जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

23 July 2024

म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव जवळील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी

धडक; चार ठार, एक गंभीर जखमी 

भोकर :प्रतिनिधी 
येथील म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव जवळील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. मयतातील दोघे मातुळ येथील आश्रमशाळेचे कर्मचारी होते. 
        भोकर ते म्हैसा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर दुचाकी (क्र. एम एच २६ सीके ६६५९) व दुचाकी (क्र.एम एच २६ सीएफ ९६१८) या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंगाधर विश्वनाथ म्हैसूरे (वय ५५, रा. शिळवणी ता. देगलूर. ह मु. भोकर), तर मदतनीस पदावरील परसराम किशन डाकोरे (वय ५०, रा. पांडुरणा ता. भोकर) हे दोघे कै. व्यंकटराव देशमुख निवासी आश्रमशाळा मातुळ येथे मदतनीस व कामाठी पदावर कार्यरत होते. तर ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड (वय २५, रा. नांदा बु. ) विनायक पोशट्टी बोरवाड (वय २३, रा. नांदा बु. ) या चौघांचा मृत्यू झाला असुन  श्रावण हनुमंत पेडेमोडे (वय २३, रा. कुंभरगाव ता. बिलोली) हा  गंभीर जखमी झाल्याने, त्यांचेवर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच ग्रामीण रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. सदरचे वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

0 comments:

Post a Comment