भोकर :मुदखेड तालुक्यातील महाटी व आमदुरा या गावी सुवर्णांकडून झालेल्या अन्याय अत्याचार प्रकरणी पुणे येथील मास मुव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष विजयभाऊ जगताप यांनी या महाटी या गावी भेट देउन चंद्रकांत गांगलवाड यांच्या कुटुंबा ची भेट घेतली.त्यांच्यावर झालेल्या अन्याय-अत्याचार संदर्भात चर्चा करून दिलासा दिला आहे.नुकतेच आमदुरा या गावातील जातीवादी गुंडांनी पंचशील ध्वज व लाल ध्वज दोन्ही ध्वजाचा अपमान करून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले होते. यावरून बौद्ध व मातंग या दोन्ही समाजाची भेट घेतली घेऊन जातीवादी गावगुंडाविरुद्ध पोलीस कारवाईचा एल्गार केला.
महाटी येथेही जातीवादी गुंडांचा हैदोस
महाटी येथील जातीवादी गावगुंडांनी मातंग समाजातील गांगलवाड कुटुंबाच्या दीड एकर जमिनीवर ताबा घेऊन महिला, पुरुष तसेच लहान मुलांवर लाठ्या काठ्याने जबर हल्ला केला हे कळतात आज मास मुव्हमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ जगताप यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली. आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला आहे हल्ला करणारे सहा आरोपींपैकी दोन आरोपी अटक आहेत. फरार आरोपी पिडितांना गाठून जीवे मारण्याची, बहिष्कार टाकण्याची धमकी देत आहेत. या विषयी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांना भेटून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मास मुव्हमेंट संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष पप्पू कहाळेकर आणि मानवहित लोकशाही पक्षाचे मुदखेड तालुका अध्यक्ष आकाशभाऊ सोनटक्के, मा.लो.पक्षाचे कार्यकर्ते दयानंद भालेराव इतर सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यासमोर, मुदखेड तालुक्यात दलितावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचून योग्य कार्यवाहीची मागणी केली आहे.







0 comments:
Post a Comment