढलेल्या दलित,मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय अत्याचार प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यरत असलेल्या शासकिय वसतीगृहामध्ये अनुसूचित जातीच्या कोणत्याही एका जातीच्या विद्यार्थ्यांना ३०% पेक्षा जास्त जागा देवू नयेत, असा स्पष्ट उल्लेख दि.१६ मे १९८४ च्या शासन निर्णयामध्ये असून सुध्दा प्रत्यक्षात मात्र वसतिगृह प्रक्रिया राबवतांना शासन सदर निर्णयाचे पालन केले जात नाही.त्यामुळे अनु.जाती या प्रवर्गातील कांही मोजक्या जाती वगळता इतर जातींच्या विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशापासून वंचित ठेवल्या जाते असे होऊ नये.यासह विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांसाठी दि.१ जुलै २०२४ रोजी पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरु केले आहे.

सदरील उपोषणास ८ दिवस झाले आहेत,परंतू राज्य शासन,शासन प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी याची दखल घेतली नसल्याने सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांतून रोष व्यक्त होत आहे.याच अनुषंगाने अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेसह मास,अण्णा भाऊ साठे क्रांती सेना,लोकस्वराज्य आंदोलन व विविध सामाजिक संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रा.रामचंद्र भरांडे यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच उपोषणार्थींच्या प्रस्तावित व प्रलंबित मागण्या राज्य सरकारने तात्काळ मंजूर कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दि.८ जुलै २०२४ रोजी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधितांना पाठविण्यात आले आहे.

सदरील निवेदन सामाजिक संघटनांच्या एका जम्बो शिष्टमंडळाने पाठविले असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरील विषयाच्या अनुषंगाने म्हटले आहे की, आपणास महाराष्ट्र शासनाचे प्रमुख म्हणून विनंती करतोत की,अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या १३ टक्के आरक्षणाचा प्रचलित वाटप पध्दतीनेमुळे व विविध कारणांनी शैक्षणिक,सामाजिक,आर्थिकदृष्टया मागास राहिलेल्या मातंग व तत्सम जातींना प्रत्यक्षात काहीच लाम झालेला नाही,त्यामुळे राज्यातील मातंग समाज व तत्सम वंचित जातीना या संविधानात्मक आरक्षणाचा प्रत्यक्षात लाभ मिळवा यासाठी अनुसुचित जाती आरक्षणाचे अ,ब,क,ड असे वर्गीकरण तात्काळ मंजूर करावे आणि फुले-शाहू-डॉ.आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यात "सामाजिक न्याय" प्रदान करावा,अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासुन आम्ही करीत आहोत.यासह काही महत्वाच्या व जिव्हाळयाच्या मागण्या घेऊन, लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख प्रा.रामचंद्र भरांडे यांनी "नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.१ जुलै २०२४ रोजी पासून अमरण उपोषण करीत आहेत,या प्राणांतिक उपोषणाचा ८ दिवस झाले आहेत.प्रा.भरांडे हे शुगर पेशेंट आहेत,त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे,तरीही,महाराष्ट्र शासनाचा कोणताही मंत्री किंवा प्रतिनीधी यांनी आजपावेतो भेट देऊन चर्चा केलेली नाही,या प्राणांतिक आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे नांदेड जिल्हयातील व महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज व तत्सम वंचित जात समुहाच्या वतीने प्रा.भरांडे व त्यांचे सहकारी करीत असलेल्या या अमरण उपोषणास आणि केलेल्या मागण्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत.तसेच पुनश्च आपल्या सरकारला आग्रहाची विनंती करीत आहोत की, अनुसूचित जाती आरक्षणाचे अ,ब,क,ड असे वर्गीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायीक आयोग निर्माण करावा व राज्य सरकारने घोषित केलेल्या डॉ.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र (आर्टी) चे कार्यालय,मुंबई,पुणे किंवा औरंगाबाद येथे आवश्यक त्या निधीच्या उपलब्धतेसह
तात्काळ क्रियान्वीत करण्यात यावे.उपरोक्त जिव्हाळयाच्या मागण्या बाबत शासनाचे सकारात्मक व कृतीशिल असे पावले उचलावीत आणि मागण्या मंजूर कराव्यात अन्यवा महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, याची आपण व आपल्या सरकारने नोंद घ्यावी.असे नमुद केले असून या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष सतिश कावडे, माजी आमदार अविनाश घाटे,प्रदेशाध्यक्ष उत्तम बाबळे, प्रदेश उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, प्रदेश सचिव शिवाजी नुरुंदे,एन.डी.रोडे, रमेश सुर्यवंशी,जिल्हाध्यक्ष रमेश सुर्यवंशी,जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल घाटे,जिल्हा संघटक नागेश तादलापूरकर,जिल्हा समन्वयक आनंद वंजारे, मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत तादलापूरकर,निलेश तादलापूरकर व प्रदिप वाघमारे,परमेश्वर बोयवारे,कॉ.डी. एन.घायाळे यांसह आदी सामाजिक संघटनांचा पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

खासदार वसंतराव चव्हाण यांनी उपोषणार्थींना दिली भेट व याविषयी मुख्यमंत्र्यांना देणार लेखीपत्र 

नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी दि.८ जुलै २०२४ रोजी प्रा.रामचंद्र भरांडे व त्यांचे सहकारी करत असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली.उपोषणार्थींशी व उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांनी प्रस्तावित आणि प्रलंबित मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली.तसेच सदरील मागण्यांविषयी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संबंधितांना एक लेखी पत्र लिहणार आहे.याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही पत्र लिहून सभागृहात प्रश्न मांडावा अशी विनंती करणार आहे असे आश्वासन दिले असून उपोषणास ही पाठिंबा दिला आहे.यावेळी,सतिश कावडे,गणेश तादलापूरकर,परमेश्वर बंडेवार,प्रितम गवाले,कॉम्रेड गंगाधर गायकवाड,प्रा.डॉ.विठ्ठल भंडारे, दयानंद बसवंते,भारत खडसे,शिवाजी नुरुंदे,यांसह बहुसंख्य सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

08 July 2024

ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस भोकर येते साजरा

भोकर प्रतिनिधी:तालुका प्रतिनिधी 

   गोल्ला गोल्लेवार यादव समाजाचे प्रदेशाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस दि.७ जुलै २०२४ रोजी भोकर शहरातील गणराज रिसॉर्ट येथे विविध उपक्रमांनी अतिशय उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात आला.
   यावेळी गोल्ला गोल्लेवार समाजाचे कुलदैवत भगवान श्रीकृष्ण यांचे विधिवत पूजन करण्यात आले.तदनंतर राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केक कापून वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर ओबीसी चळवळीतील रामेश्वर गौड महाराज बारडकर,प्रगतशील शेतकरी मारोती वागदकर आदींची उपस्थिती होती.
    या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा फाईल फोल्डर भेटवस्तू देऊन यथोचित्त सन्मान करण्यात आला तसेच भोकर तालुक्यातील ६७ गावातील गरजू,गरीब, अल्प-भूधारक प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांना एकूण ७०० चार्जिंग बॅटरीचे वाटप  करण्यात आले.त्यानंतर नांदेड भोकर रोडच्या दुतर्फा वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संबंध नांदेड जिल्ह्यातील त्यांचे हितचिंतक,मित्रपरिवार व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना उदंड आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
   या कार्यक्रमास भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती बालाजी शानमवाड, संचालक उज्वल केसराळे, रामचंद्र मुसळे, सतीश देशमुख, कृष्णा वागतकर, मारोती अंगरवार, मोहन राठोड, शिवसेना उ.बा.टा.गटाचे तालुकाप्रमुख संतोष आल्लेवार, माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड, प्रहार तालुकाध्यक्ष अॅड.शेखर कुंटे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष ॲड. शिवाजी कदम, किसान एकता संघाचे मराठवाडा अध्यक्ष प्रतापराव कल्याणकर,माजी उपनगराध्यक्ष मुदखेड संजय आऊलवार,मारोती बल्लाळकर आदींसह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन,ग्रा.पं.सदस्य व शेतकरी बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या वेळी आपले  
राष्ट्रीय पुरोगामीचे मराठवाडा महासचिव व तसेच अंबुज प्रहार संपादक श्रीमान उत्तमरावजी बाबळे
ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड 
यांनी राबवित असलेल्या विविध 

सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून 
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष राहुल कदम. विशाल जाधव. साईनाथ बंडोड. अंबादास बोयावार.
पत्रकार संघातर्फे त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांनी मित्रमंडळीतर्फे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांना मनापासून धन्यवाद दिले व तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव,शेतकरी वर्ग व विविध संघटनाचे पदाधिकारी,हितचिंतक,मित्रमंडळी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
   या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अंबादास आटपलवाड गुरुजी यांनी केले तर प्रस्तावना पंडित तोटेवाड सर यांनी केली.शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

07 July 2024

भारतीय स्टेट बँकेच्या फ्राॅड एस एम एस यामुळे अनेक नागरिक परेशान व मोबाईल हॅक

सोशल मीडियाच्या युगात इंटरनेटचा मोठा वापर होत आहे आपल्या फोनवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया रीवाॅड्र पॉईंट मिळवा कालपासून सर्वांच्या मोबाईलवर एसएमएस येत आहे जर आपण लिंक ओपन केल्यास त्या व्यक्तीचा फोन हॅक होण्याचे प्रकार आज भोकर तालुक्यातील धावरी तांडा दोन व्यक्तीचा फोन हॅक झाला दिसून येत आहे येथे आज त्या व्यक्तीच्या मोबाईल हाक करून तो माणूस आपल्या मोबाईल वरती सर्व ग्रुप वरती टाकून सर्वांना नागरिकांना करत आहे ते आप लिंक ओपन करू नका भोकर तालुक्यातील दोन-तीन जनाच्या नंबर हॅक करुन दुसऱ्यांना न ग्रुप वरती ती मेसेज येत आहे हे मेसेज मोठ्या प्रमाणात वाढलेला याबाबतीत भारतीय स्टेट बँक ऑफ सायबर सेल्स यांनी नागरिकांची गैरसोय तात्काळ दूर करावी आणि धावरी तांडातील काही नागरिकांची मोबाईल फोन हॅक झालेला आहे आणि आज झालेला मोबाईल हॅक झालेल्या मोबाईल वरून अनेक व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज टाकत आहे काही व्हाट्सअप ग्रुप दिसून येत आहे भारतीय स्टेट बँकेचे लोगो असेल मेसेज येत आहे