जशी आहे बातमी तसीच

एक्सप्रेस न्युज लाईव्ह च्या अधिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube वरील EXPRESS NEWS LIVE च्या CHANNEL ला SUBSCRIBE करा आपल्या भागातील बातम्या पाठवा आमच्या ईमेल वर expressnewslive123@gmail.com बातमी वाचण्यासाठी http://livenews143.blogspot.com भेट द्या ... धन्यवाद WELCOME TO MY NEWS BLOG SUBSCRIBE MY YouTube CHANNEL"Express NEWS live"

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

30 January 2023

बिलोलीत जि.प्र.हा.चा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन उत्साहात पार पडला.

देशसेवा करणाऱ्या जवान माजी विद्यार्थी प्रदीप गादगे यांचा सन्मान करण्यात आले.
बिलोली:शहरातील पूर्वी  नामांकीत समजल्या जाणाऱ्या  जिल्हा परिषद हायस्कूल मधील १९९५- ९६ इयत्ता  दहावीच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनीचा २९ जानेवारी रोजी स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले होते या संमेलनास मुंबई ,हैद्राबादसह विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती  हा सोहळा दोन सत्रात पारपडला पहिले सत्र जि.प.हा येथे माजी शिक्षक वृंद यांचा सन्मान करण्यात आला तद्नंर आनंद गार्डन येथे सुगम संगीताचा संगीतमय वातावरणात मित्रांच्या जुन्या आठवणीचा उजाळा मिळाला आहे. 
त्या काळी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या  जिल्हा परिषद हास्कूल मधून अनेक विद्यार्थी उच्च पदावर यशस्वी झाले आहेत.या हास्कूल मधील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या माध्यमिक शालेय जीवनातल्या आठवणीला उजाळा मिळावा म्हणून  गेल्या तिन महिन्यापासून या स्नेह मिलन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती प्रथमतःशालेय इमारती समोर माजी शिक्षक वर्ग व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी नेहमीप्रमाणे  रांगेत उभेराहून प्रार्थना घेण्यात आली मग एका रांगेत वर्ग प्रवेश करून तद्नंतर शालेय सभागृहात छोट्याखानी सत्काराचा कार्यक्रम पारपडला .
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीचे दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचे दुःखत निधन झाले होते यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करण्यात आले.या वेळी माजी शिक्षक  गुरूवृंद मा.श्यामसुंदर जोशी ,अमृत गवलवाड,शेख मैनोद्दीन,देवकरे सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी जेष्ठ शिक्षक शामराव जोशी सर व अमृत गवलवाड यांनी यावेळी सखोल मार्गदर्शन केले.तद्नंतर उच्च पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी  प्रदीप गादगे-बी.एस. एफ जवान जम्मू कश्मीर ,अमित बिलोलीकर-डिप्टी जनरल मॕनेजर भारत पेट्रोलियम भारत सरकार,उमेश पाठक -एच.ओ.डी साइंटिस्ट हैद्राबाद,अरविंद आंचोले अभियंता DGM मुंबई  यांचा गौरव करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी अमित बिलोलीकर,उमेश पाठक,यासीन ईनामदार आदिनी आपले सखोल मनोगत व्यक्त केले तर यावेळी माजी विद्यार्थिनी मेघा धानोरकर(पाटकर),विद्या बासठवार,दुर्गा येरावार,संगीता देवगावे,ललिता पाटील, सविता पांचाळ ची प्रमुख उपस्थित होती.मग दुपारच्या सत्रात आनंद गार्डन येथे भोजन व संगीतमय वातावरणात  अल्प परीचय व जुन्या आठवणीचा उजाळा झाला,यावेळी 1995-96 माजी विद्यार्थी व विद्यार्थीनीसह आदिची प्रमुख  उपस्थित होती सन 1995-96 बैच स्नेह संमेलन घडवून आणणाऱ्या सर्व मित्र खुप आनंदित होते ज्यांची भेट अशक्य होती समोरून गेले तरी आपण एकमेकांना ओळखु न शकणारे आपले मित्र व मैत्रीना आपन आज साक्षात समोरा समोर भेटून  त्यांंंच्या आनंदाची सीमा नव्हती यावेळी माजी विद्यार्थी हे आनंदमय होते .ह्या आनंदमय कार्यक्रमाचे आयोजन हेमंत कुंचनवार, दिलीप उत्तरवाड,नरसिंग गोविंदवार, लक्ष्मण शेट्टीवार यासीन ईनामदार,माधव एडके , शैलेश पाटील चिंचाळकर, गणेश पवार,माधव चंचलवाड,  शंकर जिंकलवार,बासित खान, शेख फारुख,तजमुल बेग,जाफर बेग,प्रदीप डीललोड,श्रीनिवास ऐंबडवाड, मुजू बेग आदिनि केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शैलेश पाटील यांनी केले तर आभार शेख फारूख अहमद यांनी  मानले आहे.

उमरी पोलीस स्टेशनच्या भिंतीही देतात स्वातंत्र्यासाठी केलेल्या हल्ल्याची साक्ष

 ▪️निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी उमरी बँक, पोलीस स्टेशन हल्ल्याच्या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण

नांदेड  :- भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामशाहीमुळे पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला मुक्तीसाठी जे आंदोलन करावे लागले त्यात उमरी येथील ऐतिहासिक संदर्भही अधिक महत्त्वाचे आहेत. येथील हैद्राबाद स्टेट बँक,पोलीस स्टेशनवरील हल्ला, रेल्वे रूळ उखडून टाकणे याला आज 30 जानेवारी रोजी बरोबर 75 वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या बँकेवर हल्ला झाला ती बँक खाजगी जागेत असल्याने आज त्या जागेचे स्वरूप बदलले आहे. मात्र निजामाच्या पोलीसाची ज्या पोलीस चौकीवर हल्ला झाला ती इमारत आज त्या काळातील हैद्राबाद मुक्तीच्या आठवणी आपल्या प्रत्येक शिळेवर घेऊन उभी आहे. या उमरी पोलीस स्टेशनच्या भिंती त्या काळातील तिजोरीसह मुक्तीच्या या लढ्याला पुढच्या पिढीसाठी वाहते करण्यास सज्ज आहेत.
पोलीस विभागाने हे पोलीस स्टेशन आहे त्या स्थितीत आजवर व्यवस्थीत जपले असून ऐतिहासिक साक्षीसह उमरीतील शांतता व सुव्यवस्थेसाठी येथून कामकाज पाहिले जाते. दि. 30 जानेवारी 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्तीसाठी हा हल्ला व बँकेची लूट करण्यात आली. हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदार म्हणजेच 29 जानेवारी रोजी उमरखेडचे स्वातंत्र्य सैनिक देवसरी या गावी जमले. चार गटात विभागालेल्या या स्वातंत्र्य सैनिकांनी 30 जानेवारी रोजी हल्ला करून निजामाला धास्तावून सोडले. रेल्वेचे रूळ व तारा तोडण्यासाठी बारडचे राजाराम देशमुख, थेरबनचे अमृतराव व 35 सैनिक रवाना झाले. नागनाथ परांजपे यांच्या नेतृत्वाखाली 15 जणांच्या तुकडीने पोलीस स्टेशनवर हल्ल्यासाठी धाव घेतली. यात लहानचे भिमराव देशमुख व इतर मंडळी होती. रेल्वे स्टेशनवर हल्ल्यासाठी उमरीचे मोहन शर्मा, जगदीश, बाबुराव कुटूंरकर व इतर मंडळी होती.
उमरीच्या मोंढ्यातील हैद्राबाद स्टेट बँकेच्या शाखेवर 21 जणांच्या तुकडीने हल्ला केला. यात अनंत भालेराव, आबासाहेब लहानकर, साहेबराव देशमुख-बारडकर, बन्सीलाल तोष्णीवाल, किशोर शहाणे, दिंगबरराव उत्तरवार, शंकरलाल शर्मा, बन्सीलाल मालाणी, धनराज पुरोहित, रघुनाथ पंडीत, काशिनाथ शेट्टी हे स्थानिक उमरीचे कार्यकर्ते होते. सायंकाळी 4.30 वा. तीनही ठिकाणी हे मुक्तीसाठी हल्ले करण्यात आले.

काळ झपाट्याने पुढे जरी गेला असला तरी इतिहासातील अखंड भारताच्या व स्वातंत्र्याच्या लढ्यातील हे ऐतिहासिक संदर्भ नव्या पिढीपर्यंत पोहचणे तेवढेच महत्वाचे आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासमवेत मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव आता सुरू असून शासनाने यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

▪️“मराठवाडा मुक्तीची ही गाथा नव्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यादृष्टिने लवकरच उमरी आणि बारड येथे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांना नव्या पिढीसमवेत आम्ही संवाद घडवून आणत आहोत.”
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

▪️“उमरी पोलीस स्टेशन आज ज्या वास्तुत आहे त्या वास्तुचा ऐतिहासिक संदर्भ लाखमोलाचा आहे. पोलीस प्रशासनाच्यावतीने आम्ही ही जागा आहे त्या स्थितीत आजवर त्याच इमारतीतून शांतता व सुव्यवस्थेसाठी सांभाळून ठेवली आहे. या इतिहासाला प्रवाहित करण्यासाठी प्रयत्नरत राहू”
- जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

बिलोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रेचा आज समारोप समारंभ संपन्न

प्रतिनिधी: शुभम निदाने 
बिलोली:काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. आज या यात्रेचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त बिलोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील पक्ष कार्यालया समोर राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व महामानव मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.       तसेच 
बिलोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री भिमरावजी जेठे व कुंडलवाडी न.प.चे माजी नगरसेवक मुखत्यार पटेल  यांची काँग्रेस पक्षाच्या पक्षनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्यांचा बिलोली ता.व शहर काँग्रेस कमिटी,युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने यथोचित असा सन्मान करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी,आनंदराव पाटील बिराजदार,हाजप्पा पाटील सुंकलोड,अनुप अंकोशकर,नागनाथ तुम्मोड, शंकर यंकम, दिलीप पाटील पांढरे, अहमद चाऊस, नितीन देशमुख,जावेद कुरेशी,वल्लीओदीन फारूखी, सुलेमान शेख, प्रकाश  पोवाडे,या.सरपंच प्रल्हाद निदाने, मुन्ना पोवाडे, लक्ष्मण शेटीवार,माधव जाधव,नवाब शेख, संदीप कटारे,शुभम झेंडे,केशव रानवळकर,सयाराम निदाने,धिरज चौहाण, श्रीनिवास पाटील शिंदे, शिवाजी गायकवाड, मारोती लांडगे, तसेच माजी नगरसेवक,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्येकर्ते यांची उपस्थीती होती..

तेलंगणा मंत्र्यांच्या भेटीगाठी वाढल्या

नांदेड: भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची दि. ५ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे सभा आयोजित करण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर मागच्या चार दिवसापासून वीआरएस पक्षाचे पदाधिकारी, तसेच तेलंगाणाच्या मंत्र्यांनी सभेच्या अनुषंगाने नांदेडला भेटी-गाठी वाढवल्याचे दिसत आहे. शनिवारीच एका शिष्टमंडळाने सभास्थळाची पाहणी केल्यानंतर रविवारी तेलंगणाचे वन व कायदा मंत्री ए.इंद्रकरण यांनीही नांदेडला भेट देवून तयारीचा आढावा घेतला.

भारत राष्ट्र समिती (वीआरएस) हा पक्ष आता तेलंगणाबाहेर विस्तार करीत आहे. देशभरात पक्ष वाढीसाठी पदाधिकारी विविध ठिकाणी मुख्यमंत्री केसीआर यांच्या सभेचे नियोजन करण्यात येत असून, महाराष्ट्रात केसीआर यांची पहिली सभा नांदेडमध्ये होणार आहे. या सभेत महाराष्ट्रातील कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वीआरएस च्या एका शिष्टमंडळाने सभास्थळाची पहाणी केली होती. त्यानंतर रविवार दि. २९ रोजी तेलंगणा राज्याचे वनमंत्री व कायदामंत्री ए. इंद्रकरण रेड्डी हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रथम पवित्र सचखंड गुरुद्वाराला भेट देवून दर्शन घेतले. त्यानंतर सभास्थळाची पाहणी करून, कार्यकत्यांकडून आढावा घेतला आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कार्यकत्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये प्रवेश घ्यावा व उज्वल भारत निर्माण करण्यासाठी केसीआर यांचे हात वळकट करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

29 January 2023

देगलूर मधील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी पांच आरोपी अटकेत ; भाचाच निघाला मुख्य आरोपी

देगलूर:मधील उदगीर रोडवरील शास्त्रीनगर मध्ये राहणारे मूळ येडूर ता. देगलूर येथील श्रीपतराव पाटील यांच्या घरी दि. 23 रोजी दरोडा टाकून त्यांच्या पत्नीसह त्यांना कपड्याने बांधून चोरट्यानी घरातील जवळपास चार लाखाचा ऐवज लुटून पोबारा केला होता. त्यानंतर चोरट्यांनी श्रीपत पाटील यांची वृद्ध पत्नी चंद्रकलाबाई पाटील या महिलेची हत्या केली होती त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.या घटनेनंतर समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ ऊठला होता त्यावरून पोलिसांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले होते. दरोडेच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके तयार करून त्यांना कर्नाटक, तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध भागात शोधकार्यात लावल्यानंतर पोलिसांनी देगलूर, मरखेल, करडखेड, मुक्रमाबाद, तसेच कर्नाटक राज्यातील वडगाव, औराद, संतपूर येथील 96 तासांचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासून तांत्रिक बाबीच्या आधारे आरोपीचा शोध काढला.यात मुख्य आरोपी असणारा मयत चंद्रकलाबाई पाटील यांचा भाचा शहाजी मोरतळे यांनी इतर आरोपीशी संगनमत करून चंद्रकलाबाई पाटील व श्रीपत पाटील यांच्या घराची रेकी केल्याचे निष्पन्न झाले. देगलूर पोलिसांनी आरोपींना पुण्यातून ताब्यात घेतले असून त्यातील आरोपी विठ्ठल व्यंकट बोईनवाड रा. वसुर ता. मुखेड, बालाजी पंढरी सोनकांबळे रा. मंग्याळ ता. मुखेड, गौतम दशरथ शिंदे रा. वसुर ता. मुखेड, शेषेराव माधवराव बोईनवाड राहणार वसुर, ता. मुखेड व शहाजी श्रीराम मोरतुळे रा. मोरतळवाडी ता.उदगीर यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह मोबाईल जप्त केले आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वात देगलूरचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहायक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोहेकॉ सुर्यकांत मुंडे, गुंडेराव करले, पोलीस ठाणे मुखेड येथील पोलीस निरिक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरिक्षक भारत जाधव आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार, पोलीस ठाणे मरखेल येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक नामदेव मद्दे, पोहेकॉ बारी आणि यंगाले, पोलीस ठाणे मुक्रमाबाद येथील पोलीस उपनिरिक्षक वाघमारे, कागणे, पोलीस अंमलदार मरगेवार आणि शिंदे तसेच सायबर पोलीस विभागातील पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरिक्षक दळवी, पोलीस अंमलदार दिपक ओढणे, राजेश सिटीकर यांनी महत्त्वपूर्ण तांत्रिक मदत केली. देगलूर येथील पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे, श्रीकांत मोरे आणि पोलीस अंमलदार सुनिल पत्रे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्या आरोपींना ओळखले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे हे करीत आहेत.


26 January 2023

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते मुख्य शासकीय समारोहात ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 नांदेड  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
ध्वजारोहण व ध्वजवंदनानंतर शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या वीरपत्नी श्रीमती सुधा शिंदे यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्याकडून प्राप्त ताम्रपट व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याचबरोबर सुभेदार पोतगंते दत्ता मारुती यांना ऑपरेशन रक्षकमध्ये कर्तव्य बजावत असतेवेळी अपंगत्व प्राप्त झाले असल्यामुळे त्यांना ताम्रपट देण्यात आला. याचबरोबर ए. आर. पवार, फयाज यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील शिवेंद्रराज पाटील, अरुण लिंगदळे, अजित मुंढे, स्पर्श शिप्परकर, तन्वी कौठेकर, अदित्य मोग्गावार, निनाद बरडे, आर्यन पाटील, आरुष शेरीकर, वेदांत मोतेवार, श्लोक लढ्ढा, संचित बोरगावे, काव्या इंगळे, अश्मित कौशल्ये, मुकुंद भुतडा, प्रत्युशकुमार, महतो सर्वेश वाघमारे, सदाशीव केशराळे, सुघोष काब्दे, ओवी साधून, सार्थक पेठकर, श्रिया टेंभुर्णे, नंदकिशोर बसवदे, अनय पांडे, राजनंदिनी हिवराळे, ओमकार सैदमवार, जय पतंगे, कौस्तुभ देशपांडे, कौस्तुभ जाधव, प्रहर्ष चुंचूवार यांना शिष्यवृत्ती मिळाल्या निमित्त पुरस्कार वितरीत केले. यावेळी जिल्हा परिषद शाळा वडेपुरीच्या विद्यार्थ्यांनी सायबर अवेरनेसवर पथनाट्य सादर केले. सगरोळी येथील सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.    
यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संचलन करणाऱ्या पथकाचे पोलीस वाहनातून निरीक्षक केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनात केंद्रीय राखीव पोलीसबल, सशस्त्र पोलीस पथक, सशस्त्र महिला पोलीस पथक, वाहतुक पोलीस शाखा पथक, गृहरक्षक दलाचे पुरूष व महिला पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल पथक, राष्ट्रीय छात्रसेना, सैनिकी शाळा, स्काऊट पथक, स्टुडंट पोलीस कॅडेड, पोलीस बॅन्ड पथक, डॉग स्काड,मार्क्स मॅन वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वज्र वाहन, बुलेट रायडर, आपदा मित्र, मिनी रेस्क्यू फायर टेंडर, कृषि विभाग चित्ररथ, पोलीस विभाग मोटर सायकल पेट्रोलींग या प्लाटूनी पथसंचलनात सहभाग घेतला.  

नांदेडमधील संजय बियाणी हत्याकांड प्रकरणी NIA च्या पथकाला मोठे यश

गेल्या 5 एप्रिल रोजी नांदेड मध्ये संजय बियाणी यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे.

नांदेड:बियाणी हत्याकांडातील 15 आरोपींना नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. एका अल्पवयीन शुटरला दिल्ली पोलिसांनी गुजरात मधून अटक केली होती. आता दूसऱ्याला शुटरलादेखील अटक करण्यात आली. दरम्यान, दीपक रांगा याच्या ओळख परेडसाठी नांदेड पोलिसांचे एक पथक पंजाबमध्ये दाखल झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. बियाणी हत्याकांडात थेट रिंदाचा सहभाग असल्याने शिवाय दोन शूटर दहशतवादी गुन्ह्यात सहभागी असल्याने संजय बियाणी हत्याकांडाचा तपास देखील आता राष्ट्रीय तपास यंत्रनेकडे जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022 रोजी दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. संजय बियाणी यांच्या शारदा नगर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर दबा धरून बसलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या झालेल्या हत्येनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला होता. तसंच बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.संजय बियाणी हे नाव नायगाव तालुक्यातील कोलंबी गावचे ते रहिवाशी होते. 10 वर्षापूर्वी संजय बियाणी नांदेडला स्थायिक झाले. सुरुवातीला त्यांनी स्थानिक केबल नेटवर्कमध्ये जाहिरात एजन्सी चालवली. नंतर त्यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि अल्पावधीतच ते मोठे व्यावसायिक झाले. जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते.


ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी विशेष मोहिम

नांदेड :- जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲपद्वारे पीक पेरा नोंदणी करावी. यासाठी 27 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हाभरात ई-पीक पेरा नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी तलाठी, कृषी सहायक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, स्वस्त धान्य दुकानदार, कोतवाल, शेतीमित्र, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे प्रतिनिधी अशा स्वयंसेवकांच्या सहकार्याने ई-पीक पेरा नोंदवण्याची मोहिम पार पाडण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपमध्ये ई-पीक पेरा अचूक नोंद करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी Real time crop data संकलित होण्याच्यादृष्टिने तसेच सदर डाटा / माहिती संकलन करतांना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप चालू करून त्यात पीक पाहणी नोंदवण्याची नवीन पद्धत शासनाने सुरू केली आहे. पात्र शेतकऱ्यांना विविध शेती विकासाच्या योजनांचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी, पीक कर्ज, पीक विमा नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात सुयोग्य शासकीय मदत मिळण्यासाठी ई-पीक पेरा नोंद गरजेचा आहे.

24 January 2023

देगलुर हादरले! देगलूरमध्ये मोठा दरोडा; वृद्ध महिलेला संपवलं, साडेबारा तोळे सोने, ७० तोळे वाळे लुटले

प्रतिनिधी: शुभम निदाने 
देगलूर:महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या लालबहादूर शास्त्रीनगर मधील एका वृद्ध जोडप्याच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी दोन्ही वृद्धांचे हातपाय बांधून जबरी चोरी करीत अंदाजे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या दरम्यान वृद्ध महिला मरण पावली. ही घटना सोमवारी रात्री साडे अकरा वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली.तालुक्यातील येडूर येथील श्रीपतराव पाटील (९०) व चंद्रकलाबाई (६०) हे दोघे मागील काही वर्षापासून देगलूर उदगीर या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या लाल बहादूर शास्त्रीनगर मध्ये एकत्र रहात होते. तीन-चार वर्षांपूर्वी चंद्रकला बाईच्या संपत्तीवरून त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता अशी चर्चा घटनास्थळी चर्चिली जात होती.सोमवार रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात तीन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन एका चोराने श्रीपतराव पाटील यांच्या तोंडावर पाय देऊन त्यांचे हातपाय बांधून चाकूचा धाक देत उभा राहिला. बाकीच्या दोन चोरांनी चंद्रकलाबाई आरडा ओरड करू नये म्हणून तिचे तोंड व पाय कापडाने बांधून लुटालूट करीत कपाटात ठेवलेले ५ तोळे सोन्याचे कडे, ७० तोळे चांदीचे वाळे काढून घेतले. नंतर चंद्रकलाबाईंच्या अंगावरील एका तोळ्याचे सोन्याचे मनी, दीड तोळ्याची बोरमाळ, ५ तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या असे एकूण साडेबारा तोळे सोन्याचे दागिने व ७० तोळ्याचे वाळे असा ३ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्यासह एलसीबीचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा व श्वान पथकास घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनेची इत्यंभूत माहिती घेऊन तपासासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या. घटनेलगत असलेल्या तरंग बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता घटनेदरम्यान त्यामध्ये वीस ते पंचवीस वयोगटातील तीन तरुण मुख्य रस्त्यावरून जात असल्याचे त्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.श्रीपतराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्याविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात कलम ३९७, ३०२, ३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृद्ध महिलेचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितले. ही घटना चोरी प्रकारावरून झाली की संपत्तीच्या वादातून झाली याचाही उलगडा आरोपीला पकडल्यानंतरच निष्पन्न होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी दिली.

23 January 2023

ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीवर शिक्का मोर्तब होताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेले प्रकाश आंबेडकर हे एकत्र आल्याने राज्यात एक मोठी राजकीय ताकद निर्माण झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

प्रतिनिधी : शुभम निदाने 
बिलोली : गेल्या काही महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होईल अशी चर्चा होती. आज अखेर मुंबईत या युतीवर शिक्का मोर्तब झाला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवन येथे पत्रकार परिषद घेत युती केल्याचे जाहीर केले आहे. 
राज्यातील या युतीवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असतांना बिलोलीमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.शहरातील युवासेना जिल्हा समन्वयक विपुल पटणे यांच्या युवासेना कार्यालयात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत हा आनंद साजरा केला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे, व्यंकट गुजरवाड तालुका संकटक, शिवकुमार बाबणे देगलूर बिलोली समन्वयक, युवासेना तालुकाप्रमुख माणिक पाटील हिवराळे, कुंडलवाडी शिवसेना शहर प्रमुख शंकर कोणेरवार, युवा सेना शहर प्रमुख कुंडलवाडी बंटी साठे ,बालाजी लष्करे विभाग प्रमुख लोहगाव, सदाशिव बोडके विभाग प्रमुख आरळी ,सुधाकर पाटील नरवाडे, आनंदराव पाटील हिवराळे युवासेना उपतालुकाप्रमुख, प्रशांत वानोळे उपतालुकाप्रमुख युवासेना, प्रल्हाद पाटील कदम शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख धम्मदीप गावंडे व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.. 

21 January 2023

भोकरच्या क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी : क्रीडा संकुलाच्या उभारणीचा लवकरच मुहूर्त

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश... 

भोकर ता प्रतिनिधी: अंबादास बोयावार 

भोकर : भोकर नगर परिषद स्थापनेसासून प्रलंबित असलेल्या क्रीडाप्रेमींच्या मागणीला माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून अखेर यश आले असून क्रीडा संकुलाच्या उभारणीचा लवकरच मुहूर्त निघणार आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर एस.मारावार यांनी याविषयी माहिती दिली असून सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरच्या माध्यमातून क्रीडा संकुल उभारणीच्या कामासाठी कंत्राटदारांनी आपल्या सामानाचा डेरा टाकण्यास सुरुवात केली आहे. 

भोकर व तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची वाढती संख्या,सोई,सुविधा,साधने,मैदान,अनुभवी प्रशिक्षक उपलब्धतेचा अभाव लक्षात घेता भोकर व तालुक्याचे नाव क्रीडा क्षेत्रात मोठे करणाऱ्या खेळाडूंना उपरोक्त बाबींसह क्रीडांगण आणि क्रीडासंकुल उपलब्ध करुन देणे खुप गरजेचे होते.त्यामुळे भोकर नगर परिषदेच्या स्थापनेपासून क्रीडा संकुल उभारणीची मागणी अनेक खेळाडू व क्रीडाप्रेमींतून होत होती.याच मागणीच्या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नगर परिषद स्थापनेच्या पहिल्या पर्वात क्रीडा संकुल मंजूर करुन घेतले होते.तसेच शहराबाहेरील मुदखेड रोड लगत सदरील क्रीडा संकुल उभारणीसाठी जागा निश्चित करण्यात आली होती.नव्हे तर त्या ठिकाणी उभारणीस्तव नारळ ही फुटले होते.परंतू ती जागा वादातीत निघाल्याने क्रीडा संकुल उभारणीला ग्रहण लागले.तेंव्हासांपासून विविध क्रीडा संघटना,खेळाडू, क्रीडाप्रेंमीची क्रीडा संकुल उभारणीसाठीची मागणी होती. तालुक्यातून विविध क्रीडा प्रकार,खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू तयार होत आहेत हे पाहता क्रीडा संकुल उपलब्धतेची नितांत गरज लक्षात घेऊन अखेर क्रीडा संकुलास मान्यता मिळाली असल्याने भोकर तालुक्यातील क्रीडापट्टूंना यासाठी आता अधिकची प्रतीक्षा करावी लागणार नाही.कारण क्रीडा संकुल उभारणीसाठीचा मुहूर्त लवकर निघणार आहे. 

सन २०२० मध्ये माझी मुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून भोकर येथे क्रीडा संकुल उभारणीसाठी आराखडा तयार करण्यात येऊन मंजूरीसाठी ठेवण्यात आला.पुढे जून २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी विपीन इटनकर,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर एस.मारावार,उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसिलदार भरत सुर्यवंशी यांसह आदी अधिकाऱ्यांनी भोकर शहरालगत असलेल्या किनवट रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूल परिसरातील मोकळ्या जागेत क्रीडा संकुल उभारणीसाठीची जागा निश्चित केली व त्यास मंजूरी ही मिळाली.जवळपास ४ एकर क्षेत्रावर ५ कोटी रुपये खर्चाचे हे क्रीडा संकुल उभारले जाणार असून यासाठी १ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरकडे वर्ग करण्यात आले आहेत,अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर एस.मारावार यांनी दिली आहे. 

तसेच सदरील क्रीडा संकुलात इमारत अंतर्गत व बाह्य क्रीडांगणांचा समावेश असून यात बॅटमिंटन हॉल,बास्केट बॉल,जिमनॅस्टिक,ज्यूदो कराटे,पॉवर लिफ्टींगसह बाह्य मैदानात २०० मिटरचा ट्रॅक यांसह आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सदरील क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी नुकतीच जागेची साफसफाई करण्यात आली असून कंत्राटदार बांधकाम साहित्य ठेवण्याचा डेरा उभारत आहे. 

तालुकास्तरावरील हे क्रीडा संकुल उत्तम दर्जाचे खेळाडू घडविल या दिशेने काम करु - तहसिलदार राजेश लांडगे 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांतून तालुकास्तरावर भव्य जागेत व मोठ्या निधीचे अद्यावत असे हे क्रीडा संकुल साकारत आहे.शहर व तालुक्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना या क्रीडा संकुलात सराव‌ करण्यासाठी सोयी,सुविधा,साधने व मैदान उपलब्ध होणार आहे.त्यामळे भोकर तालुक्यातील ग्रामीण खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात नवी दिशा मिळणार आहे.म्हणून सदरील क्रीडा संकुल उभारताना सर्व खेळाडू,क्रीडाप्रेमींसह आम्ही देखील लक्ष घालू व हे क्रीडा संकुल उत्तम दर्जाचे खेळाडू घडविल या दिशेने काम करु,असा विश्वास भोकर तहसिलचे तहसिलदार तथा क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अध्यक्ष राजेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. 

विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यावर उभारणी मुहूर्ताची शक्यता ? 

होऊ घातलेल्या राज्य विधान परिषद निवडणूक अनुषंगाने भोकर तालुका हा औरंगाबाद शिक्षक मतदार संघात येतो. त्यामुळे येथे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने भोकर येथील सदरील क्रीडा संकुलाच्या उभारणी शुभारंभास राजकीय,लोकप्रतिनिधींना उपस्थित राहता येणार नाही. परंतू प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते विकासात्मक कामांचा शुभारंभ करता येऊ शकते.असे असले तरी ज्यांच्या प्रयत्नांतून हे साकारणार आहे त्या लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणे अत्यावश्यक आहे.आणि आचारसंहितेमुळे त्यांच्या हस्ते भुमिपुजन होणे शक्य नसल्याने हा मुहूर्त थोडा पुढे ढकलला गेला आहे.तसेच भोकर पोलीस ठाण्याची भव्य इमारत व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवास संकुलाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून ते लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहे.सदरील लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते होणार असल्याचे चर्चील्या जात आहे.त्यामळे सदरील इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यासोबतच या क्रीडा संकुल उभारणीच्या कामाच्या शुभारंभाचा मुहूर्त ही निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.असो..अखेर क्रीडा संकुलाच्या उभारणीचा मुहूर्त लवकरच निघणार आहे,ही बातमी मात्र खेळाडू व क्रीडा प्रेमींसाठी दिलासादायक आणि आनंदाची आहे.

हाळदा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

भव्य रक्तदान शिबीर, किर्तन सोहळा, राजमुद्रा शाखेचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आले.
प्रतिनिधी: अंबादास बोयावार 
कंधार : राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता
रुग्णाला वाचवण्यासाठी रक्ताची अत्यंत गरज असते रक्त कुठलाही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही, त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे गरजेचे आहे. याच भूमिकेतून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व राजा भगीरथ यांच्या जयंती निमित्ताने कंधार तालुक्यातील हाळदा येथे राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्‍घाटन सकाळी 11 वाजता उस्मानगर चे सा.पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती साहेब,यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष हाळदा गावचे सरपंच हनमंतराव हाळदेकर हे होते.या शिबिरात दिवसभरात सुमारे 73 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा अनोखा संदेश दिला. यावेळी अनुसया गोविंद पाटिल शिंदे यांनी स्वत: येऊन रक्तदान केले आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या रक्तदान शिबिरासाठी नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग ब्लड बँक चे श्री सोनकांबळे साहेब व त्यांच सर्व स्टॉप चा देखील सत्कार करण्यात आला.या वेळी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व रक्तदाते आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
सायंकाळी 6.40 राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या शाखेचे अनावरण संस्थापक अध्यक्ष मा. सचिन पाटील इंगोले साहेब व प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद पाटील तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले.तर सायंकाळी 8 वाजता ह. भ. प. सौ आशाताई सुनील राऊत यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्वलन कंधार चे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात साहेब यांच्या शुभहस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.या वेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आले. कीर्तनकार सौ आशाताई सुनील राऊत लातूरकर यांचा किर्तन सोहळा पार पडला त्यावेळी आशाताईनी आपल्याला मॉसाहेब जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगिकारले पाहिजेत.माता भगिनींचे व देशसेवेसाठी सदा तत्पर असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.यावेळी गावातील व बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची उपस्थिती होती.वरील सर्व कार्यक्रमांना प्रसिद्ध कवी लेखक व्याख्याते डॉ. प्रा. मा. हणमंतराव भोपाळे साहेब, विजय मंदावाड (मा.पं.समिती सदस्य कंधार),मा.सचीन पाटील शिंदे(मा.उपसरपंच हाळदा), साहेबराव पाटील वसुरे (उपसरपंच ग्रा.पं हाळदा) प्रमुख उपस्थितीत सोपान पाटील कदम, बळीराम पाटील पवार, सचिन चव्हाण, बालाजी चुकलवार साहेब, गणेश पवळे साहेब, श्रीकांत पाटील बसवदे, धनराजा पाटील लुंगारे, शंकर वडेवार,सौ पार्वतीबाई केंद्रे, संभाजी पाटील गाडेकर, परमेश्वर पाटील जाधव, प्रदीप पाटील हुंबाड, विजय पिटलेवाड, अंतेश्वर माली पाटील, विजय येलेवाड, सचिन काटेमोडे, अमोल आतनुरे, अविनाश पाटील कळकेकर,विजय वडजे साहेब, अशोक पाटील कदम, गुलाबराव पाटील जाधव, ओमराज पाटील शिंदे, बजरंग पाटील पाळेकर, बालाजी पाटील सांगवीकर, बंटी गायकवाड, आरिफ भाई, बालाजी इंगोले, प्रदीप वडजे, यांची प्रमुख उपस्थिती होते आभारप्रदर्शन राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा आयोजक शहाजी पाटील शिंदे यांनी केले व सर्वाचे आभार मानले

सहा.जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी भोकर तालुक्यातील एका आश्रम शाळेस ठोकले टाळे

आश्रम शाळांना अचानकपणे भेट देऊन तपासणी केली असता एकही विद्यार्थी व शिक्षक तेथे उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने केली ही धाडसी कारवाई 

प्रतिनिधी :अंबादास बोयावार 
भोकर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटच्या प्रकल्प आधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी दि.२० जानेवारी रोजी भोकर तालुक्यातील अनुदानित आश्रम व आदिवासी आश्रम शाळांना अचानकपणे भेटी देऊन तपासणी मोहीम राबविली असता एका शाळेत एकही निवासी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने त्यांनी 'त्या' शाळेस टाळे ठोकले असून सदरील धाडसी कारवाईने संबंधितात एकच खळबळ उडाली आहे. 

भोकर तालुक्यात एकूण ७ अनुदानित आश्रम शाळा आहेत. सदरील शाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग किनवट कार्यालयाच्या अधिपत्याखाली चालतात.सदरील कार्यालयाच्या अधिपत्याखालील काही शाळांतील त्रुट्यां विषयी काही पालकांनी व समासेवींनी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले (भा.प्र.से.) यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.तसेच त्यांना याबाबत काही गोपनीय माहिती मिळाली होती.याच अनुषंगाने त्यांनी भोकर तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळांना दि.२० जानेवारी २०२३ रोजी अचानकपणे भेटी देऊन शाळांची तपासणी केली.यावेळी त्यांना अनुदानित आश्रम शाळा भोसी ता.भोकर येथील शाळेत एकही निवासी विद्यार्थी किंवा शिक्षक आढळून आले नाहीत.ही एक धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी त्या शाळेच्या कार्यालयास सायंकाळी टाळे(सिल) ठोकले.तसेच रात्री उशिरा पर्यंत त्यांनी तालुक्यातील अन्य शाळांना देखील भेटी देऊन तपासणी केली.त्या तपासणीत काही शाळांचे कर्तव्य समाधानकारक असल्याचे समजले तर काहींना त्यांनी योग्य अशा सुचना दिल्या असल्याचे समजते.तर टाळे ठोकल्याचा कारवाई बाबद त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटले आहे की,आज आम्ही सदरील शाळा तपासणी मोहीम राबविली आहे.त्यात ती गंभीर बाब निदर्शनास आल्याने त्या शाळेच्या कार्यालयास तुर्तास टाळे ठोकले असून पुढील तपासणीत उचित कारवाई करण्यात येईल. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेल्या प्रकल्प आधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांनी ही धाडसी कारवाई केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

20 January 2023

पाळज येथे आमचा गाव आमचा विकास अभियान कार्यशाळा संपन्न

भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड यांच्या हस्ते या अभियान कार्यशाळेचे झाले उद्घाटन 
 प्रतिनिधी :अंबादास बोयावार
भोकर : महाराष्ट्र शासना तर्फे आमचा गाव आमचा विकास राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान राबविले जात असून याच अनुषंगाने श्री तीर्थक्षेत्र पाळज ता.भोकर येथील श्री गणेश मंदीर मंगल कार्यालयात दि.२० जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या सदरील अभियानांतर्गत गणस्तरीय कार्यशाळा सन २०२३-२४ चे उद्घाटन भोकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमित राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पाळज ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष चटलावार हे होते.तर उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी अमित राठोड यांची उपस्थिती होती.तसेच पंचायत समिती विस्तार अधिकारी एस.आर.कांबळे,पाळजचे ग्रामविकास अधिकारी बालाजी एम.इंगळे,जि.प.हायस्कूल पाळजचे मुख्याध्यापक पत्तेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.मुख्याद्यापक व शिक्षकांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. संपन्न झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलतांना गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी जीपीडिपी आराखड्या बाबद सविस्तर माहिती दिली.तसेच बंधीत व अबंधीत क्षेत्रावर काम करीत असताना नऊ थीमला न्याय कसा देता येईल आणि गावाचा उत्कर्ष कसा करता येईल याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले.याच बरोबर शाळेसाठी सायन्स वॉल,अस्ट्रॉनॉमी क्लब,बायनुकूलर या अभियानातून पुरवण्यात यावेत यासाठीच्या सूचना दिल्या. या कार्यशाळेस अनुसरुन प्रास्ताविक ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा सचिव बी.के..पाटील केले.तर सुत्रसंचालन पंडित तोटेवाड यांनी केले आणि उपस्थितांचे आभार हनुमंत काऊलवार यांनी मानले.संपन्न झालेल्या कार्यशाळेसाठी पाळज गटातील ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रापंचायत सदस्य,ग्रामसेवक,अंगणवाडी सेविका,गटातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक,गटातील पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांसह आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

मुदखेड तालुक्यातील महाटी व आमदुराप्रकरणी मास मुव्हमेंट संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

भोकर :मुदखेड तालुक्यातील  महाटी व आमदुरा या गावी सुवर्णांकडून झालेल्या अन्याय अत्याचार प्रकरणी पुणे येथील मास मुव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष विजयभाऊ जगताप यांनी या महाटी या गावी भेट देउन चंद्रकांत गांगलवाड यांच्या कुटुंबा ची भेट घेतली.त्यांच्यावर झालेल्या अन्याय-अत्याचार संदर्भात चर्चा करून दिलासा दिला आहे.नुकतेच आमदुरा या गावातील जातीवादी गुंडांनी पंचशील ध्वज व लाल ध्वज दोन्ही ध्वजाचा अपमान करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते. यावरून  बौद्ध  व मातंग या दोन्ही समाजाची भेट घेतली घेऊन जातीवादी गावगुंडाविरुद्ध पोलीस कारवाईचा एल्गार केला.

 महाटी येथेही जातीवादी गुंडांचा हैदोस

महाटी येथील जातीवादी गावगुंडांनी मातंग समाजातील गांगलवाड कुटुंबाच्या दीड एकर जमिनीवर ताबा घेऊन महिला, पुरुष तसेच लहान मुलांवर लाठ्या काठ्याने जबर हल्ला केला हे कळतात आज मास मुव्हमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ जगताप यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली. आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे हल्ला करणारे सहा आरोपींपैकी दोन आरोपी अटक आहेत. फरार आरोपी पिडितांना गाठून जीवे मारण्याची, बहिष्कार टाकण्याची धमकी देत आहेत. या विषयी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब  यांना भेटून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मास मुव्हमेंट संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष पप्पू कहाळेकर आणि मानवहित लोकशाही पक्षाचे मुदखेड तालुका अध्यक्ष आकाशभाऊ सोनटक्के, मा.लो.पक्षाचे कार्यकर्ते दयानंद भालेराव इतर सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर, मुदखेड तालुक्यात दलितावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून योग्य कार्यवाहीची मागणी केली आहे.

चिरली येथील बेसुमार माती उत्तखननाच्या चौकशीसाठी तहसिलदारांना निवेदन

बिलोली:तालुक्यातील मौ. चिरली येथील गट क्र २२६ मध्ये १०० ब्रास च्या नावाखाली जवळपास रहजार ब्रास झालेल्या माती उत्खननाची चौकशी करुण संबंधीतावर महाराष्ट्र जमिन महसूल संहिता १९६६ मधील नियमानुसार कारवाई करण्यात यावी ही मागणी सामाजिक कार्यकर्ते हनिफ इनामदार यांनी तहसिलदाराकडे तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे.

सदरील निवेदनात नमुद करण्यात आले आहे की मौ. चिरली येथील गट क्र. २२६ मध्ये परवानाधारक आबासाहेब ढगे यांनी १०० ब्रास माती उत्खननाची परवानगी घेवून १५ हायवा गाड्या दोन जे.सी.बी. यंत्राच्या सहाय्याने माती चे बेसुमार उत्तखनन केले आसुन उत्तखनना बाबतीचे महसुल विभागाने परवाना देतांना घालुन दिलेले सर्वच नियम अटींना डावलुन मनमानी पध्दतीने जवळपास २ हजार ब्रास मातीचे उत्तखनन परवाना धारक व्यक्तीने केले आसल्याचा निवेदनात नमूद आहे.महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम१९६६ नुसार पुलापासून किमान ५०० मिटर च्या आत उत्तखनास बंदी आसतांना चिरली गुजरी पुला पासुन १०० मीटर च्या आत आसलेल्या काटावर दोन जे. सी. बी. मशीन लावुन बेसुमार मातीचे उत्खनन परवाना धारकाने केला आहे. या बेसुमार झालेल्या माती उत्तखननमुळे भविष्यात पाण्याचा प्रवाह बदलुन सदरील पुलाला व आसपासच्या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान होवु शकते आस ही निवेदनात नमुद आहे.

19 January 2023

अरेच्चा...ट्रकमधून सिगारेट,काजू व पान मसाल्याची झाली चोरी

 २ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल गेला चोरीस ; भोकर पोलीसात गुन्हा दाखल 

प्रतिनिधी:अंबादास बोयावार
भोकर : नांदेडहून किनवटकडे निघालेल्या मालवाहू आयचर ट्रकमधून ब्रिस्टॉल सिगारेट,काजू व पान मसाला असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा किमती मुद्देमाल चोरीस गेला आहे. महत्वाचे म्हणजे भोकर फाटा ते भोकर दरम्यानच्या रस्त्यावर हा मुद्देमाल चोरीस गेल्याने तो ट्रक थांबलेल्या ठिकाणांहून चोरी झाली का धावत्या ट्रकमधून ? यावर प्रश्नचिन्ह असून दि.१८ जानेवारी रोजी या अजब चोरीचा गुन्हा भोकर पोलीसात दाखल करण्यात आला आहे. 

घरफोडीचे सत्र सुरुच असतांना मालवाहू ट्रकमधून किमती मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.ते असे की, नांदेड येथून किराणा दुकानाचा माल व आदी साहित्य घेऊन दि.१७ जानेवारी २०२३ रोजी रात्री १०:३० वाजता दरम्यान किनवटकडे निघालेल्या मालवाहू आयचर ट्रक क्रं.एम.एच.४६ एफ.२४५६ चा चालक भोकर फाटा येथे चहापान करण्यासाठी थांबला आणि तेथून तो ट्रक घेऊन भोकरकडे निघाला.भोकर फाट्याहून निघालेला हा ट्रक रात्री १२:०० वाजताच्या दरम्यान भोकर येथे आल्यावर त्या ट्रक चालकाच्या निदर्शनास आले की, ट्रकमधील मालावर झाकलेली ताडपत्री फाटलेली आहे.यावेळी त्याने फाटलेली ताडपत्री सारुन ट्रकमधील माल पाहिला असता त्याच्या लक्षात आले की,ट्रक मध्ये घेऊन आलेल्या मालातील २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ब्रिस्टॉल सिगारेटचे पुडे ठेवलेले बॉक्स,२४ हजार रुपये किमतीचे काजू ठेवलेले डब्बे व १८ हजार रुपये किमतीचे पान मसालाचे पुडे असा एकूण २ लाख ९२ हजाराचा किमती मुद्देमाल ट्रकमध्ये नाही. 

यामुळे ट्रक चालक तारुसिंग चव्हाण,रा.टाकळी,ता.उमरखेड जि.यवतमाळ यांनी भोकर पोलीस ठाणे गाठले व उपरोक्त आशयानुसार २ लाख,९२ हजार रुपये किमतीचा वरील उल्लेखीत मुद्देमाल चोरीस गेल्याची रितसर फिर्याद दिली. यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरनं.२६/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे भोकर पोलीसात दि.१८ जानेवारी २०२३ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्हे प्रकरणातील विशेष बाब म्हणजे हा किमती मुद्देमाल थांबलेल्या ट्रक मधून चोरीस गेला का धावत्या ट्रकमधून ? यावर प्रश्नचिन्ह असून या अजब चोरीच्या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.उप.नि.संभाजी हनवते हे करत आहेत.

तहसिलदार राजेश लांडगे यांनी मिटविला हळदा येथील रस्त्याचा वाद

हळदा ता.भोकर येथील पाणंद रस्त्याचा गेल्या ४० वर्षापासून प्रलंबित असलेला वाद मिटविल्याने शेतकरी महिलांनी मानले त्यांचे आभार 

 प्रतिनिधी :अंबादास बोयावार 
भोकर : तालुक्यातील हाळदा येथील पाणंद रस्त्यात अतिक्रमण झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे विशेष करून शेतकरी महिलांनी तहसिलदार तथा प्र.उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे यांना निवेदनाद्वारे तक्रार देऊन रस्त्याचा वाद त्वरित मिटविण्याची विनंती केली होती.याची दखल घेऊन दि.१९ जानेवारी २०२३ रोजी त्यांनी जाय मोक्यावर येऊन त्या रस्त्याची पाहणी केली व गेल्या ४० वर्षापासून असलेला वाद मिटविण्यासाठी वादी व प्रतिवादी यांच्याशी सुसंवाद साधून त्यांच्यात समेट घडून आणला आणि तो वाद मिटविला.त्यामुळे सर्व शेतकरी व विशेषत: शेतकरी महिलांनी त्यांचे मनापासून आभार मानून धन्यवाद दिले. 

याबाबत असे की,हाळदा ते धारजणी पाणंद रस्त्यावर गावातील ५० ते ६० शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांना आपली गुरे ढोरे,बैलगाडी घेऊन शेताकडे जावे लागते.परंतू हा पानंद रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमणाने खुपच अरुंद होत गेल्याने शेतकरी व शेतकरी महिला आणि शेतमजूर यांना त्या शेताकडे जाणे अत्यंत जिक्रीचे झाले होते.नव्हे तर तारेवरची कसरत करावी लागत होती.तसेच बैलगाडी घेऊन जाणे बंद झाल्यामुळे शेतीला लागणारी खते,बी-बियाणे,शेती अवजारे नेते व शेतात पिकलेला माल घेऊन येणे खुपच अवघड झाले होते.शेतकऱ्यांना सर्व काही डोक्यावर घेऊन ये-जा करावी लागत होती.रस्ता नसल्याने रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांसोबत अनेकदा वाद विवाद होऊन मोठी भांडणे होत होती.त्यामुळे हा वाद-मिटविण्यासाठी गावातील प्रतिष्ठित पंच मंडळीनी अनेकवेळा प्रयत्न केला. परंतू त्यांना यात यश आले नाही. 

म्हणून सर्व शेतकरी महिलांनी एकत्रित येऊन भोकर तहसिलचे तहसिलदार राजेश लांडगे यांच्याकडे हा वाद मिटविण्यासाठी विनंतीपर निवेदन केले होते.तसेच त्या निवेदनाद्वारे दि.२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिना पासून मुलाबाळांसह तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन तहसिलदार राजेश लांडगे यांनी दि. १९ जानेवारी २०२३ रोजी महसूल कर्मचारी,भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वादातीत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी त्याठिकाणची अडचण व सत्यपरिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेती असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून घेतले व त्यांनी विश्वासात घेऊन समजावून सांगितले.वादातीत विषयात सिमेंट घडवून आणली व तो रस्ता रुंद करून घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांना राजी केले.यामुळे गेल्या ४० वर्षापासून असलेला वाद मिटविण्यात व शेतकरी,शेतकरी महिला आणि शेतमजूर यांची होणारी हेळसांड सोडविण्यात त्यांना यश आले.हा वाद त्यांनी मिळविल्याने सर्व शेतकरी,शेतकरी महिलांनी त्यांचे मनापासून आभार मानले.हा वाद मिटविण्यासाठी यावेळी तहसिलदार राजेश लांडगे यांच्या सोबत मंडळ अधिकारी एस.बी.आरु,तलाठी श्रीमती कल्पना मुंडकर,भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी एस.जी.भुसावळे,स्वप्निल चंद्रे,सरपंच माधवराव नागमोड,माजी सरपंच बालाजी नार्लेवाड,भुजंगराव भोसले,साईनाथ याटेवाड,चेरमन दत्तराव आक्कलवाड,उपसरपंच गजानन करपे,गोविंदराव भोसले, सुदर्शन भोसले,मारोतराव बोईनवाड, गंगाधर इडेवार, प्रभाकर डोंगरे यांसह बहुसंख्येने शेतकरी, महिला शेतकरी व आदींची उपस्थिती होती.

17 January 2023

भारत जोडोनंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

नांदेड : काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान जिल्ह्यात राबविले जात असून या अभियानाचा शुभारंभ येत्या प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना ला साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून रणनिती आखली जात असून प्रदेश पातळीवरून प्रत्येक जिल्ह्यात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची निवड करण्यात आली असून नांदेडची जबाबदारी अभिजीत सपकाळ यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सोमवारी प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक व्यापक बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार भास्करराव पा. खतगावकर ,माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर, प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर आदींची उपस्थिती होती.खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात झालेली वातावरण निर्मिती टिकवून ठेवणे गरजेचे असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती फायदेशीर ठरावी यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविले जात आहे. आपण जे बोलतो ते करतो. त्यामुळे आपल्याला यश मिळत आहे. पुढील दोन वर्षे निवडणुकांचे असून या निवडणुकांमध्येदेखील काँग्रेसला निश्चितपणे भरीव यश मिळेल, असाविश्वास यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिला हेल्मेट रॅली संपन्न

नांदेड  :- राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2023 हे दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस उपअधीक्षक श्रीमती अश्विनी जगताप, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची उपस्थिती होती. 
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने नांदेड जिल्हयात विविध रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिलांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेट वापर करावा यासाठी महिला हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. अपघाताची संख्या कमी करण्याबाबत जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यात सर्व नागरिकांनी वाहतूक नियमावलीचे पालन करुन सहकार्यातून अपघात मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. 
ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पोलीस अधीक्षक कार्यालय, कलामंदीर, शिवाजीनगर, राज कॉर्नर, एस.टी.वर्कशॉप, येथून आयटीआय पर्यंत होता. या रॅलीत  सुमारे 150 महिलांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी सुमारे 60 महिला या पोलीस विभागातील होत्या. रॅलीच्या वेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहा,मोटार वाहन निरिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. रॅलीसाठी मोटार वाहन वितरक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक यांनी सहकार्य केले.

14 January 2023

बिलोलीत आज भव्य शौर्य यात्रा पथ संचलन आणि हिंदु धर्म सभेचे आयोजन

बिलोली:विश्व हिंदु परिषद - बजरंग दल प्रखंड बिलोलीच्या वतीने बिलोली शहरातील कुंडलवाडी रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात दिनांक १४ जानेवारी शनिवार रोजी दुपारी २ वाजता हिंदुत्त्वाची बुलंद तोफ शंकरराव गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. असे विश्व हिंदु परिषद बजरंग दलाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रस्तुत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील बिलोली शहरातील कुंडलवाडी रोड लगत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हिंदु बांधवांचे शौर्य यात्रा पथसंचलनाला प्रारंभ आणि हिंदु धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरिल हिंदु शौर्य यात्रा पथसंचलन आणि हिंदु धर्म सभेत सर्व हिंदु बांधवांनी जातीयतेची बंधने तोडून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावेत. विश्व हिंदु परिषद - बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी गणवेशात उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र क्षेत्र मंत्री शंकरराव गायकर उपस्थित हिंदु बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. गत वर्षी बिलोली शहरातील हिंदु शौर्य यात्रा पथसंचलन आणि हिंदु धर्म सभा संपुर्ण भारतात आणि गुणात्मक संख्यात्मक आणि दृष्ट्या क्रमांक एक वर संपन्न झाले आहे. या मुळे या वर्षी देखील सदरिल धार्मिक कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे.

12 January 2023

ग्रामपंचायत निवडणूक खर्च 20 जानेवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश

नांदेड :- दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारावर अपात्रेची कारवाई निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात येणार आहे. हिशोब सादर करण्याची अंतिम मुदत ही येत्या 20 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. या दिनांका पुर्वी हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल. यातील गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने उमेदवारांनी सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

या निवडणुकीत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या 1 हजार 572 जागांसाठी 2 हजार 706 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच 375 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 3 हजार 81 उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

10 January 2023

सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट

नांदेड,:- आगामी सण, उत्सवात ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादी वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत.ध्वनीक्षेपकाचा वापरास शिवजयंती एक दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस, 1 मे महाराष्ट्र दिन एक दिवस, गणपती उत्सवात दोन दिवस ( पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव तीन दिवस दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी), दिवाळी लक्ष्मीपुजन एक दिवस, ईद ए मिलाद एक दिवस, ख्रिसमस एक दिवस, 31 डिसेंबर एक या दिवसासाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट राहील. तसेच उर्वरित तीन दिवस हे ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक नांदेड यांच्या शिफारसीनुसार जिल्हातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल.या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सुट जिल्हयातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जाबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

09 January 2023

मालदरीतांडा येथील १० शेतकऱ्यांनी निवेदणाद्वारे दिला प्रजासत्ताक दिनी आत्महत्येचा ईशारा.

कोटेशन भरून दोन वर्ष लोटून वीज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकरी झाले हतबल

 भोकर प्रतिनिधी. बोयावार अंबादास लख्खेकर                           
 - म. रा.वि. वि. कंपनी कडे तालुक्यातील मालदरी तांडा येथील १० शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील कृषीपंपा साठी लागणारी वीज कनेक्शन मिळावे यासाठी रितसर अर्ज व कोटेशन रक्कम भरून दोन वर्ष झाले तरीही आजपर्यंत वीज कनेक्शन मिळाले नाही परिणामी शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची वरचेवर आर्थिक परिस्थिती खालावत चालल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी दहा शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसह आत्महत्या करीत असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.

  तालुक्यातील मालदरी तांडा येथील शेतकरी नामे १)अमोल भगवान कदम २)संतोष किशन जाधव ३)शेषराव बळीराम जाधव ४)हाणमल्लू नरसीमलू कडकुठवाड ५)महालनबाई यमजी राठोड ६)राजेश वामन आडे ७)लक्ष्मण घमना कडकुठवाड ८)अंकुश रामसिंग आडे ९) प्रेमालाबाई राजू जाधव  १०)रत्नमाला विलास आडे हे आपली उपजीविका शेतीवर कष्ट करून भागवितात. सध्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणा मुळे खरीप हंगामाची पिके कधी अतिवृष्टीने तर कधी कोरड्या दुष्काळाने सतत नापिकी होत असल्याने सदरील कुटुंबंयांची पूर्ण मजाल रब्बी पिकांवर अवलंबून आहे ह्या कुटुंबियांनी शासकीय योजनेतून जलसिंचनाची व्यवस्था केल्याने व पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने प्रामुख्याने हळद,गहू,हरभरा, ज्वारी, लसूण. मिर्ची घेता येतील? त्याकरिता  दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी कृषी पंपा साठी महाराष्ट्र राज्य विज विद्युत वितरण कंपनी कार्यालय भोकर यांच्याकडे रितसर अर्जा सह कोटेशन रक्कम भरले असून दोन वर्ष उलटून गेले असून अद्याप त्यांना विज कनेक्शन व डी. पी. मिळाला नसल्याने रब्बीचे पिके हे हातचे जातं असल्याने या पूर्वी संबंधित कंपनीला अनेकवेळा तोंडी, लेखी सांगून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याने व शेती उत्पन्नावरच अवलंबून असल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह, आपल्या पाल्ल्याचं शिक्षण, आरोग्य, घरातील मुला,मुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत असल्यामुळे वरील कुटुंबीय हे हतबल झाल्याने दि.२५ जानेवारी २०२३ पर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास दि.२६ जानेवारी २०२३ (प्रजासत्ताक दिनी)  तहसील कार्यालय भोकर समोर कुटुंबिया सह सामूहिक आत्महत्या करणार असल्याचे एका निवेदना द्वारे कळविले आहे. सदरील निवेदन जिल्हाधिकारी नांदेड, तहसील कार्यालय भोकर, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ कार्यालय नांदेड, महाराष्ट्र राज्य विद्युत विभागीय कार्यालय भोकर, ईत्यादींना देण्यात आले आहे.

-----------------------------
 आम्ही शासनाला याबाबत मागणी केली असून येत्या मार्च मध्ये बजेट येणार आहे व १ एप्रिल २०१८ नंतर चे कोणतेच काम मंजूर झाले नाही बजट आल्यावर प्रधान्याने मालदरी येथील शेतकऱ्यांची कामे करू तरी त्यांना विनंती आहे की आपण आत्महत्या सारखे असे कोणतेही पाऊल उचलू नये या करिता आम्ही स्वतः जाऊन त्यांचे समाधान करून समजावून सांगू.असे आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना डी.वाय.शेख भोकर उपविभाग म. रा.वि. वि.कं. यांनी सांगितले आहे.

08 January 2023

भोकर डॉक्टर्स असोसिएशनने पत्रकार बांधवांचा केला सन्मान

अंबादास बोयावार प्रतिनिधी 
भोकर : भोकर डॉक्टर्स असोसिएशन घ्या वतीने दर्पण दिन-पत्रकार दिनाच्या औचित्याने येथील पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करुन भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा! 
दर्पण दिन-पत्रकार दिनाच्या औचित्याने डॉक्टर्स असोसिएशन भोकर घ्या वतीने दि.६ जानेवारी २०२३ रोजी डॉ.साईनाथ वाघमारे यांचे यश हॉस्पिटल भोकर येथे शहरातील पत्रकार बांधवांचा शॉल,पुष्पहार व मिठाई देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार एल.ए.हिरे,संपादक उत्तम बाबळे व बी.आर.पांचाळ यांनी काल,आज आणि उद्याची पत्रकारिता यावर आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला. 
तर जेष्ठ डॉ.यु.एल.जाधव यांनी प्रास्ताविकातून या सन्मान सोहळ्याची पार्श्वभूमी विषद केली.तसेच डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉ.साईनाथ वाघमारे व असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राम नाईक यांना पत्रकारांच्या सन्मानाविषयी सोहळ्यास अनुसरुन मनोगत व्यक्त करुन उपस्थित पत्रकार बांधवांना पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 
या सन्मान सोहळ्यास पत्रकार राजेश वाघमारे,गंगाधर पडवळे,सुधांशू कांबळे,विजय चिंतावार,एजास कुरेशी, बालाजी कदम पाटील,अंबादास बोयावार,शंकर कदम, मनोज शिंदे यांसह आदींची उपस्थिती होती.तर या सोहळ्यास उपस्थित राहून पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान करुन भावी सेवाकर्यासाठी डॉ.बी.आर.जाधव पारवेकर,डॉ.गजानन धुरमूरे,डॉ.सागर रेड्डी,डॉ.श्रीकांत बोलेवार,डॉ.प्रज्वलित सोनकांबळे,डॉ.भाले,डॉ.वसिम शेख,डॉ.विठ्ठल माने यांसह आदींनी शुभेच्छा दिल्या.या सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन डॉ.यु.एल.जाधव यांनी केले व उपस्थितांचे आभार डॉ.साईनाथ वाघमारे यांनी मानले.

04 January 2023

ग्रामीण डाक जीवन विमाधारकाच्या वारसाला 5 लाख 24 हजार रुपयाचा धनादेश वितरीत

नांदेड  :- कंधार तालुक्यातील भीमगड कंधार येथील ग्रामीण डाक जीवन विमाधारक राहुल आत्माराम झगडे (वय 35 वर्षे) यांचे हृदय विकाराच्या आजाराने दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी निधन झाले. त्यांनी 2 हजार रुपये प्रती महिना याप्रमाणे 5 लाख रुपयाचा ग्रामीण डाक जीवन विमा दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी घेतला होता. हा विमा घेऊन त्यांना केवळ 7 महिने झाले होते. त्यांच्या या निधनानंतर डाक विभागामार्फत त्यांच्या वारस पत्नी श्रीमती शिल्पा राहुल झगडे यांना 5 लाख 24 हजार रुपयाचा धनादेश डाकघर अधीक्षक राजीव पालेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण डाक जीवन विमा वरदान ठरत असून प्रत्येकांनी आपली बचत व संरक्षण म्हणून ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे डाकघर अधिक्षक राजीव पालेकर यांनी केले आहे.