नांदेड :- कंधार तालुक्यातील भीमगड कंधार येथील ग्रामीण डाक जीवन विमाधारक राहुल आत्माराम झगडे (वय 35 वर्षे) यांचे हृदय विकाराच्या आजाराने दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी निधन झाले. त्यांनी 2 हजार रुपये प्रती महिना याप्रमाणे 5 लाख रुपयाचा ग्रामीण डाक जीवन विमा दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी घेतला होता. हा विमा घेऊन त्यांना केवळ 7 महिने झाले होते. त्यांच्या या निधनानंतर डाक विभागामार्फत त्यांच्या वारस पत्नी श्रीमती शिल्पा राहुल झगडे यांना 5 लाख 24 हजार रुपयाचा धनादेश डाकघर अधीक्षक राजीव पालेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ग्रामीण डाक जीवन विमा वरदान ठरत असून प्रत्येकांनी आपली बचत व संरक्षण म्हणून ग्रामीण डाक जीवन विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे डाकघर अधिक्षक राजीव पालेकर यांनी केले आहे.
04 January 2023
Home »
» ग्रामीण डाक जीवन विमाधारकाच्या वारसाला 5 लाख 24 हजार रुपयाचा धनादेश वितरीत







0 comments:
Post a Comment