भोकर (प्रतिनिधी)
डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेने च्या वतीने नांदेड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आव्हाहन जिल्हाध्यक्ष मा.पंडित वाघमारे यानी भोकर येथील बैठकीत केले आहे*.
भोकर येथील विश्रामगृहात डॉ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने ११ जुलै रोजी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जेष्ठ पत्रकार उतम बाबळे , जेष्ठ कार्यकर्ते के.वाय.देवकांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय वाघमारे बोथीकर ,जिल्हाउपाध्यक्ष परमेश्वर वाघमारे, जेष्ठ कार्यकर्ते सखाराम वाघमारे, विलास झिंजोरे, छायाताई मोरे, जयश्रीताई पोतरे, तालुकाध्यक्ष संतोष झुंजारे, मुकुंद गुरलेकर, परसराम कंरदिकर, गंगाधर करंदीकर, भास्कर वाघमारे,राम बोईवार, शंकर दिवटेकर,गोविंद मनपुर्वे
आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना वाघमारे म्हणाले नांदेड येथे होत असलेला हा निर्धार मेळावा डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या कुंठूबांचा सन्मान वाढवणारा सोहळा असुन त्यांचे वंशज आदरणीय, सचिनभाऊ साठे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी निर्धार करण्यासाठीचा हा मेळावा असुन त्याचबरोबर मातंग समाजाची एकजुट दाखविण्यासाठी आपल्याला निर्धार करायचा आहे.म्हणून खेड्या पाड्यातला समाज आता अण्णाभाऊ च्या कुंटुंबासोबत आहे हे सिद्ध करण्यासाठीचा हा एक ऐतिहासिक निर्धार मेळावा असुन त्या मेळव्याला भोकर तालुक्यातुन हजारोच्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आव्हान शेवठी जिल्हाध्यक्ष वाघमारे यांनी केले आहे.
या वेळेस जेष्ठ पत्रकार उत्तम बाबळे, जेष्ठ कार्यकर्ते के.वाय.देवकांबळ, परमेश्वर वाघमारे, संजय वाघमारे बोथीकर, सखाराम वाघमारे आदीची मनोगत झाली. संतोष झुंजारे , रामा बोयावार,साहेबराव बनसोडे , गोविंद मनपुर्वे , अदींनी परिश्रम घेतले असून मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.







0 comments:
Post a Comment